Wednesday 27 May 2020

हास्य फटाके... जोरातच!

कराचे वेगवेगळे प्रकार सांगून झाल्यावर शिक्षकांनी विचारले, अप्रत्यक्ष कराचं एखादं उदाहरण द्या पाहू ?"
'कुत्र्यावरील कर' गुंड्या उठून उभा राहून सांगू लागला.
"हं.? कसा काय?"
"कारण कुत्र्यावर लावलेला कर स्वतः कुत्रा भरत
नाही तर त्याच्या मालकाला भरावा लागतो. गुंड्याने खुलासा केला.

★★★★★
भांड्याच्या दुकानात पती-पत्नी भांडत होते. पतीचे
म्हणणे होते- मोठ्या तोंडाचे ग्लास घ्यावे, तर पत्नीच्या मते छोटवा तोंडाचे ग्लास घ्यायचे. दोघांच्या भांडणाने वैतागून शेवटी दुकानदार पतीला म्हणाला, "साहेब, मॅडमचे म्हणणे बरोबर आहे. लहान तोंडाचे ग्लास घेणे योग्य आहे."
 ते ऐकून पती चिडून म्हणाला, "तुला काय म्हणायला जातंय लहान तोंडाचे ग्लास चांगले. बघ बघ,
यात माझा हात जातोय का? मग मला घासता येतील का ते"
★★★★★
एका विद्यार्थ्याने आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिले, “सर,
आपण महान आहात, आपल्या शाळेची शान आहात,
माझ्या या गोष्टी लक्षात ठेवून मला चांगल्या मार्कांनी पास करा."
उत्तरादाखल शिक्षकाने लिहिले, "तू उत्तम आहेस, तुझे लेखनही उत्तम आहे, तू जर पास झालास तर माझा
एक प्रशंसक विद्यार्थी कमी होईल. त्यामुळे तू या वर्षीही माझ्याच वर्गात बसावेस असे मला वाटते."
★★★★★
घराला दिलेला रंग बघून एक माणूस घरमालकाला : तुमच्या घराचा रंग काही उठून दिसत नाही! घरमालकाची मुलगी : हो क्का?
मग बसून बघा!
★★★★★
संतासिंग एकबार अपने गर्लफ्रेंड को लेकर मुंबईसे लोनावला जाता है. उस लडकीने बहुतही दिल्लगीवाली मिडी पहनी हुयी है. उसमेंसे उसके गोरे गोरे घुटने बडे लुभावने लगते है. रास्ते में मूड में आकर संतासिंग उसके मुलायम घुटनोंपर हात रखता है. कारकी
रफ्तार अब धीमी है. लडकी मदभरी आँखोसे संतासिंगकी ओर देखते हुये कहती है,
"डियर सॅन्टा, तुम आगे जा सखता हाय, खमॉन घो हेड."
तो संतासिंग बडे खुशीमें आकर कार की रफ्तार बढाकर पुना पहुँचता है.
★★★★★
काहीही लक्षात ठेवण्याची गरज नसल्याने स्मरणशक्तीचा विकास होत नाही. उलट स्मरणशक्तीचा नाशही होतो. त्यामुळे अशी व्यक्ती प्रामाणिक पण बावळट म्हणून कुप्रसिद्ध होते!
कुणाशी काय व कोणते खोटे बोलणे झाले आहे, ते लक्षात ठेवावे लागत असल्याने स्मरणशक्तीचा विकास होतोच पण तिचा उत्कर्षही होतो. अशी व्यक्ती तल्लख बुद्धीची व चलाख म्हणून ओळखली जाते!!
★★★★★
"जोशीकाकू तुमचं नाव काय हो?"
"का रे? कशाला पाहिजे?
काही नाही हो,
खरं सांगतोस की नाही?
नाही म्हणजे तुमचं नाव 'पालथा घडा' असं आहे काय?"
"काय म्हणतोस, मूर्खा?"
"नै, शेजारच्या सावंतकाकू म्हणत होत्या की, जोशीबाईंना काही सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी म्हणून."
★★★★★
चौपाटीवरच्या वाळूवर चंद्राच्या साक्षीने ती दोघं
गुलगुलू बोलत होती.
ती (लडिवाळपणे) : आपलं लग्न झाल्यावर मी तुझी
सर्व दुःखे, त्रास आणि चिंता सगळ्या सगळ्यांमध्ये
सहभागी होईन.
तो : 'पण मला सध्या काहीच दुःख, त्रास वा चिंता
नाहीयेत!'
ती (चिडून) : 'अरे! मी आपल्या लग्नानंतरचं सांगतेय.'
★★★★★
एक म्हातारी रेल्वेच्या तिकीट ऑफिसजवळ आली.
कुठं जायचंय'
'आँ.... काय म्हणालात ?' तिने विचारले.
'कुठलं तिकीट देऊ?'
'चाळीसगावचं द्या आणि कसं जायचं ते पण जरा
सांगा!
तिकिटाच्या खिडकीवरील कारकुनाने तिला तिकीट दिलं
आणि तो म्हणाला, 'तुम्हाला दोन वेळा गाड्या बदलाव्या लागतील.'
'दोन वेळा काय!... दहा वेळा बदलीन. माझ्याजवळ
खूप साड्या आहेत. फक्त कसं जायचं ते झटपट सांगा.
★★★★★
राजू - बाबा, बाबा! रावण जादूगार होता का हो?
बाबा : नाही बाळ, का रे?
राजू : मग त्याने सीतेचे 'हरण' कसे केले ?
★★★★★
लताला मांजर पाळायची आवड होती, पण तिच्या
पतिराजांचा विरोध होता; परंतु हट्टाने तिने मांजर
आणली. एकदा पतिराजांची झोप मांजरीच्या उपद्रवांनी
मोडली. रागाने ताबडतोब मांजरीला घेऊन ते जंगलात
सोडायला गेले. रात्री त्यांना मांजरीसह परत आल्यावर
पत्नीने आश्चर्य व्यक्त केले. तेव्हा पतिदेव म्हणाले,
"तिला सोडल्यावर मला घरी यायचा रस्ता सापडेना.
तेव्हा तिच्या मागोमाग मी घरी आलो."
★★★★★
एका गावात स्मशानघाट खूप दूर होता. त्यामुळे
मर्तिकाचे सामान निरनिराळ्या दुकानांमधून गोळा करून आणावे लागे. त्यामुळे लोकांची खूप गैरसोय होऊन त्रास होत असे. एकाने ही अडचण जाणून स्मशान- घाटाच्या
जवळच मर्तिकाच्या सामानाचे दुकान सुरू केले.
उत्साहाच्या भरात त्याने आपल्या दुकानावर पाटी
लावली.
'गैरसोय दूर झाली. आता विलंब नको!
★★★★★
गावातील एका श्रीराम मंदिरात दरसाल रामजन्माचा
उत्सव रामनवमीस होत आहे. एका वर्षी मंदिराच्या
मालकाच्या घरात काही अडचण उद्भवली. रामनवमीला सकाळी तेथे बोर्ड लावला होता
काही अपरिहार्य कारणामुळे आज रामाचा जन्म होणार
नाही.
★★★★★

No comments:

Post a Comment