Monday 25 May 2020

विनोद वाचा... विनोद


एका शासकीय कर्मचाऱ्यास त्याची फायलिंग कॅबिनेट साफ करीत असताना एक दिवा सापडला. त्याची धूळ झटकतो, तो काय तो चक्क अल्लाउद्दीनचा चिराग निघाला. तुझ्या तीन इच्छा सांग. त्या पुऱ्या होतील.
'अतिशय उकाडा होतोय. एक मस्त बीअर मिळाली तर...'
 बीअर हजर- 'बोल तुझी दुसरी इच्छा काय?'
'मला एखाद्या निर्जन निसर्गसुंदर बेटावर सुंदर स्त्रियांच्या सहवासात काही दिवस....'

दुसऱ्या क्षणी तो एका बेटावर सुंदर रमणींबरोबर होता.
'आता तुझी शेवटची इच्छा?'
'बस आता काही नाही. यापुढचे आयुष्य असंच काम न करता गेलं तर काय बहार येईल...' असं म्हणताच क्षणी पाहतो तो काय? तो त्याच्या ऑफिसमधील टेबलासमोर विराजमान होता..
●●●●●
पेशटः डॉक्टरसाहेब तुमचे म्हणणे खरे झाले. तुमच्या औषधामुळे मी दोन महिन्यांत माझ्या पायाने चालू लागलो.
डॉक्टर: (खूश होऊन) हे ऐकून मला बरे वाटले.
पेशंट: आपल्या बिलाची रक्कम पाहून मला माझी गाडी विकावी लागली व त्यामुळे आता मला पायी चालणेच भाग आहे.
●●●●●
एकदा गंभीरराव डॉक्टरकडे गेले. गंभीर चेहरा करून ते डॉक्टरांना म्हणाले,
"डॉक्टरसाहेब, अहो अलीकडे मला संडासलाच होत नाही."
डॉक्टर म्हणाले, 'अहो, मग पलीकडे बसून बघा!'
●●●●●
एका झाडावर दोन वेडे बसलेले असतात. त्यातला एक जरा वेळाने खाली पडतो. झाडावरचा वेडा त्याला विचारतो, 'अरे, खाली का पडलास?' तर
खालचा वेडा म्हणतो, 'मी पिकलो आणि गळून पडलो.'
●●●●●
इतिहासाचे शिक्षक महाजन सर- सांग अनिल, बादशाह अकबर कोणत्या साली जन्मले आणि कोणत्या साली त्यांचा मृत्यू झाला?
अनिल- 'नाही सर, मला माहीत नाही.'
शिक्षक (रागाने)- 'काढ, तुझं इतिहासाचं पुस्तक काढ आणि बघून सांग.'
अनिल- 'सर यात लिहिलंय १५४२-१६०७
शिक्षक- “मग हे पहिलं वाचलं नव्हतंस?'
अनिल- 'होय सर वाचलं होतं, पण मला वाटलं हा अकबर बादशहाचा टेलिफोन नंबर आहे.'
●●●●●
मॉरिस बॅरिमूर हा एक प्रसिद्ध नट, एकदा तो एका नाटककाराशी गप्पा मारत होता. नाटककार त्याला म्हणाला, 'मॉरिस, एखादा भयानक अनुभव घेतल्याखेरीज आणि भयंकर दुःख भोगल्याशिवाय तू मोठा नट होऊ शकणार नाहीस.
मॉरिस तात्काळ म्हणाला, 'मग तू एक नाटक लिहून टाक. मी त्यात काम करतो!
●●●●●
युद्धानंतर सैनिकांच्या पत्नी आपापल्या पतीच्या
शौर्याच्या बढाया मारत होत्या. एकजण अभिमानाने
म्हणाली, 'माझ्या पतीने एका शत्रूचा पायच छाटला.'
'छान, पण फक्त पायच का. डोकं का छाटलं नाही?'
दुसऱ्या स्त्रीने उत्सुकतेने तिला विचारलं.
'कारण डोकं आधीच कुणीतरी छाटलेलं होतं, पहिली
स्त्री हळूच म्हणाली.
●●●●●
पत्नी (पतीला) : तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारूं
नका. यामुळे मुलंसुद्धा माझं नाव घेऊन हाक मारतात.
पती : मग काय, मीसुद्धा आजपासून तुला आई म्हणू?
●●●●●
पेशंटला तपासल्यावर डॉक्टर म्हणाले, 'तुम्ही आता काही तासाचेच सोबती आहात, तेव्हा तुम्हाला कोणाला भेटायचं आहे काय?
'हो!' पेशंट बोलला.
'कुणाला भेटायचंय?' डॉक्टरांनी विचारलं.
'दुसऱ्या डॉक्टरांना!' पेशंट शांतपणे म्हणाला.
●●●●●
सोनालाल चांदीमल मरण पावले. पण मृत्यूपूर्वी
आपल्या बायकोला एक गोष्ट सांगून गेले. म्हणाले, "मी
आयुष्यात खूप पैसा मिळवला. पण काहीच दानधर्म
करू शकलो नाही. तरी माझी एक इच्छा मी मेल्यानंतर
तू पूर्ण कर,
"कोणती?"
"आपल्या गोठ्यातली गाय विकून जे पैसे येतील ते
एखाद्या गरीब ब्राह्मणाला दान कर."
नवऱ्याला त्याच्या मृत्यूपूर्वी दिलेले वचन पूर्ण
करण्याकरिता सोनालालची बायको गोठयातली गाय
घेऊन बाजारात गेली. जाताना घरातले एक मांजरपण
घेऊन गेली. बाजारात एका ठिकाणी बैठक मांडून
जोरजोरात बोलू लागली.
'गाय व मांजर विकायचे आहे. कोणाला पाहिजे का?'
'काय किंमत?'
'गायीची किंमत १ रुपया व मांजराची किंमत १००० रुपये, पण दोन्ही एकाच वेळी विकायची आहेत.'
एका माणसाने १००१ रुपयांना गाय व मांजर दोन्ही विकत घेतली. मांजराला रस्त्यात सोडून तो गाय घेऊन घरी गेला.
सोनालालच्या बायकोने नवऱ्याला मृत्यूपूर्वी दिलेले
बचन पाळले. फक्त १ रुपया ब्राह्मणाला दान देऊन.
●●●●●
घरासमोरून जाणारा एक इसम घराला मारलेला रंग बघून घरमालकाला म्हणतो, "काय हो, तुमच्या
घराचा रंग काही उठून दिसत नाही."
हे ऐकून घरमालकाच्या शेजारीच उभी असलेली
त्याची मुलगी सदर इसमास म्हणाली, "हो का?"
"मग बसून बघा."
●●●●●
पहिला कोल्हा- अरे, किती दमलायस तू! द्राक्षांचा
नाद सोडून दे, प्रयत्न करून मळयात शिरलास तर मार
खावा लागेल.
दुसरा कोल्हा- मार खावा लागला तरी मला द्राक्षे घरी न्यावीच लागतील. बायकोला कडक डोहाळे लागलेत. तिने तंबी दिलीय, द्राक्षं आणली नाहीत तर घरात घेणार नाही!
●●●●●

No comments:

Post a Comment