Saturday 8 July 2023

ऐकल्या विनोदा दंडवत ... लॉंग ड्राईव्हला...

 बायको : अहो… सांगा ना… आपण कुठे चाललोय नक्की..?

नवरा : लाँग ड्राईव्हला…

बायको : मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं..?

नवरा : मला पण आताच कळलंय..

कारचे ब्रेक फेल झाल्यावर..

****

पक्ष सोडण्यास कारण की…

एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत असे सांगून पक्ष सोडला.

आणि अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत, असे सांगून पक्ष सोडला.

******

शिक्षक : उशीर का झाला शाळेत यायला?

चिंटू : आई बाबा भांडत होते.

शिक्षक : त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?

चिंटू : माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.

******

बायको: जिथे असाल तिथेच थांबा. कुठेही बाहेर पडू नका. पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे. काळजी 

वाटते. सांगितलेल ऐका यावेळी तरी! 

नवरा: बरं, बरं! 

बायको: बरं, नक्की कुठे आहात तुम्ही आता? 

नवरा: माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं. 

एकदम सन्नाटा 

दुसऱ्या सेकंदाला बायको: जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाची कारणं मला सांगु नकोस, समजलं ना. 


Sunday 16 April 2023

ऐकल्या विनोदा दंडवत


 19 वा अध्याय

एक उपदेशक आपल्यापुढे जमलेल्या लोकांना म्हणाला," बंधूंनो, आजचा माझा उपदेशाचा विषय आहे, खोटी माणसे!

  'जो माणूस खरं बोलत नाही त्याचा खोटारडेपणा कधी ना कधी उघड होतोच!'

 'तर सांगा बरं, तुमच्यापैकी कितीजणांनी गीतेचा १९ वा अध्याय वाचला आहे ?'

 जवळजवळ सर्वांनीच हात वर केले. उपदेशक म्हणाले, आपण सर्व अशी माणसे आहात ज्यांना उपदेशाची  नितांत गरंज आहे, कारण गीतेत १९ वा अध्यायच नाही.'

®®®®®®®®®®©©©©

एका गोष्टीवर कोणी  विश्वास ठेवेल का?

रवीला नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये उशीर झाला होता. बॉसने दारातच गाठलं. “काय ? आज पण उशीर ? आज काय थाप मारणार आहेस नवी ? का उशीर झाला?" 

 “थाप नाही साहेब, मी आज एकदम खरं खरं सांगेन.” रवी म्हणाला, “आज मी खरं तर वेळेच्या आधीच पाच मिनिटं तयार झालो होतो आणि मी निघणार, एवढ्यात अचानक माझी बायको म्हणाली, “जरा पाच मिनिटं थांबता का, मला शॉपिंगला जायचंय तेव्हा मी आता तयार होते आणि तुमच्याबरोबरच निघते.” माझी बायको पाच मिनिटांत तयार झाली. मग आम्ही दोघं स्कुटरवरून निघालो. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक आला. तो ट्रक आमच्यावर आदळणार इतक्यात आकाशातून एक देवदूत आला आणि त्याने आमच्यासकट स्कूटर उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली. मग मी ३०० च्या वेगाने स्कूटर चालवत होतो, पण अचानक ट्रॅफिक-जाम झाला.  मग मी देवाचा धावा केला. तो काय! प्रत्यक्ष देवाने आकाशातून येऊन  मला आपल्या ऑफिसच्या गच्चीवर आणून ठेवले आणि मी तिथूनच येतो आहे! त्यात थोडा उशीर झाला एवढंच”  हे ऐकून बॉस मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, “अरे, इतकी सगळी सुसंगत गोष्ट तयार केलीस, पण एका गोष्टीवर कोणी  विश्वास ठेवेल असं वाटतंय तुला ? अरे, कुठली तरी बाई पाच मिनिटांत बाहेर जायला तयार होऊन येईल का?” 

Thursday 6 April 2023

भुतांचा विनोद


भुताचा सिनेमा पाहून झाल्यावर चाललेला संवाद...

बायको-अहो!! माझ्याकडे तोंड करुन झोपा ना मला खूप भीती वाटतेय...

नवरा-म्हणजे आता मी भितीन मरायच का...?

★★★★★★★

शेजारच्या घरात खेळायला गेलेल्या मुलीचा आवाज ऐकून आई धावत तिथे जाते.मुलगी फरशीवर गडाबडा लोळत असते..

"अहो तुमच्या मुलीच्या पोटात खूप दुखतय..."शेजारीन तिला उठवत म्हणते...

"मेलीला किती वेळा सांगितलय एका वेळी एकच माणूस खात जा म्हणून..."रागारागात आई तिच्या पोटदुखीचे रहस्य सांगून टाकते...

★★★★★★★

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार ते जोडप आज स्मशानात आल होत.ते ही अमावस्येच्या मिट्ट काळोखात.काव्यात्मक भाषेत बोलणार्या प्रियकराची भाषा प्रेयसीला समजत नव्हती..

प्रियकर-"प्रिये चल आपण कुठेतरी दूर दूर निघून जाऊ... या दृष्ट पापी जगापासून दूर...क्षितीजाच्या पलीकडे... इंद्रधनुष्याच्या राज्यात..."

"म्हणजे रे कुठे...?"चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणत प्रेयसी म्हणते..

"अग!! ढगात जायच म्हणतय ते येड..."शेजारील कबरीतून बाहेर येत एक सांगाडा तिला म्हणाला

★★★★★★★

दोन वेड्यांचं संभाषण

पहिला वेडा-तुझी बायको तुला रात्रीच का दिसते..

दुसरा वेडा- काय माहिती मरण्या अगोदर दिवसापण दिसायची

★★★★★★★

अॅक्सीडेंटमध्ये जीव गेलेले पती पत्नी भयानक भूत बनतात.भूत बनल्यावल तब्बल एक वर्षांनी एकमेकांना भेटतात...

पत्नी-किती बदललास तू भूत बनल्यावर काळ्या कोळशा सारखा झालास...

पती-तू जराही बदलली नाहीस.पहीली पण हडळी सारखी दिसायची आता पण तशीच दिसतेस...