Sunday 26 April 2020

पोट धरून हसा

औषध
राम: अरे, पूर्वी माझी बायको सारखी चिडचिड करायची.
श्याम: मग तिला कोणी बरे केलं?
राम: डॉक्टरांनी!
श्याम: कोणतं औषध दिलं त्यांनी?
राम:काही नाही, ते फक्त इतकंच म्हणाले, की म्हातारपण जवळ आलं की अशी चिडचिड होतेच.


आलं
(चंदूच्या लग्नात)
चंदू: अरे नंदू, या पोत्यांमध्ये काय घेऊन आलायस तू?
नंदू: अरे, आलं आणलंय.
चंदू: आलं? कशासाठी?
नंदू: अरे, तूच म्हणायचास ना, की माझ्या लग्नाला आलं पाहिजे म्हणून!

मारामारी
शिक्षक: राजू, तुझी गृहपाठाची वही कुठेय?
राजू: मोहितशी मारामारी करताना फाटली.
शिक्षक: पण तू मोहितशी मारामारी का केलीस?
राजू: कारण तो म्हणत होता, की तुम्ही चांगलं शिकवत नाही.

आवाज
पिंकी: रवी, तू इतक्या जोरात ओरडत कुठं जातोयस?
रवी: माझा आवाज कुठपर्यंत पोचतोय ते पाहतोय.

काय खाशील?
केदार आपल्या मित्राकडे गेला होता. गप्पा झाल्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला,"काय खाशील?"
केदार: लाईट खाईन.
मित्र:(आपल्या मुलाला उद्देशून) बाळा, जा रे काकासाठी चार-पाच ट्यूब घेऊन ये. हा लाईट खाणार आहे.

वडील:बंड्या, आज शाळेत खोड्या काढल्या नाहीस ना कोणाच्या?
बंड्या: नाही बाबा, आज मी शांतपणे बाकावर उभा होतो.

हत्ती
शिक्षक: (वर्गात विद्यार्थ्यांना विचारतात) काय रे मुलांनो, हत्ती कुठे सापडतात?
विद्यार्थी: सर, हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे, की तो हरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...

1 comment: