Friday 24 April 2020

पोटभर हसा 2

पेपर
आई: सोनू, बाहेर जाऊन शिट्टी वाजव, बाबांना पेपर वाचता येत नाही.
सोनू: आई, मी दहा वर्षांचा असूनही सगळा पेपर वाचू शकतो आणि बाबांना अजून पेपर वाचता येत नाही?


गणिताचे पुस्तक
मिनी: गणिताचे पुस्तक इतके रटाळ का वाटते, सांग पाहू!
विकी: माहीत नाही,
मिनी: कारण त्यात फक्त प्रश्नच असतात.

हवा
पोलीस (रात्रीच्या वेळी): काय ओ, तुम्ही रात्री कार चालवताय आणि गाडीचे दिवे का नाही लावलेले?
गाडीवाला: दिव्यांची काय गरज?रस्त्यावर इतके दिवे आहेत ना! (पोलीस त्याच्या गाडीच्या चाकातली हवा काढून टाकतो.)
गाडीवाला(घाबरून): अहो, हे काय? माझ्या गाडीच्या चाकातली हवा का काढलीत?
पोलीस: हवेची गरजच काय? बाहेर इतकी हवा आहे ना!

डोळ्याचा आजार
एक माणूस धावत धावत येतो आणि विचारतो,"डॉक्टर, लवकर सांगा मला कोणता आजार आहे?"
"तुम्हाला डोळ्यांचा आजार आहे."
"कसे काय?"
"कारण तुम्ही दवाखान्यात न जाता न्हाव्याच्या दुकानात आला आहात."

एकच कुत्रा
बाई: पिंकी, तुझा आणि निकीचा 'माझा प्राणी' निबंध एकसारखाच कसा काय आहे?
पिंकी: कारण आम्ही एकाच कुत्र्यावर लिहिलाय.

आकडे
गणिताचा तास सुरू असतो.
बाई: बंडू, तुझे लक्ष कुठे आहे? सांग पाहू, 4,28 आणि 44 हे काय आहेत?
बंडू गडबडून उभा राहतो
बाई: लवकर सांग.
बंडू: कार्टून नेटवर्क, डिस्कव्हरी आणि पोगो.

गोड बोलणं
मनी: ए दादा, लठ्ठ माणसे नेहमी गोड का बोलतात?
दादा: कडू बोलून त्यांना पटकन पळता येत नाही म्हणून!

सोन्याचे नाणे
पेशंट: डॉक्टर, लवकर माझ्या पोटातून सोन्याचे नाणे बाहेर काढा.
डॉक्टर: केव्हा गिळले आहे तुम्ही नाणे?
पेशंट: पाच वर्षांपूर्वी
डॉक्टर: अहो, मग तेव्हाच का नाही काढले?
पेशंट:कारण तेव्हा मला पैशांची गरज नव्हती.


आरसा
सोनू:आई, मी तुला वाढदिवसाला आरसा देणार आहे.
आई: अगं, पण माझ्याकडे आरसा आहे.
सोनू: तो मी मगाशीच फोडला.

श्वास
जगातील मृत्यूचे प्रमाण हा विषय शिक्षक शिकवत होते.
 गुरुजी: मुलांनो, माझ्या प्रत्येक श्वासागणिक या जगात किमान एक माणूस मरतो.
चिंटू: मग तुम्ही सारखा श्वासच कशाला घेता, गुरुजी?

No comments:

Post a Comment