Monday 20 April 2020

काही आधुनिक म्हणी

काही आधुनिक म्हणी
* आपला तो खोकला , दुसऱ्याचा तो कोरोना
* थांब लक्ष्मी , हात धुवायला सॅनिटायजर देते
* कोरोनाचं पोर , अख्या गावाला घोर गर्वाचे घर लॉकडाउन
*  माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत
* नवरा वैतागला लॉकडाउनने , बायको वैतागली स्वंयपाकाने !
* आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा
* इकडे बायको तिकडे पोलीस

********
बाहेर कोरोना घरात करमेना १ . ५ जीबी नेट पुरेना आता काय करावे कळेना . तुम्हालाही काही सुचेना मी काय करावे ते पण कळेना नक्की कोरोना काय करतोय ते कळेना . मार खाणारयांना आपले दुखत आहे हे कसे सांगावे ते पण कळेना . मार न खाणाऱ्यांना आपण घरात बसून राहवे कि बाहेर जावे हे पण कळेना . आधी नाष्टा करावा का जेवण करावे ते ही कळेना . झोपेतून उठलो आहे की झोपायची तयारी चालली आहे ते पण कळेना . माझ्यामधील कवी जागा झाला आहे की मेंदूवर परिणाम झाला आहे तेही कळेना . . .
*********
आज जर तुम्ही ५० तोळ्याची चेन घालुन फिरला तरी कोणीही विचारणार नाही कोठे बनवली . पण जर तुम्ही केस कापून रस्त्यावर फिराल तर पन्नास जण विचारतील कोठे कापले बाबा ?
 * * * *
 पोलीस दंडुके मारतानाचे व्हिडिओ कृपा करुन पोस्ट करु नका ! बायको मुद्दाम सामान आणायला बाहेर पाठवते !
जगात जेवढे लोक कोरोनावर औषध शोधत आहेत ! महाराष्ट्रात त्यापेक्षा जास्त लोक दारू , गुटखा , अन् तंबाखू शोधत आहेत .

No comments:

Post a Comment