Friday 24 April 2020

पोटभर हसा

फटका
बाबा: राजू, आता दंगा केलास तर इतक्या जोरात फटका मारेन, की तू उडून थेट रस्त्यावर जाऊन पडशील.
राजू: थोडं आणखी जोरात मारा, मला पालिकडाच्या दुकानात जायचं आहे.


पुस्तक
मिनू:आई, तू कधी असं पुस्तक पाहिलं आहेस का, की ज्यात कविता नाहीत,गोष्टी नाहीत,धडे नाहीत आणि विनोदही नाहीत...
आई: हट वेडे!असं कधी पुस्तक असतं का?
मिनू: हे काय ,गणिताचं पुस्तक

वाघ
जंगलात बन्याला वाघ पकडतो आणि म्हणतो,"आज मी तुझं रक्त पिणार आहे....!
बन्या: पण तुला पाहून माझं रक्तच थंड होऊन गेलंय. वाघ: काही काळजी नाही, आज मलाही काही तरी थंडगार प्यावंस वाटतंय.

विमानाचा शोध
चिंटूचे वर्गात लक्ष नसते.
शिक्षक: चिंटू, सांग पाहू विमानाचा शोध कोणी लावला?
चिंटू: मला माहित नाही.
शिक्षक: मागच्या बाकावर जाऊन उभा राहा.
चिंटू: (आधीच मागे उभ्या असलेल्या गणूला विचारतो.) उत्तर नाही आलं ,तर गुरुजी आपल्याला मागच्या बाकावर का उभं करतात?
गणू: अरे, पुढच्या बाकावरील मुलांना फळा दिसावा म्हणून..!

No comments:

Post a Comment