Thursday 30 April 2020

हास्य-गुदगुल्या

एका हॉलीवूडच्या प्रसिद्ध नटीचे सतरावे लग्न होते व
त्यांचा समारंभ चर्चमध्ये चालला होता. पादरीसमोर नेहमीप्रमाणे एकनिष्ठतेच्या आणाभाका झाल्यावर चर्चच्या पायऱ्या उतरताना आपल्या नवीन नवऱ्याला समज देण्यासाठी नटीने जरा घुश्श्यात सांगितले, "हे पाहा..." तिला मध्येच थांबवून नवीन नवरा म्हणाला, "प्रिये, आता बोलण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपण
आपला मधुचंद्र ताबडतोब उरकून घेऊया. मीसुद्धा बराच अनुभवी आहे. तुझा सहावा किंवा सातवा नवरा मीच होतो."

॥।।।।।।।।।।।।।।
आई-अरे, रमेश सासुरवाडीला काय केले होते जेवायला
सासूबाईंनी?
रमेश- अग काय सांग, मुगाची उसळ, मुगाचे वडे आणि
मुगाची खिचडी.
आई- अरे, पण तुला तर मूग आवडत नाहीत, मग काय
केलेस?
रमेश- काय करणार, मूग गिळून गप्प बसलो आपला.
II।।।।।।।।।।।।।।
नम्रताची शाळेची बस चुकली. आईने शेजारी नवीनच
राहायला आलेल्या शरदला, तिला बाईकवरनं सोडायला सांगितलं. ती बाईकवर बसली आणि तिने रस्ता सांगायला सुरुवात केली. डावीकडे, उजवीकडे, सरळ, पून्हा डावीकडे, उजवीकडे, असं फिरत फिरत नम्रता तासाभराने शाळेत पोहोचली. बाईक चालवून शरद पण दमला. शरद शाळेत पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला. नम्रताची शाळा घरापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर होती. तो वैतागून म्हणाला, "काय ग नमे, तुझी शाळा तर इतकी जवळ आहे. मग मला इतकं फिरवलंस का?"
"अरे दादा, पण माझी शाळेची बस तर रोज अशीच जाते ना..." नम्रता किरकिरली.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
उशिरा कार्यालयात येणाऱ्या सेक्कवर्गान नोंदवहीत उशीर का झाला याची कारणेही लिहावीत, असा एका कार्यालयात नियम होता. एकाने लिहिले. 'पत्नी बाळंत झाली. जुळे झाले.'
नंतर आलेल्या नऊजणांनी 'तेच' असे लिहिले.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
मुलीचे वडील- वहिनी, माझी मुलगी, पूर्वीच्या,
व्हफा(व्हर्नकुलर फायनल) परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेली आहे, बोलकी आहे, एका हाताची थुकी दुसऱ्या हातावर करण्यातही हुशार आहे. शिवाय, सत्याची तिला चाड आहे. तुमचा मुलगा वकील आहे; म्हणजे, दोघांचे सहज जमून जाईल. म्हणून सांगतो, कसेही करून माझ्या सुकन्येला तुम्ही पदरात घ्या.
वहिनी- घेतलं असतं हो, पण, मी गेली कित्येक वर्ष फक्त पंजाबी ड्रेसच वापरते, त्याला पदर नसतो; नाही तर नक्की घेतलं असतं.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।
ठोंबरेबाईचं कसलं तरी पोटाचं ऑपरेशन करायचं ठरलं. सर्जन नामांकित होता. तो बाईंना म्हणाला, "हे पहा, ऑपरेशनच्याच दिवशी आम्ही तुम्हाला थोडंसं चालायला लावू. दुसऱ्या दिवशी तुमच्या खोलीतच एक चक्कर मारायला सांगू, तिसऱ्या दिवशी एक तास..."
डॉक्टरांना मध्येच थांबवून ठोंबरेबाई उद्गारल्या, "अगंबाई, म्हणजे माझं ऑपरेशन तरी तुम्ही मला झोपवून करणारात कीनाही?"
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
हवामान खात्याच्या तज्ज्ञाची नागपूरला बदली झाली. "बरं झालं बाई! नाही तर मुंबईत हवामान तुमचं बिलकुल ऐकत नव्हतं!" तज्ज्ञाची बायको म्हणाली.
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
पिताजी मृत्यूचे अखेरचे क्षण मोजीत होते. त्यांच्याजवळ बसून त्यांची तीन मुलं चर्चा करीत होती.
मोठा मुलगा म्हणाला, "तर मग आपण अॅम्ब्युलन्स मागवूया."
"छे! छे! अॅम्ब्युलन्स फार महागात पडेल, आपण
रिक्शातून घेऊन जाऊ."
"त्या ऐवजी आपण खांद्यावरून घेऊन जाणे चांगले,"
तिसरा म्हणाला.
त्या मुलांचं बोलणं ऐकून पित्याला राहावलं नाही. तो
म्हणाला, “माझ्या चपला आणि काठी आणून द्या. मी स्वतःच स्मशानाकडे चालत जाईन." (संकलित)

No comments:

Post a Comment