Wednesday 29 April 2020

हास्य जत्रा

दारूचे गोडावून
शहराच्या एका दारूच्या गोडावूनला आग लागली.त्या गोडावूनमध्ये रॅम,व्हिस्की,बिअर, ब्रॅंडी वगैरे प्रकारची दारूची खोकी खचाखच भरली होती.
कोणीतरी फायरबिग्रेडला फोन केला.फायर ब्रिगेडचे जवान आले आणि त्यांनी शर्थीचे प्रयन्त करून एका तासात आग काबूत आणली. पण त्यानंतर फायरबिग्रेडच्या जवानांना काबाईत आणण्यास चार तास लागले.
*******
अपेंडीक्स
"तुम्ही त्या नव्या पुस्तकाचे शेवटचे पान का फाडले?" ग्रंथपाल
डॉक्टर;त्यावर 'अपेंडीक्स' असे लिहिलेले होते म्हणून...
*******
प्रेमानं वेडापिसा झालेला एक युवक मानसोपचार तज्ज्ञांकडं गेला व म्हणाला," डॉक्टर, मला दररोज एक स्वप्न पडते की मी बारा स्त्रियांबरोबर जहाजात बसून समुद्रातून प्रवास करतो आहे आणि ते जहाज समुद्रात बुडते."
"तर मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे?" डॉक्टर म्हणाले.
"आहे तर!समजा ते जहाज न बुडता समुद्राच्या किनाऱ्याला लागले तर त्या बारा बायकांना खायला कुठून आणू? त्यांना लागणाऱ्या साड्या कुठून आणू? आणि हा सर्व खर्च मला परवडणार कसा?"
*******
लाकडाची वखार
"हॅलो! आयकर खात्याचे ऑफिस ना?"
"होय बोला काय काम आहे?"
"एक पक्की खबर द्यायची होती!"
"कोणती?कोणाबद्दल?"
"आपल्या विद्यानगर मार्गावर मोऱ्याची लाकडाची वखार आहे ना, त्यात त्यांनी काही लाकडाच्या ओंडक्यात ,चोरीचे हिरे लपवून ठेवलेत.बघा धाड टाकून."
लगेच आयकर वाल्यांची मोठी टोळी मोरयांच्या वखारीत गेली.सगळ्या ओंडक्यांचे अगदी बारीक बारीक तुकडे केले. पण एकही हिरा सापडला नाही.सगळे चरफडत परत गेले.
संध्याकाळी मोरयांकडे फोन आला,"काय मोरेसाहेब,गोरे बोलतोय. आयकर खात्याने तुमची सगळी लाकडं फोडून दिली ना? फुकट!"
"होय, अगदी वर्षांची बेगमी झाली.धन्यवाद!"
"अहं, नुसते धन्यवाद नकोत.आता फोनवरून पक्की खबर द्यायची पाळी तुमची! मला माझ्या घराजवळची सारी जमीन नांगरून हवी आहे!काय समजलं? विनासहकार नहीं उद्धार!" हसत हसत तात्या गोरे म्हणाले.
*******
दारुडे बेवडे
एकदा दोन दारुडे रस्त्याने चालले होते! ते डुलत डुलत एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला व दुसऱ्या बाजूवरून पहिल्या बाजूला असे करत होते. इतक्यात एक वृद्ध गृहस्थ त्या रस्त्यावरून जात होते. त्यांनी त्या दारुड्यांना विचारले,"अरे,तुम्ही हे काय करीत आहात!"
त्यावर ते दारुडे म्हणाले,"आम्ही रस्त्याचे माफ घेत आहोत."
*******
धुलाई
मनाने खरेदी केलेला पाच किलोच्या डिटर्जंटचा पॅक पाहून सुपरमार्केटच्या मॅनेंजरने आपल्या या नेहमीच्या ग्राहकाला विचारले,"काय मॅडम, बरीच धुलाई करायची दिसतेय!"
"नाही हो.!" मोना उद्गारली,"माझा टॉमी छान पामेरियन आहेच, तो फार मळलाय म्हणून..."
"पण मॅडम, ही पावडर त्याला अपायकारक आहे,कदाचित त्याचं काही बरं-वाईट होऊ शकेल." पण ऐकेल तर ती मोना कसली! ती ते घेऊन गेलीच.एका आठवड्याने मोनाला खरेदी करताना पाहून मॅनेंजरने टॉमीबद्दल विचारले.तेव्हा मोना म्हणाली,"तो मेला हो."
त्यावर मॅनेंजर  तिला म्हणाला,"सॉरी मॅडम, पण तुम्हाला तेव्हाच सांगत होतो की , ती डिटर्जंट टॉमीसाठी योग्य नाही."
मोना: नाही हो, तो डिटर्जंटमुळे नसेल मेला."
मॅनेंजर: (चक्रावून)मग कशामुळे?
मोना: मला वाटतं वाशिंग मशीनमध्ये दोन-तीनदा खळबळल्यामुळे.
*******
दरोडा
तो बंदूकधारी बँकेत घुसला आणि हवेत बार उडवीत त्याने पैशांची मागणी केली. तिथे जमा असलेली सगळी रोकड घेऊन तो जायला निघाला. तोच वळून त्याने तिथे भीतीने थरथरत असलेल्या एका ग्राहकाला विचारले,"तू मला बँक लुटताना पाहिलंस?"
"हो ना! ते ग्राहक कसेबसे बोलले. त्या दरोडेखोराने त्याच्या कपाळावर नेम धरून त्याला मारून टाकले.
तोच, त्याचे लक्ष एका जोडप्याकडे गेले. "तुम्ही पाहिलंत मला,चोरी करताना?" त्याने दरडावत विचारले.
"मी नाही पाहिले!" तो  पुरुष म्हणाला,"पण माझ्या बायकोने नक्कीच पाहिलंय!" (संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे)

No comments:

Post a Comment