Sunday 3 May 2020

कोरोना!कोरोना विनोद

पत्नी: लॉकडाऊन उठल्यावरसुद्धा तुम्ही कामाला जायचं नाही. मी तुम्हाला जाऊच देणार नाही.
पती: का?
पत्नी: मला त्या कामवालीपेक्षा तुमचे काम आवडले आहे.

।।।।।।।।।।।।
पत्नी – अहो ऐकताय का? तुम्हाला ना ऑफिसची काळजी आहे,पण घराची मात्र अजिबात काळजी नाही.
पती- का काय झालं?
पत्नी- मला वाटतं आपल्या मुलीने बाहेर कुठे तरी सेटिंग लावली आहे.
पति – तुला कसं कळलं?
पत्नी- अलिकडे मोबाईल रिचार्जिंगसाठी पैसेही मागत नाही ती...!
पती कोमात....
।।।।।।।।।।
बापाने  पाहिलं की आपला मुलगा पँटीला सुई दोऱ्याने टाके घालतो आहे.....
बाप- राहुल , तुझं लग्न केलं आहे, सून घरी आली आहे आणि तरीही तू तुझ्या पँटीचे बटन लावतो आहेस...?
राहुल- बाबा, तुम्ही चुकीचा विचार करताय, ही पॅन्ट ना तिचीच आहे...
।।।।।।
बायको आयसीयूमध्ये होती.
नवऱ्याची रडून रडून वाईट अवस्था झाली होती.
डॉक्टर म्हणाले,", आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण ती बोलतच नाही. कदाचित ती कोमामध्ये गेली आहे. आता तर सगळं काही परमेश्वराच्या हातात आहे.
नवरा म्हणाला,"अहो ती आताची कुठे 40 ची आहे...
तेवढ्यात एक चमत्कार घडला. हृदयाचे ठोके वाढू लागले. बायकोची बोटे हलली. ओठ हलले आणि आवाज आला,"40 नाही 36 ची!"
।।।।।।।।।।।।
दोघा मित्रांचे बोलणे सुरू होते...
पहिला मित्र- मी सध्या स्टेज-3 मध्ये आहे. पहिल्या स्टेजमध्ये
भांडी घासली. दुसऱ्या स्टेजमध्ये स्वयंपाक केला आणि आता तिसऱ्या स्टेजमध्ये कपडे धुतोय. आणि तू?
दुसरा म्हणाला- मी लाटण्याचा मार खाल्ला पण काम केलं नाही... कारण मित्रा, कोरोना काय थोड्या दिवसाने जाईल,पण एकदा का बायकोला कळलं की याला सर्व काही येतंय... तर मग सगळं आयुष्यभर करावं लागेल.
।।।।।।
पती- तू कुठे आहेस?
पत्नी- तुमच्या हृदयात...
पती- तुला कितीदा समजावून सांगितलं की गर्दीच्या ठिकाणी जात जाऊ नको म्हणून पण तू ऐकतच नाहीस...
।।।।।
रामायणाच्या एका पात्राचे अनुसरण केल्यास आपण कोरोनाला 100 टक्के मात देऊ शकतो.
ते पात्र आहे कुंभकर्णाचे!
।।।।
एक माणूस कोरोनाने मेला. स्वर्गात गेल्यावर त्यानं देवाला विचारलं," देवा, मला वाचवायला का नाही आलात...?
देव म्हणाला,"अरे मूर्खां! कधी पीएम बनून, कधी सीएम बनून ,कधी पोलीस बनून ,कधी नगरपालिकेचा कर्मचारी बनून असे तुला वीस वेळा  सांगायला आलो . बाबा रे, घरात बस, सुरक्षित राहशील, पण तू समजूनच घेतलं नाहीस? आणि तू असा कोण अर्जून लागून गेलास की तुला माझं विराट रूप दाखवावं...
।।।।।
नवरा- आज खायला काय  करते आहेस?
बायको- बटाट्याची भाजी बनवतेय. पण मला अजूनपर्यंत कळत नाही की बटाटे अजून का पिकत नाहीत!
नवरा- मग तू असं का करत नाहीस?
बायको- काय करू?
नवरा-तू थोडा वेळ बटाट्याशी पक पक कर म्हणजे ते पकुन जातील, म्हणजे पिकून जातील
।।।।।।।
विद्यार्थी शिक्षिकेला : Miss, तुम्ही मला काल फोन केला होता का?
शिक्षिका- नाही तर...!
विद्यार्थी- कमाल आहे!... माझ्या फोनवर तर लिहिलं होतं-  Miss Call

No comments:

Post a Comment