Monday 11 May 2020

हास्यरंग

एका ऑफिसात एक विचित्र स्पर्धा लागली. जास्तीतजास्त कोण खाऊन दाखवतो याची! एका माणसाने पंधरा डोसे, वीस इडल्या, दहा कप कॉफी, तीन सामोसे एवढं खाऊन बक्षीस जिंकले.
बक्षीस स्वीकारताना तो म्हणाला," हे कृपया माझ्या घरी कळू देऊ नका. नाहीतर मला घरी गेल्यावर जेवायला मिळणार नाही."

((((((()))))))))
राजू- "आई मी मित्रांसोबत पोहणे शिकायला जाऊ?
आई- "नको. तू आधीच तडफड्या . जीव जायचा एखादे वेळी."
राजू- "मग बाबा कसे पोहायला जातात?"
आई- "त्यांचे ठीक आहे. त्यांचा विमा काढला आहे.'
(((((((((((((())))))))))))))
जंगलात वाघीण तिच्या बछड्यांसोबत खेळत होती. बछडेही आता वयात येऊ लागले होते. शिकार वगैरे कळू लागली होती. पाण्यासाठी त्यांना गावाच्या जवळच्या भागात राहावे लागायचे. ते बसले होते. तिकडून एक माणूस जाताना बछड्यांना दिसला. लहानगा मोठ्याला म्हणाला, "दादा, हा माणूस बेअक्कल आहे. साला आपण इकडे असतो हे माँहीत असूनही इकडून जातो आहे.''
त्यावर मोठा बछडा म्हणाला, "नालायकच असतात ही माणसं. येऊ दे त्याच्या नरडीचाच  घोट घेतो. माणसाची जातच हरामी." त्याचे
बोलणे ऐकणारी आई वाघीण म्हणाली, "अरे,  अन्नाला अशी नावं ठेवू नये!"
((((((((()))))))))
 एकदा धर्मेन्द्रच्या घरात चोर शिरतो.  धर्मेन्द्रला जाग येते आणि तो नेहमीच्या सवयीनुसार ओरडते, "कुत्ते... कमीने."
चोर शांतपणे म्हणतो, "ठीक आहे. कमी  नेतो."
((((((())))))))
 गोटू-"आई मी जरा संजूच्या घरी जाऊन  एक पुस्तक घेऊन येतो हं."
आई- "जा, पण मोटारगाड्या गेल्यानंतरच  रस्ता ओलंड."
आई-(अर्ध्या तासानंतर) "अरे अजून तू गेला  नाहीस?"
गोटू- "अगं आई, रस्त्यावरून एकही गाडी  गेली नाही."
(((((()))))))
"तुझा फोन नंबर देशील ना?"
"तो टेलिफोन डिरेक्टरीत आहे."
"तुझे नाव सांग."
"तेही त्याच पुस्तकात आहे."
(((((()))))))
."माझे वडील बोलतात, तेव्हा सर्व जग ऐकते."
"ते कोण आहेत? राष्ट्रपती की पंतप्रधान?"
"ते दूरदर्शनवर वृत्तानिवदक (बातम्या सांगतात) आहेत.'
(((((((())))))))
एक टॅक्सी ड्रायव्हर खूप जोरात गाडी चालवत होता. मोठ्या वळणावरदेखील तो गाडी हळू करत नव्हता. अखेर घाबरलेल्या एका प्रवाशाने सांगितले,"अहो ड्रायव्हर, गाडी जरा हळू चालवा ना? वळणावर देखील तुम्ही गाडीचा वेग कमी करत नाही. आम्हाला त्याची भीती वाटते."
त्यावर ड्रायव्हर म्हणाला,"काही काळजी करू नका.वळणावर ज्याप्रमाणे मी डोळे बंद करून घेतो तसे तुम्ही पण डोळे बंद करीत जा."
((((((())))))))
दिवाळीचा फराळ घरात सुरू होता. त्यामुळे राधाबाईने मुलास आगगाडी खेळायला देऊन त्याला बाहेर खेळायला पिटाळले. पण थोड्याच वेळात चिरंजीवांची स्वारी गाडी ओढत ओढत स्वयंपाक घराच्या दाराकडे येऊ लागली. तेव्हा...
राधाबाई- आता इकडे कशाला आणलीस आगगाडी? जा, तिकडे बाहेर खेळ जा.
मुलगा-बाहेर कोठे जा? या स्टेशनावर आमची आगगाडी प्रवाशांचा फराळ होईपर्यंत अर्धा तास थांबणार आहे.
((((((())))))))))

No comments:

Post a Comment