Sunday 17 May 2020

पोट धरून हसा

घाई
डोळ्यांसमोर गाडी गेली. आता पुण्याला जायला पुढची गाडी तीन तास नव्हती. शंकररावांनी हातातली अवजड सामानाकडे बघितलं. धावून थकलेल्या आपल्या पायांना बघितलं. धाप लागलेल्या आपल्या छातीकडे दृष्टी टाकली आणि ते किरकिरले, "लता, तुझं नटणं-मुरडणं आणि सामानाचा सोस यामुळे ही गाडी चुकली, तरी मी किती वेळा पुन्हा पुन्हा सारखा तुला घाई करत होतो. आटप म्हणत होतो."
लतिका फुणफुणली, "ही सगळी तुमच्या घाई करण्याची करणी आहे. आता बसा तीन तास वाट पाहात. माझ्या मागे घाई लावली नसती तर मी माझ्या गतीनं ,आरामात आवरलं असतं तर या पुढच्या गाडीकरिता एवढं तीन तास ताटकळायला लागलं नसतं. आता भोगा आपल्या घाईची फळं!"
&&&&&&&
आश्चर्य
मध्यरात्र झाली होती. मिलिंद जागा झाला आणि थेट पाळण्यापाशी गेला.
मधुचं व मिलिंदचं पाहिलं गोजीरवाणं अपत्य जुई पाळण्यात गाढ झोपलं होतं. मिलिंदने पाळणाभर नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर भावनांचा थवा उतरला.
अविश्वास, संशय, आनंद, साश्चर्य, तृप्ती, कृतकृत्यता हे सगळे भाव आलटून पालटून त्याच्या चेहऱ्यावर थुईथुई नाचत होते.
मागं मधुराणी केव्हा येऊन उभी राहिली हे मिलिंदला समजलंसुद्धा नाही.
"किती छान आहे नाही?" मधुराणीनं लाडिक स्वरात मिलिंदला प्रीतीची साद घातली.
"होय ना! आणि एवढ्या सुंदर पाळण्याची किंमत फक्त सव्वाशे रुपये? हे मला खरं वाटत नाही," मिलिंद पुटपुटला.
&&&&&&&&&
रहस्य
"घारोपंत व प्रमिलाबाई पहिली पुरी बावीस वर्षे चांगले सुखात होते."
"पण मग काय झालं?"
"काय होणार? त्यांची ओळख झाली. ते नवरा-बायको झाले आणि हं, मग सगळंच संपलं!"
&&&&&&&&
स्त्रीचं वय
स्त्री जन्माला येते तेव्हा मूल असते, मग बाळ होते, मग बाला होते, कुमारिका असते, मग युवती होते आणि विवाह झाल्यावर अखेरपर्यंत ती युवती, युवती आणि युवतीच राहते!
भामाबाईंना सहा मैत्रिणी आहेत आणि त्यांना सात वयं आहेत.
भामाबाई एक वय सांगतात, त्यांची बाकीची सहा वयं त्यांच्या मैत्रिणी सांगतात.
&&&&&&&
गुरूजी : हॉटेल मधली झाडे वाढत का नाहीत ?
गण्या : कारण हॉटेल मध्ये वाढायला वेटर असतात.
&&&&&&&
तेजस : काय रे मित्रा, तुला काय वाटतं. खरंच का कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आणि असं असेल तर यशस्वी कंपन्यांच्या मागे कोण असतं असं तुला वाटतं. या झोमॅटो आणि स्विगीच्या यशामागे कोण आहे सांग पाहू?
राहुल : हे बघ दोस्ता..झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांच्या यशामागे कुणा एका स्त्रीचा हात नाही तर हजारो आळशी स्त्रियांचा पाठिंबा आहे त्यांना..
&&&&&&&
पत्नी : 'अहो, ऐकलं का? कुठे आहात तुम्ही? जरा लवकर बाहेर या. आज किनई, मला महिला मंडळात तीन बक्षिसं मिळाली.'
पती : 'अरे व्वा! कुठली सांग ना..'
पत्नी : 'सांगते ना, पहिलं वक्तृत्वात, दुसरं स्मरणशक्तीमध्ये आणि तिसरं...अं..अं.. जाऊ दे बाई, मेलं आता नाही आठवत..
&&&&&&&
विमलकाकू - काय हो , तीस वर्षांचा झाला तरी तुमच्या बाळ्याला अक्कल कशी ती नाही आली अजून?
यशोदाकाकू - त्याचा काही दोष नाही हो. त्याला विसाव्या वर्षीच अक्कलदाढ आली आणि दातांच्या डॉक्टराने शेजारच्या दुखर्‍या दातावर उपचार करताना चुकून अक्कलदाढच काढली. मग तो बिचारा तरी काय करणार?
&&&&&&&
बंडोपंत : वेडिंग आणि वेल्डिंगमध्ये काय फरक आहे?
रामराव : वेल्डिंगमध्ये आधी ठिणग्या पडतात आणि नंतर जोड बनतो, वेडिंगमध्ये आधी जोडा बनतो आणि नंतर ठिणग्या पडतात.
&&&&&&&

No comments:

Post a Comment