Tuesday 26 May 2020

हास्य विनोद ...

गोष्ट आहे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते. तेव्हाची, भारताला २१ व्या शतकात लवकर घेऊन जायचा त्यांचा निर्धार होता आणि त्या काळी नवीनच असलेल्या कॉम्प्युटरची मदत ते बारीक-सारीक कामांसाठी घ्यायचे. भारतात आतापर्यंत न झालेल्या सुधारणा त्यांनी करायच्या मनावर घेतल्या होत्या. त्याच निर्धारातून त्यांनी गंगा नदी शुद्ध करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला. प्रकल्पाला नाव काय द्यावं हे सुचवण्यासाठी त्यांनी आपल्या खात्यातल्या सगळ्या कॉम्प्युटरतज्ज्ञांना बोलावलं आणि सांगितलं, हे पाहा, हा खूप मोठा प्रकल्प आहे. तर आपण या प्रकल्पाचं नाव असं ठेवायचं की त्या नावातूनच सगळ्यांना या प्रकल्पाची माहिती मिळाली पाहिजे. एकंदरीतच चार मुद्दे महत्त्वाचे आहेत.
१) हा गंगा नदीचा प्रकल्प आहे. २) नदीचं पाणी आपण अडवणार आहोत. ३) ते पाणी जमिनीत जिरवणार आहोत आणि ४) ते पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करणार आहोत! कॉम्प्युटरतज्ज्ञांनी हे चारही मुद्दे कॉम्प्युटरला फिड़ केले आणि नाव सुचवण्यासाठी कळ दाबली.  प्रकल्पाला कॉम्प्युटरनी नाव सुचवलं गंगा-धर-गाड-गीळ!
●●●●●
एक दारुड्या रस्त्याने रात्री जात असतो. रस्त्यातील
एका विजेच्या खांबाला धडकतो व तिथे थांबून शिव्या देतो की, लोकांना अक्कलच नाही, रस्त्यात घरे बांधतात. एक सज्जन माणूस ते ऐकतो व त्याला समजावून सांगतो, तरीपण तो दारुड्या म्हणतो की, अहो, मी काय खोटं बोलतोय का? ती वर पाहा, वरच्या मजल्यावर लाईट चालू आहे की नाही?
●●●●●
श्री. रामराव व सौ. रमाबाई दुपारी गप्पा मारीत बसले
होते. तेवढ्यात त्यांचा गोटू शाळेतून घाईघाईत आला आणि थोडा घाबरल्या आवाजात सांगू लागला, 'आई-बाबा, मी पास झालो, परंतु एक गोष्ट फारच वाईट झाली.'
रामरावांनी विचारले, 'काय झाले बुवा?' 'अहो मी पास
झालो, परंतु मास्तर मात्र नापास झालेत. कारण त्यांना पुन्हा तिसरीचाच वर्ग मिळाला.
●●●●●
एका वर्गात : बाई म्हणतात, “मुलांनो, सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा."
एक मुलगा हात वर करून, “बाई, साप!"
बाई (समाधानाने) : अगदी बरोबर! आता दुसरे
उदाहरण... बावळट दिसणारा मुलगा हात वर करीत : बाई, दुसरा साप!
तिसरा चम्या दिसणारा मुलगा : बाई, तिसरा साप!!!
(वि. सू. : असे कितीही साप बाहेर काढून समोरच्याला 'आता शेवटचा' असे सांगून पिडता येईल.)
●●●●●
एक मुलगी मैत्रिणींना आपले मधले बोट दाखवून कोडं
घालते : माधुरी दीक्षित आंघोळ करताना 'हे' बोट भिजवीत नाही. सांगा, का?
सगळेजण चकित व गोंधळलेले. माधुरी दीक्षित आंघोळ
करताना मधले बोट भिजवीत नाही! काय भानगड कुणास ठाऊक? ती त्या बोटाचा काय उपयोग करते की ज्यामुळे ते ती भिजवीत नसावी? का बरं?
सगळे हारतात, विचारतात : आता तूच सांग.
ती मुलगी : कारण हे बोट 'माझे' आहे! तिच्या आंघोळीच्या वेळी ते माझ्याकडे असते ना म्हणून!!!
●●●●●
नवरा बायकोला : मी मेल्यानंतर तू पुन्हा लग्न करशील काय?
बायको : नाही, मी माझ्या बहिणीबरोबर राहीन, बरं, आता मला सांगा : मी मेल्यानंतर तुम्ही लग्न करणार काय?
नवरा : नाही, मीसुद्धा तुझ्या बहिणीबरोबरच राहीन.
●●●●●

No comments:

Post a Comment