Friday 22 May 2020

हास्य .... किस्से...

केक महागले आहेत
सकाळी सकाळी फिरायला- जॉगिंग करायला कर्नलसाहेब जात असत. परतीच्या वेळी कर्नलसाहेब त्या गरीब माणसाच्या केकच्या स्टॉलवरून जात असत. काऊंटरवर दोन रुपयांचे नाणे ठेवून केक वगैरे काहीच न घेता निघून जायचे. तेवढीच त्या गरिबाला मदत अशा
उदात्त हेतूने समाधान पावत होते.
त्या दिवशी असेच नेहमीप्रमाणे काऊंटरवर पैसे ठेवून कर्नलसाहेब माघारी वळले. इतक्यात ''सर- ओ सर" म्हणत स्टॉलवाला त्यांच्यामागे धावत आला.
"काय बाळ? मी केक वगैरे न घेताच नुसते पैसे ठेवून निघालो म्हणून आलास ना? अरे मी रोजच तसं करतो! अच्छा चालू दे तुझा धंदा! मला केक वगैरे काहीच नको असत- फक्त एका केकची किंमत मी ठेवून जात असतो" कर्नलसाहेब प्रेमळपणे हसून म्हणाले
"नाही नाही ते असू द्या. पण मला सांगायचं होतं हे की केकची किंमत कालपासून पाच रुपये झाली आहे!'

★★★★★
दिवसच फिरले
तुरुंगात नवीन आलेल्या त्या तरुण कैद्याला दुसरा अनुभवी कैदी समजूत घालून सांत्वन करीत होता.
"कशासाठी तुला पकडलं?'
नवीन कैदी- “चोरी करताना पकडलो गेलो.'
"एवढंच ना? सुटशील लवकर- हेही दिवस जातील- आता कधी कधी माणूस पकडला जातो. मग हे असलं जिणं येते नशिबी आता माझंच बधना! चांगला आरामात चंगळ करीत होतो- हवे तेव्हा हवे तेवढे पैसे बँकेतून काढत होतो."

नवीन कैदी- "अरे व्वा! म्हणजे- चांगलेच तालेवार आहात की तुम्ही ! पण मग इथे कसे? का म्हणून?"
"तेच तर सांगतोय! दिवस फिरले- अन् मालकाने त्यांचे क्रेडिट  कार्ड चोरीला गेल्याची पोलिसांत कम्प्लेट केली."
★★★★★
ब्रेक लावला
पी.टी. च्या तासाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, 'पाठीवर झोपा आणि सायकल चालवल्यासारखी पायांची हालचाल करा. आणखी फास्ट. आणखी फास्ट..'
चिंटूने मध्येच हालचाल बंद केली. कारण विचारल्यावर त्याने उत्तर दिले, 'सर माझी सायकल उताराला लागली, म्हणून ब्रेक्स लावले!'
★★★★★
भीतीचे कारण
मुलगी दुकानदार काका, तुमच्या दुकानात पुरुषांना गोरं करणारं क्रिम आहे का हो?
दुकानदार हो, आहे ना! पण तुला कशाला हवंय ते?
मुलगी दुकानात क्रिम आहे तर मग तुम्ही का लावत नाही ते. या दुकानात आलं की तुमचा काळा ढुस्स चेहरा बघून अगदी भीती वाटते.
★★★★★
पैसा कसा काढायचा?
मुलाने गिळलेले नाणे काढण्यासाठी एका माणसाने त्याला उलटे टांगले आणि मानेच्या मागच्या बाजूला एक दोन थापडा दिल्या. यावर मुलाच्या आईने आभार मानताच तो माणूस म्हणाला, मी काही डॉक्टर नाही. महानगरपालिकेत अधिकारी आहे. त्यामुळे खाल्लेला पैसा कसा काढायचा ते चांगलं जाणतो.
★★★★★
म्युझियम पहायला पत्नीला घेऊन गेलेला पती सर्व दालनं फिरून झाल्यावर पत्नीला म्हणाला,
"इथे जगभरातली इतकी प्राचीन शस्त्रास्त्रं दिसली, पण
मला वाटतं ही हत्यारे कमवणारे कारागीर नक्कीच अविवाहित असणार." पत्नीने विचारलं, "कशावरून हो?' "
"कारण यांमध्ये लाटणं कुठंही दिसलं नाही." पती उद्गारला.
★★★★★
एका डॉक्टरांनी केलेल्या एका संगीत मैफलीत पु. ल.
देशपंडे म्हणाले, "डॉक्टरांचा अनि संगीताचा इतका निकटचा संबंध कसा याचा मी विचार करतेय. मग मात्र समजतं 'राग आणि रोग' या फक्त एकाच मात्रेचा फरक आहे.'
★★★★★
सुंदर, सुदृढ, बांधेसूद, हुशार, उत्तम नोकरी असणारा, उच्च शिक्षण घेतलेला, घरचा गर्भश्रीमंत असलेला, आई बापांचा एकुलता एक असलेला, मुंबई-पुण्यात स्वतंब बंगले असलेला, खूप श्रीमंत असलेला लग्नाचा मुलगा व ओसामा बिन लादेन यांच्यात साम्य काय?
'शोध शोध शेधून दोघेही सापडत नाहीत.'
★★★★★
कोर्टात आरोपीला उद्देशून जजसाहेब म्हणाले, "तुला दारू पिण्यासाठी इथे आणलं आहे हे माहीत आहे ना?
आरोपी म्हणाला, "मग उशीर कशाला, चालू करू या
की."
कोटांत प्रचंड हशा. जजसाहेब रागावून उद्गारले, "ऑर्डर ऑर्डर..."
"साहेब माझ्याकरता एक डवल स्कॉच आणि सोडा
प्लीज" आरोपी.
★★★★★
मास्तरांनी फळ्यावर घड्याळाचे चित्र काढले आणि
घड्याळ कसे पाहावे ते शिकवत होते. घड्याळात लहान काट्याला तारा कटा म्हणतात आणि मोठया काटयाला मिनिट काटा म्हणतात. घड्याळ चालू असताना टिक-टक असा आवाज येतो आणि काटे पुढे पुढे सरकतात. समजा, लहान काटा चारवर आणि मोठा काटा बारावर असेल तर चार बनले असे समजावे. इतक्यात गोट्या उभा राहिला आणि म्हणाला,
"गुरुजी, एखाद्या घड्याळाचा टिक-टिक असा आवाज येत नसेल आणि काटे पुढे सरकत नसतील तर आपल्याला वाजले किती ते कसे कळणार?" त्यावर मास्तर म्हणाले, "अशा घड्याळाचे बारा वाजले आहेत असे समजायचे.'
★★★★★
एकदा एका काकूना, अमेरिकेस जाण्याचा योग आला.
अमेरिकेतल्या त्यांच्या मुलीने तिकीट आणि स्पॉन्सर पेपर्स पाठविले होते. अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये मुलाखतीसाठी त्या एकटयाच होत्या. त्यांचा नंबर आल्यावर त्या काऊंटरवर गेल्या आणि त्या अमेरिकन साहेबास म्हणाल्या, "साहेब! मला रिटर्न व्हिसा द्या. मला बाई तेथे फार दिवस चैन पडणार नाही.'
★★★★★

No comments:

Post a Comment