Friday 1 May 2020

हास्य-जत्रा

शिक्षक: बंड्या, तू सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलीस खरी, मात्र मला त्यातून काहीच बोध झाला नाही.
बंड्या: सर, तुम्हीच म्हणाला होता ना, जसा प्रश्न तसे उत्तर. मलाही तुमच्या कोणत्याच प्रश्नाचा अर्थ समजला नव्हता.


पिंट्या: डॉक्टर, गरम पाणी पिताना माझे डोळे मिटतात आणि नंतर काहीतरी टोचत राहतं.
डॉक्टर: इथून पुढं कॉफी पिताना कपातला चमचा काढून ठेवत जा, म्हणजे टोचणार नाही.

काका: बंड्या, चार मुलांमध्ये आइस्क्रीमचे वीस कप वाटायचे आहेत. कोणाच्या वाट्याला काय येईल?
बंड्या: सर्दी आणि पडसे

पिंट्या: आई,मला दहा रुपये दे ना!
आई: दहा रुपये कशाला?
पिंट्या: मला कुल्फी घ्यायची आहे.
आई: एवढे रुपये कशाला? तुला एका रुपयाची किंमत माहीत आहे का?
पिंट्या: हो, माहीत आहे म्हणूनच दहा रुपये मागत आहे.

बंड्या: माझ्या घरी नवीन घेतलेल्या कुत्र्याशी खेळायला येशील का?
पिंट्या: हो, येतो की, पण तो चावत नाही ना?
बंड्या: तेच तर पाहायचे आहे!

शिक्षक: अक्षय, सांग पाहू ऑस्ट्रेलिया कोठे आहे?
अक्षय: (नकाशा पाहात) हा पाहा सर ,येथे आहे.
शिक्षक: शाब्बास, आता रोहन तू सांग ,ऑस्ट्रेलिया कोणी शोधून काढला?
रोहन: अक्षयने...!

बंड्या: अहो काका, कुल्फी किती रुपयांना आहे?
कुल्फीवाला: 10,20 व 30 रुपयांना.
(बंड्या कुल्फी खातो आणि घरी जायला निघतो.)
कुल्फीवाला:अरे, पैसे दे की.
बंड्या: माझ्या घरचे म्हणतात, खा ,प्या,मजा करा; मात्र पैशांचे लाड नाही करायचे.

काळू:(फोनवर) अरे मी आजच्या जमान्यातही पत्र पाठवून तुला वाढदिवसाला बोलावलं होतं, तू का नाही आलास?
बाळू: अरे, पण मला तुझं पत्र मिळालंच नाही ना!
काळू: अरे, पण मी पत्रात लिहिलं होतं ना की पत्र मिळालं नाही तरी वाढदिवसाला अवश्य यावे म्हणून...

No comments:

Post a Comment