Sunday 10 May 2020

हास्याचे फुलबाजे...!

जॉन्सन साहेबांचा फोन खणाणला. त्यांनी फोन घेतल्यावर पलीकडून आवाज आला,"हलो... मिस्टर जॉन्सन?"
"हो मी जॉन्सन बोलतोय."
"मी ओरिएंट गॅरेज मधून बोलतोय.आपले चिरंजीव इथे स्कूटर घेऊन आलेले आहेत.मला एवढंच विचारायचं आहे, रिपेअरिंगचे..."
"हो...हो... हरकत नाही. तुम्ही स्कूटर दुरुस्त करा, दुरुस्तीचे पैसे मी पाठवून देईन."
"अहो,स्कूटर रिपेअरिंगचे पैसे नंतर दिले तरी चालतील.सध्या गॅरेज रिपेअरिंगचे पैसे पाठविले तर उपकार होतील."तिकडून आवाज आला.

*************
एक ग्राहक सलूनमध्ये जातो व दुकानदारास म्हणतो,"माझी मस्त गुळगुळीत दाढी करून दे."
दुकानदार ग्राहकाला खुर्चीत बसवतो. एक रबरी गोळा तोंडात धरायला सांगतो. ग्राहक तो गोळा तोंडात धरतो. मस्त गुळगुळीत दाढी होते. ग्राहक दुकानदाराला विचारतो,"काय हो, जर मी हा रबरी गोळा गिळला असता तर!"
दुकानदार नम्रपणे म्हणतो,"ठीक आहे. गिळला असता तरी चालला असता, पण सकाळी तो परत आणून द्यावा लागतो. सगळे तसेच करतात."
*************
डॉ. रमेश दिवाळीसाठी आपल्या सासुरवाडीला गेले. जाताना हौशीने आपल्या अशिक्षित मेहुण्यासाठी उंची सेंट नेला. अशिक्षित मेहुण्यांनी तळव्यावर सेंट ओतला आणि चाटून- चाटून पिऊन टाकला. डॉ. रमेश ने वैतागून आपल्या सासऱयांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणाले,"ए बंड्या, घरात पोतंभर चांदीच्या वाट्या असताना हातावर ओतून का प्यायलास? जावाईबापू आपल्याला काय म्हणतील?"
*******************
"छे!काहीही केलं ना, तरी समाधानच होत नाही या हल्लीच्या शिक्षकांचं!" गण्या वैतागून बोलत होता.
"का रे? काय झालं? " बाबांनी उत्सुकतेने विचारलं.
"हे काय, पुढच्या वर्षी परत लिहायला सांगितले आहेत हे पेपर!" गण्या हातातला रिझल्ट नाचवत म्हणाला.
****************
झोप येण्यासाठी एक ते हजार आकडे मोज, असे डॉक्टरांनी गण्याला सांगितले व दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी विचारले,"काय झोप लागली का?"
गण्या म्हणाला,"सत्तर आकडे मोजल्यावरच झोप यायला लागली होती, मग मी डोळे धुतले. तीनशे पर्यंत मोजले, पुन्हा झोप यायला लागली. मग चहा करून प्यायलो ,तेव्हा कुठे हजारापर्यंत आकडे मोजू शकलो पण नंतर मात्र डॉक्टर, झोप लागली नाही."
****************
बरेच दिवस मागेमागे फिरल्यानंतर गण्यानं बबलीला लग्नाबद्दल विचारलंच. तिनंही लाजत लाजत होकार देऊन टाकला,पण एक समस्याही सांगितली.ती गण्यापेक्षा एक वर्षांनं मोठी होती.
"त्यात काय झालं? मी एक वर्ष थांबेन की तुझ्यासाठी!" गण्यानं तातडीनं खुलासा करून टाकला.
**************
"माझं क्रेडिट कार्ड हरवलंय," गण्या सांगत होता.
"मग बँकेला कळवलं नाहीस का?"
"नाही रे कार्ड चोरणारा माझ्या बायकोपेक्षा कमीच खर्च करतोय."
*****************
"मॅडम, तुमचं वय काय?"
"बावीस."
"पण तुम्ही तर पन्नाशीच्या दिसता?"
"यांच्याबरोबर संसार करताना अठ्ठावीस वर्षे वाया गेली ती मी कशाला धरू?" मॅडमने खुलासा केला.
*************
"तुम्ही अगदी माझ्या तिसऱ्या बायकोसारख्या दिसता!" मदन काणे पार्टीत भेटलेल्या एका सुंदर मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता.
"का हो? बायका किती आहेत तुम्हाला?"
"दोन!" मदननं उत्तर दिलं.
**************

No comments:

Post a Comment