Wednesday 27 May 2020

हास्य फटाके... जोरातच!

कराचे वेगवेगळे प्रकार सांगून झाल्यावर शिक्षकांनी विचारले, अप्रत्यक्ष कराचं एखादं उदाहरण द्या पाहू ?"
'कुत्र्यावरील कर' गुंड्या उठून उभा राहून सांगू लागला.
"हं.? कसा काय?"
"कारण कुत्र्यावर लावलेला कर स्वतः कुत्रा भरत
नाही तर त्याच्या मालकाला भरावा लागतो. गुंड्याने खुलासा केला.

Tuesday 26 May 2020

हास्य विनोद ...

गोष्ट आहे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते. तेव्हाची, भारताला २१ व्या शतकात लवकर घेऊन जायचा त्यांचा निर्धार होता आणि त्या काळी नवीनच असलेल्या कॉम्प्युटरची मदत ते बारीक-सारीक कामांसाठी घ्यायचे. भारतात आतापर्यंत न झालेल्या सुधारणा त्यांनी करायच्या मनावर घेतल्या होत्या. त्याच निर्धारातून त्यांनी गंगा नदी शुद्ध करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला. प्रकल्पाला नाव काय द्यावं हे सुचवण्यासाठी त्यांनी आपल्या खात्यातल्या सगळ्या कॉम्प्युटरतज्ज्ञांना बोलावलं आणि सांगितलं, हे पाहा, हा खूप मोठा प्रकल्प आहे. तर आपण या प्रकल्पाचं नाव असं ठेवायचं की त्या नावातूनच सगळ्यांना या प्रकल्पाची माहिती मिळाली पाहिजे. एकंदरीतच चार मुद्दे महत्त्वाचे आहेत.

Monday 25 May 2020

विनोद वाचा... विनोद


एका शासकीय कर्मचाऱ्यास त्याची फायलिंग कॅबिनेट साफ करीत असताना एक दिवा सापडला. त्याची धूळ झटकतो, तो काय तो चक्क अल्लाउद्दीनचा चिराग निघाला. तुझ्या तीन इच्छा सांग. त्या पुऱ्या होतील.
'अतिशय उकाडा होतोय. एक मस्त बीअर मिळाली तर...'
 बीअर हजर- 'बोल तुझी दुसरी इच्छा काय?'
'मला एखाद्या निर्जन निसर्गसुंदर बेटावर सुंदर स्त्रियांच्या सहवासात काही दिवस....'

Friday 22 May 2020

हास्य .... किस्से...

केक महागले आहेत
सकाळी सकाळी फिरायला- जॉगिंग करायला कर्नलसाहेब जात असत. परतीच्या वेळी कर्नलसाहेब त्या गरीब माणसाच्या केकच्या स्टॉलवरून जात असत. काऊंटरवर दोन रुपयांचे नाणे ठेवून केक वगैरे काहीच न घेता निघून जायचे. तेवढीच त्या गरिबाला मदत अशा
उदात्त हेतूने समाधान पावत होते.
त्या दिवशी असेच नेहमीप्रमाणे काऊंटरवर पैसे ठेवून कर्नलसाहेब माघारी वळले. इतक्यात ''सर- ओ सर" म्हणत स्टॉलवाला त्यांच्यामागे धावत आला.
"काय बाळ? मी केक वगैरे न घेताच नुसते पैसे ठेवून निघालो म्हणून आलास ना? अरे मी रोजच तसं करतो! अच्छा चालू दे तुझा धंदा! मला केक वगैरे काहीच नको असत- फक्त एका केकची किंमत मी ठेवून जात असतो" कर्नलसाहेब प्रेमळपणे हसून म्हणाले
"नाही नाही ते असू द्या. पण मला सांगायचं होतं हे की केकची किंमत कालपासून पाच रुपये झाली आहे!'

Sunday 17 May 2020

हसण्यासाठी जन्म आपुला- मजेदार विनोद

शामराव आपल्या बायकोबरोबर हॉटेलमधून
बाहेर पडत असताना त्याच वेळी त्या हॉटेलमध्ये
शिरणाऱ्या एका मॉडर्न तरुणीने त्यांना हाय-हॅलो
केलं. आणि ती आत शिरली. घरी आल्यावर
बायकोने शामरावांची हजेरी घेतली. "कोण होती ती बया हाय-हॅलो म्हणणारी?"
" हे बघ उगाच माझं डोकं खाऊ नकोस. आधीच मी रस्त्याने येतांना बेजार झालोय की, उद्या
जर तिने मला तुझ्याबद्दल विचारले तर मी तिला काय उत्तर देऊ? " शामराव चिडून बायकोला म्हणाले!!

पोट धरून हसा

घाई
डोळ्यांसमोर गाडी गेली. आता पुण्याला जायला पुढची गाडी तीन तास नव्हती. शंकररावांनी हातातली अवजड सामानाकडे बघितलं. धावून थकलेल्या आपल्या पायांना बघितलं. धाप लागलेल्या आपल्या छातीकडे दृष्टी टाकली आणि ते किरकिरले, "लता, तुझं नटणं-मुरडणं आणि सामानाचा सोस यामुळे ही गाडी चुकली, तरी मी किती वेळा पुन्हा पुन्हा सारखा तुला घाई करत होतो. आटप म्हणत होतो."

Friday 15 May 2020

हास्य तुषार

आपली विश्वासू
भिकोबा कारकून होते. म्हणजे पगार यथातथाच. भरीस भर म्हणजे ते एकदम प्रामाणिक होते, लाच खाण्याच्या विरुद्ध. वर त्यांची पत्नी हेमलता. हिला भिकोबांपासून लागोपाठ आठ मुलीच झाल्या.
हेमलताचं निराश होणं तसं साहजिकच होतं.
हेमलतानं जवळच्या टेलरिंग फर्ममधल्या एका तरुण शिप्याबरोबर सूत जमवलं व ती त्याच्याबरोबर पळून गेली.
एके दिवशी भिकोबांना हेमलताचं पत्र आलं.
'मी असं वागायला नको होतं. माझी चूक झाली. तुमचं माझ्यावर किती प्रेम होतं याची मला आता जाणीव झाली आहे. मी परत येते आहे. शेवटी या नश्वर जगात पति-पत्नीचं प्रेम हेच काय ते अमर प्रेम.'
आपली विश्वासू

Wednesday 13 May 2020

विनोद! विनोद !! आणि फक्त विनोद !!!

रमाबाईना सिगारेट/बिडी ओढणाऱ्यांचा फार राग येत असे. एके दिवशी त्या बसच्या रांगेत उभ्या असताना शेजारचा माणूस सिगारेट पीत बसची वाट पाहत उभा होता. त्याच्याकडे पाहून रमाबाईंची  तळपायाची आग मस्तकात गेली. त्या अनोळखी माणसाला म्हणाल्या, "सारख्या दिवसभर सिगारेटी ओढल्याने तुमचं आयुष्य कमी होतं याची तुम्हाला
कल्पना आहे का?" तो सिगारेट पिणारा माणस म्हणाला, "मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून सिगारेट ओढतोय. आज माझे वय ८० आहे. काही झाले का मला?"
त्या ठसक्यात म्हणाल्या "पण तुम्ही रोज रोज अशी सिगारेट ओढत नसतात तर  आतापर्यंत तुम्ही नव्वद वर्षांचे झाला असता याचा विचार केलाय का?" रमाबाई

Tuesday 12 May 2020

हसा!हसा!! फक्त हसा !!!

नवीन तरुण कर्मचाऱ्याला वरिष्ठ समजावून  सांगत होते. 'त्याला येथे काम करायचे असेल तर  त्याने दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत.' 'कोणत्या साहेब?' कर्मचाऱ्याने विचारले.
 'तू ऑफिसमध्ये येताना बाहेरील पायपुसण्यावर पाय साफ करून  आलास का?' 'होय साहेब', तो तरुण म्हणाला. 'तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी  सत्य बोलावे अशी अपेक्षा आहे; याचे कारण बाहेर पायपुसणे ठेवलेलेच नाही.'

Monday 11 May 2020

कळलं तर हसा

*तरुणांना खरं तर एकनिष्ठ राहायचं असतं, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. आणि वयस्करांना खरं तर एकनिष्ठ राहण्यात स्वारस्य नसतं, परंतु राहावं लागतं!-ऑस्कर वाइल्ड
*पाण्यामध्ये एक वेळ हायड्रोजन किंवा ऑक्सिजन नसेल तर माझी काही हरकत नाही.परंतु ज्यात अल्कोहोल नाही, असे पाणी मला निषिद्ध आहे.- बेन बर्गर
*इस्पितळातील बेड म्हणजे एकाच जागी पार्क केलेली टॅक्सी असते...मीटर भराभरा वाढत जाणारी!

हास्यरंग

एका ऑफिसात एक विचित्र स्पर्धा लागली. जास्तीतजास्त कोण खाऊन दाखवतो याची! एका माणसाने पंधरा डोसे, वीस इडल्या, दहा कप कॉफी, तीन सामोसे एवढं खाऊन बक्षीस जिंकले.
बक्षीस स्वीकारताना तो म्हणाला," हे कृपया माझ्या घरी कळू देऊ नका. नाहीतर मला घरी गेल्यावर जेवायला मिळणार नाही."

Sunday 10 May 2020

हास्याचे फुलबाजे...!

जॉन्सन साहेबांचा फोन खणाणला. त्यांनी फोन घेतल्यावर पलीकडून आवाज आला,"हलो... मिस्टर जॉन्सन?"
"हो मी जॉन्सन बोलतोय."
"मी ओरिएंट गॅरेज मधून बोलतोय.आपले चिरंजीव इथे स्कूटर घेऊन आलेले आहेत.मला एवढंच विचारायचं आहे, रिपेअरिंगचे..."
"हो...हो... हरकत नाही. तुम्ही स्कूटर दुरुस्त करा, दुरुस्तीचे पैसे मी पाठवून देईन."
"अहो,स्कूटर रिपेअरिंगचे पैसे नंतर दिले तरी चालतील.सध्या गॅरेज रिपेअरिंगचे पैसे पाठविले तर उपकार होतील."तिकडून आवाज आला.

जोक सांगू परी...!

बाबुराव अट्टल दारु पिणारे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा एक मित्र वर्षांनी त्यांना भेटायला आला. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने बाबुरावांना विचारले,' 'काय रे, हल्ली तू काय करतोस?"
"मी फर्निचर विकतो'' बाबुराव म्हणाले.
'वा! कुठे आहे तुझं शोरूम?" मित्राने विचारले.
'नाही. दुकान वगैरे नाही, घरचेच विकतो.'
बाबुराव शांतपणे म्हणाले.

Saturday 9 May 2020

हास्य धमाका

नेम
सिंह मरून पडला होता.
खुशालरावांनी गोळी झाडली होती. छबुरावांनीही गोळी घातली होती. सिंहाच्या मस्तकावर जखम होती. सिंहाच्या मागच्या पायावरही एक जखम होती. पण मस्तकावर कोणाची गोळी लागली? छबुरावाने आत्मविश्वासाने सांगितलं,"खुशाल, तुझी गोळी मुद्दलात सिंहाच्या जवळपास आली नाही. ती सिंहाला लागतेच आहे कशाला?"
खुशाल म्हणाला,"छब्या, किती खोटं बोलशील? सिंहाला दोन गोळ्या लागल्या आहेत, दोन जखमा झाल्या आहेत. एवढं तरी कबूल कर..."

Friday 8 May 2020

देव आनंदचा फॅन आणि पोलीस

एकदा पोलिसांनी चोराला पकडले. पोलिसांना ठाऊक नव्हते की चोर देव आनंदचा फॅन आहे. म्हणून जेव्हा जेव्हा पोलिसांनी प्रश्न विचारला तेव्हा चोरट्याने देव आनंद यांच्या चित्रपटाचे नाव घेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. खालीलप्रमाणे संभाषण चालू आहे.
पोलीस : तुम्हारा नाम क्या है ?

Thursday 7 May 2020

हास्याचे फवारे....

प्राध्यापक बबनरावांना वाचनाचा भारी छंद! कॉलेज मध्ये असोत किंवा घरात, सतत काही ना काही वाचत असत. कॉलेजमध्ये ग्रंथालय होते. घरात तर त्यांनी वाचनासाठी  आपली एक स्वतंत्र खोली केली होती. आज बायकोनं चारदा आठवण करून दिली. पण स्वारी रात्री दहा वाजता आपल्या खोलीतून बाहेर आली.
त्यांची बायको शेवंता लाडानं म्हणाली,"इतकं काय असतं बरं त्या पुस्तकात? जेवण आल्यावर जरा करमणुकीचं, आनंदाचं असं काहीतरी करावं माणसानं!"

Monday 4 May 2020

मोबाईलने काय काय खाल्लं?

मोबाइल इतका स्मार्ट कशामुळे
झाला?
खूप काही खाल्लं आहे या
मोबाइलनं
याने हाताचं घड्याळ खालं
याने टॉर्च-लाईट खाल्ला
याने चिया-पत्रे खाली
पुस्तकं खाल्ली. रेडिओ खाल्ला
टेप रेकॉर्डर खाला
 कॅमेरा खाल्ला, कॅलक्युलेटर खालं
याने मैत्री खाली, भेटीगाठी
खाल्ल्या

Sunday 3 May 2020

कोरोना!कोरोना विनोद

पत्नी: लॉकडाऊन उठल्यावरसुद्धा तुम्ही कामाला जायचं नाही. मी तुम्हाला जाऊच देणार नाही.
पती: का?
पत्नी: मला त्या कामवालीपेक्षा तुमचे काम आवडले आहे.

Friday 1 May 2020

हास्य-जत्रा

शिक्षक: बंड्या, तू सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलीस खरी, मात्र मला त्यातून काहीच बोध झाला नाही.
बंड्या: सर, तुम्हीच म्हणाला होता ना, जसा प्रश्न तसे उत्तर. मलाही तुमच्या कोणत्याच प्रश्नाचा अर्थ समजला नव्हता.