Tuesday 7 July 2020

विनोद वाचा आणि मनसोक्त हसा

बायको :- उठा हो, लवकर आठ वाजत
              आलेत 😏
नवरा :  डोळेच उघडत नाहीत गं आज
           काहीतरी असं सांग ज्याने डोळे
           पटकन उघडतील ...
बायको :- रात्री जिच्याशी उशीरापर्यन्त
           चॅटिंग करीत होतात न तुम्ही
           तो माझाच दुसरा नंबर आहे
*#खाडकन डोळे उघडले #*

🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
काय करू?

राम सकाळी सकाळी श्यामच्या घरी चौकशी करायला जातो.
'अरे, काल आमच्या कानावर काही विचित्रच बातमी आली होती. असं कळलं की संध्याकाळी शेतातून परतताना तुझ्या सासूबाईंना वाघानं गाठलं होतं. मग तू इतका शांत कसा?'
श्याम 'मग काय करू? वाघाचं प्रेत हुडकायला जाऊ?'
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
मोलाचा सल्ला

बाबूराव कट्ट्यावर बसलेल्या युवकांना
बाबूराव आज मी तुम्हा युवकांना एक मोलाचा सल्ला देणार आहे.
गल्लीतील युवक सांगा ना काका, तुमचा सल्ला ऐकण्यासाठी आम्ही आतूर आहोत.
बाबूराव हे बघा मुलांनो, रंग बघून लग्न करु नका.. कारण, लाल मुंगी काळ्या मुंगीपेक्षा जास्त जोरात चावते.
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
धाडस

बंड्या आणि मन्या कॉलेजमध्ये भेटतात.
बंड्या काल मी मोठं धाडस केलं. ओळख पाहू काय केलं असेल मी..
मन्या सांग ना यार, काय केलसं तू?
बंड्या मी आईबाबांना न सांगता अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतला.
मन्या लेका, पण खाजवल्यावर वाजलं तर काय करणार?
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
कारण की..
रम्या एक गोष्ट सांग यार, माझ्याशी जुगार खेळताना तू नेहमी जिंकतोस पण रेसमध्ये नेहमी हरतोस. ही काय भानगड आहे? खूप विचार केला तरी मला हे कोडं काही उलगडलेलं नाही. तूच याचं उत्तर देऊ शकतोस मित्रा..
श्याम्या त्याचं काय आहे, मी घोड्यांना मूर्ख बनवू शकत नाही ना.. माझी खरी अडचण तिथे आहे..
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
काय करणार?
मॉडर्न सूनबाई घरात वावरत असते. तेवढयात..
सासूबाई अगं, काय करत आहेस, तुझे हात का मोकळे आहेत?
नव्या सुनेचे हात मोकळे बरे वाटत नाहीत.
सूनबाई मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई!
सासूबाई अगं भवाने, मी बांगडयांबद्दल बोलत आहे!!
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
नवीन सुनेला सासुबाई म्हणाल्या,"चहा साठी 'आधण ठेव."
सुनबाईने किचन मध्ये पंधरा मिनिटे शोधाशोध करून
शेवटी आईला फोन केला.
"मम्मा.. सासूबाईंनी चहासाठी आधण ठेवायला सांगितले आहे,काय करु?"
आई : अगं.. तिथल्या गोष्टी मला कशा कळणार?
तिथेच बघ कुठेतरी कपाटात वगैरे असणार...
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
दान

राणी कपड्यांचं कपाट आवरत असते,
अहो, माझे जुने कपडे दान देऊ का?
नरेश फेकून दे. दान कशाला करायचे?
राणी गरीब, भुकेल्या बायकांना घालायला तर होतील.
नरेश तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती बाई भुकेली थोडीच असणार
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
सुरक्षित अंतर आपल्यातच नाही, तर शब्दातही ठेवा.                                         

एक मंत्रीमहोदय आजारी होते. म्हणून पत्रकार त्यांना भेटायला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली - "आमचा पत्रकार मंत्रीमहोदयांना भेटण्यासाठी गेला, तेंव्हा ते गाढव शांत झोपले होते."

वस्तुत:  'गाढ व शांत' असे छापायचे होते!

तात्पर्य  :  *शब्दांतही सुरक्षित अंतर ठेवा..*
😂😂😂😂😂😂
रमेश आणि रागिणी गप्पा मारत बसलेले असतात.
रागिणी अहो, मला सांगा ना मी तुम्हाला किती आवडते?
रमेश खूप खूप आवडते गं.
रागिणी असं नाही, खुप म्हणजे किती ते सांगा ना..
रमेश इतक की तुझ्यासारख्या अजून चार-पाच बायका कराव्याशा वाटतात..!
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
एकदा झम्पूच्या शाळेत डेप्युटी शाळा  तपासायला आले.
एका वर्गात त्यांनी फळ्यावर  'एनएटीयूआरई' अशी अक्षरे लिहिली
आणि एका मुलाला विचारले
'हा काय शब्द' आहे?
क्षणाचाही विलंब न लावता
झम्पू म्हणाला,
'नटुरे'
त्यानंतर एक-एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले,
'नटुरे'
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले,
'हा काय प्रकार आहे?
शिक्षक उत्तरले पोरं अजून
'मटुरे' (एमएटीयूआरई) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.
डेप्युटी वैतागून सर्वांना घेऊन हेड- मास्तरांकडे गेले
व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले,
जाऊ द्या हो साहेब !!!
या गोष्टीचा त्यांच्या 'फुटुरे'(एफयूटीयूआरई) वर काहीच परिणाम होणार  नाही.
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
स्वर्ग

रीमा आणि परेश गप्पा मारत बसलेले असतात. तेवढय़ात..
रीमा काय हो, स्वर्गात म्हणे नवरा बायकोला एकत्र राहू देत नाहीत. हे खरं आहे का?
परेश हो गं, हे खरं आहे.
रीमा खरंतर, असं का करतात?
परेश अगं वेडे म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात.
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
लग्नानंतर..

शंकर- माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की काय सांगू..
तुला सगळी सुखं द्यावीशी वाटतात. असं वाटतं लग्नानंतर तुझ्यासाठी राजमहाल बांधावा.
सीमा- मला राजमहाल नको आहे.
शंकर -मग?
सीमा- रोज भांडी घासली, भाजी आणली, केर काढला आणि कपडे धुतले  तरी खूप झालं. सगळं मिळालं मला..
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣
लपवाछपवी

पत्नीने नवर्‍याला न सांगता नवीन सीम घेतलेलं असतं. त्याला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये जाऊन फोन करते.
बायको- हॅलो डार्लिंग, कसा आहेस? मी तुला भेटायला येऊ का आत्ता?
नवरा- अगं मी घरी आहे. आत्ता बोलू शकत नाही. नंतर बोलतो. आमचं येडं किचनमध्ये आहे.
.....तळटीप- नवरा सध्या हॉस्पिटलमध्ये आहे.
🤣 🤣🤣 🤣🤣 🤣

No comments:

Post a Comment