Sunday 21 June 2020

हसा आणि हसवा

अंगदुखी

गजू एकदा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला," डॉक्टरसाहेब, सगळं अंग दुखतंय."
मग त्यानं आधी हातावर,मग छातीवर, मग डोक्यावर, मग पोटावर आणि पायावर बोट दाबून दाखवले आणि दरवेळी अंगावर बोट टेकलं की तो म्हणत होता, इथे दुखतंय... सगळं अंग दुखतंय डॉक्टरसाहेब...
डॉक्टरांनी त्याला पेनकिलर दिली आणि घरी पाठवलं.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तीच तक्रार घेऊन आला तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याची नीट तपासणी केली आणि त्याला सांगितलं,
"गजूशेठ, तुमचं अंग दुखत नाही, तुमचं बोट कापलं आहे. त्यावर इलाज केला पाहिजे."
◆◆◆◆◆

म्हणूनच

अमेरिकेतील एक धनाढ्य उद्योगपती रॉकफेलर एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे स्वस्त खोल्यांची चौकशी करत होते. हॉटेल मालकानं त्यांना ओळखलं. तो त्यांना म्हणाला, "अहो, तुमच्या कंपनीतील साधा कारकूनही महागड्या खोल्यांमध्ये राहतात आणि तुम्ही मालक असूनही ..."
त्यावर रॉकफेलर लागलीच म्हणाले," म्हणून ते कारकून राहिले आहेत..."
◆◆◆◆◆
कामाची अदलाबदल

ही कथा आहे चौदावा लुई याच्या दरबारातील एका सरदाराची. तो एकदा पत्नीच्या शयनगृहात गेला तेव्हा त्याची पत्नी एका धर्मगुरुच्या मिठीत असलेली दिसली. त्यावर अत्यंत थंडपणाने तो खिडकीजवळ गेला आणि हात बाहेर काढून रस्त्यावरील लोकांना आशीर्वाद देऊ लागला.
"हे काय चाललंय तुमचं?" त्याच्या बायकोनं उद्विग्न होऊन त्याला विचारलं.
तो म्हणाला,"हे धर्मगुरू माझं काम करताहेत, तेव्हा मी त्यांचं काम का करू नये?"
◆◆◆◆◆
अंदाज

"दोस्त, माझा अंदाज इतका परफेक्ट म्हणून तुला सांगू... आता काही वेळापूर्वी मी स्टेशनला वाईन शॉपमधून दोन कॉर्टर घेऊन निघालो होतो. मनात विचार आला, चुकून आपण घसरून पडलो तर दोन्ही बॉटल फुटतील आणि पैसे पाण्यात जातील. मग मी काय केलं, डोकं चालवलं... दोन्ही कॉर्टर तिथेच पिऊन टाकल्या आणि तुला सांगतो मला वाटलं होतं तसंच घडलं. अरे, घरी येइपर्यंत सात वेळा पडलो... सात वेळा..."
आमचा शेजारी त्या दिवशी मला माझी हुशारी सांगत होता.
◆◆◆◆◆
मार्क ट्वेनची वचने

मार्क ट्वेन हा पाश्चात्य देशातील एक मोठा विनोदी लेखक. त्याची पुढील काही वचने चांगलीच विनोदी आहेत. वाचा:
1. अभिजात पुस्तकं म्हणजे अशी पुस्तकं लोक ज्याचे कौतुक करतात, पण ती कधी वाचली जात नाहोत.
2. आरोग्याविषयी पुस्तक वाचताना शुद्धलेखनाच्या चुकांकडे बारकाईनं लक्ष ठेवा. तसं न केल्यास तुमचा जीव जाऊ शकतो.
3.बोलून खातरजमा करून देण्यापेक्षा न बोलून मूर्ख समजलं जाणं चांगलं.
4. जमीन खरेदी करून ठेवा,कारण आता निर्मिती बंद थांबली आहे.
5. तुमच्या शिक्षणात तुमच्या शाळेला हस्तक्षेप करू देऊ नका.
6. जर आपण 80 वर्षांचे असताना जन्मलो असतो आणि हळूहळू18 वर्षापर्यंत वाढलो असतो तर जीवन केवढं सुंदर झालं असतं, नाही का?
◆◆◆◆◆
बचतीचा फंडा

नाना तात्यांच्या साठाव्या वाढदिवसाला जातात. ते पाहतात, केकवर मेणबत्त्यांऐवजी बल्ब लावलेला असतो.
नाना तात्या, तुम्ही केकवर मेणबत्त्यांऐवजी बल्ब का लावला आहे?
तात्या अहो नाना, आज माझा साठावा वाढदिवस आहे ना.. एवढय़ा मेणबत्त्या कशा लावणार म्हणून साठचा बल्बच लावून टाकला.
◆◆◆◆◆
भांडण

वर्ग सुरु असतो. बाई शिकवत असतात. तेवढय़ात चिंटू दारात उभा राहून वर्गात येण्याची परवानगी मागतो.
शिक्षक उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू आई-बाबा भांडत होते.
शिक्षक त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू माझा एक बूट आईच्या आणि दुसरा बाबांच्या हातात होता.
◆◆◆◆◆
कारण

चंदू - अरे नंदू, काय किमया झाली आहे तुमच्या घरात सांग पाहू. मला तर पाहूनही आश्‍चर्य वाटलं. तुझे वडील तर आधी खूपच काळे दिसायचे. आता अचानकच उजळलेले दिसले. काय रहस्य आहे हे?
नंदू- अरे काय सांगू तुला, पूर्वी बाबा कोळश्याच्या खाणीत काम करायचे. पण आता ते पिठाच्या गिरणीत काम करताहेत.
◆◆◆◆◆
रोशन

पप्पा: बंटी बेटा, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो. तुला सगळं काही आणून देतो. तुझी प्रत्येक हौसमौज पुरवतो. आता सांग पाहू, मोठं झाल्यावर तू माझं नाव कसं रोशन करशील.
बंटी पप्पा, तुम्ही काही काळजी करु नका, मी दारातील नेमप्लेटवर बल्ब लावीन. म्हणजे तुमचं नाव सतत 'रोशन' राहील.
◆◆◆◆◆
शिकवण

तुरुंगाधिकारी कैद्यांना भेट द्यायला आलेले असतातत.
अधिकारी इतके दिवस तुरुंगात काढलेस तू. सांग पाहू, तिथल्या कडक शिस्तीने, वातावरणाने तुला काय शिकवलं?
कैदी मला स्वच्छतेचं महत्त्व पटलं साहेब.
अधिकारी ते कसं काय?
कैदी साहेब, मी चार दिवस आंघोळ केलेली नाही. करुन येतो आणि सांगतो..
◆◆◆◆◆
दळण

गुरुजी : दळणवळण म्हणजे काय?
बंडू : दळण घेऊन जाताना वळून बघणे म्हणजे दळणवळण होय.
गुरूजींनी वळवत वळवत कणकेसारखा तिंबला.
◆◆◆◆◆
लॉकडाऊन इफेक्ट

बंड्या : सर दोन दिवस गावी जायचे आहे. ३0 दिवसांची सुट्टी पाहिजे.
◆◆◆◆◆
लॉकडाउनमध्ये बंड्याला एका मित्राची लग्नपत्रिका आली. त्यावर श्री व सौ च्या बाजूला डब्ल्यू एल/१, डब्ल्यू एल/२ असे लिहिले होते.
बंड्या गोंधळात पडला त्याने तात्काळ मित्राला फोन केला आणि त्याचा अर्थ विचारला.
मित्रा म्हणाला लग्नाला फक्त ५0 माणसांची परवानगी आहे. तुझा नंबर ५१ आणि ५२ वा आहे. जर काही कारणामुळे दोन जणांचे येणे रद्द झाल्यास तू आणि वहिनीने लग्नाला यायचेच आहे.
◆◆◆◆◆
बायको : माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करतांना जळाला.
नवरा : काही हरकत नाही. माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे.
बायको : माहीत होतं मला. म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला.
◆◆◆◆◆

No comments:

Post a Comment