Friday 5 June 2020

मनसोक्त हसा

मनोहररावांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राजाभाऊ नव्यानेच राहायला आले होते. मनोहरराव सामायिक भिंतीवर ठोकाठोकी करत होते. काही वेळाने राजाभाऊ त्यांच्याकडे आले. त्यांना पाहताच मनोहरराव दिलगिरीच्या स्वरात म्हणाले, "आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल. त्याचं काय आहे की एक पेंटिंग लावण्यासाठी मी खिळा ठोकत होतो.'
"ठीक आहे, तुमचं काम चालू द्या. मला फक्त ऐवढं विचारायचं होतं, की खिळ्याच्या दुसऱ्या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली तर तुमची काही हरकत नाही ना!" राजाभाऊंनी विचारले.

★★★★★
अमितकडे त्याचे मामा, मामी त्यांची तीन मुले आणि मावशी अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली. अमितच्या आईला फार आनंद झाला. ती आपल्या भावाचे, भावजयीचे, बहिणीचे स्वागत करायला आनंदाने पुढे झाली. सर्व मंडळी घरात  येऊन बसली. चहा-पाणी झाले, बाबा म्हणाले,
'अमित, पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये.' हे
ऐकून सर्वजण खुश झाले. अमित बाहेर गेला व
पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन रिक्षा घेऊन
आला.
★★★★★
निमी आपले पती निरज यांना म्हणाली,
"आज आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस. एक
तपापूर्वी तुम्ही जे जे म्हणालात ते आठवतंय
मला."
" निरज म्हणाला, "निमू सांग तरी."
"तुम्ही म्हणायचात माझे पती बनण्यायोग्य तुम्ही नाहीत.''
"हो हो पण ते इतक्या वर्षांनंतरही आठवते तुला. आश्चर्य आहे."
निमी उदास स्वरात बोलली, "कारण आता माझ्या
लक्षात येतंय की, तुम्ही कसेही असलात तरी खोटं कधी बोलला नाहीत."
★★★★★
 एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं. ते कर्ज तो फेडू न शकल्याने बँकचे अधिकारी कार घेऊन गेले. यावर तो माणूस म्हणाला, "मला माहित नव्हतं, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं."
★★★★★
 रस्त्यात पडलेलं नाणं उचलताना गाडीखाली येऊन एकाचा मृत्यू झाला. पंचनाम्यात नैसर्गिक मृत्यू अशी नोंद होती. पुढे खटला चालल्यावर अधिक तपासात ते नाणं नसून थंडपेयाचे चकाकणारे झाकण होते असे सिद्ध झाले. तेव्हा अहवाल देण्यात आला, "मानसिक धक्क्याने मृत्यू
★★★★★
 "माझ्या मुलीबरोबर पुन्हा जर बागेत दिसलास तर घरी येऊन तंगडे तोडेन," असं धमकीचं पत्र आलंय मला. बंडूने बाळूला सांगितले, "अरे, मग त्या मुलीच्या बापाची माफी माग काळजी कशाला करतोस!"
"पण पत्राखाली नाव आणि पत्ता नाहीये मी कुणाकुणाच्या बापाची माफी मागू?" बंडूने अडचण सांगितली..
★★★★★
काल राजी तुझा कुत्रा माझ्या सासूला चावला. आता तुला त्यांची माफी मागावी लागणार!" साहेबराव पंतोजींना म्हणाले.
'अरे वा! मी कशाला तुझ्या सासूची माफी मागू? उलट माझ्या सासूला तुझा कुत्रा चावला असता तर
नुसते आभारच काय तर तुला पाच हजार रुपये
बक्षिस दिले असते." पंतोजी म्हणाले.
★★★★★
 मोठ्या आशेने चंदूकाकांनी पुनर्विवाह केला. पण ते चांगलेच पस्तावले. रोजच्या शिव्या आणि भांडणांना कंटाळले. आता असा संसार करण्यापेक्षा घटस्फोट देऊन मला मोकळं कर! असा चंदूकाकांनी आपल्या बायकोजवळ आग्रह धरला.
 'पाहिजे तर तुला पैसे देतो' असे ते बायकोला म्हणाले. तेव्हा बायको म्हणाली, "मला तुमचे पैसे वगैरे काही नको. मी जशी आले तश्शीच परत जाईन." हे ऐकून चंदूकाकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तेवढ्यात बायको म्हणाली, "मी तुमच्या संसारात आले तेव्हा विधवा होते हे लक्षात आहे ना?"
★★★★★

No comments:

Post a Comment