Friday 5 June 2020

खळखळून हसा

एक गवंडी जखम झाली म्हणून डॉक्टरकडे गेला. तेथील कंपाऊंडरने सहज विचारले, 'अहो, इतकी मोठी जखम कशी झाली?'
गवंडी म्हणाला, 'मी तिसऱ्या मजल्यावर शिडी लावून भिंत सारवासारव करीत होतो. समोर आत पाहिले तर एक सुंदर तरुणी आंघोळ करीत होती. अचानक शिडी पडली आणि मला जखम झाली.' तो रसिक कंपाऊंडर मनातल्या मनात मांडे खात म्हणाला, 'अरेरे! त्याच वेळी शिडीला पडायचे होते काय?' तो गवंडी म्हणाला,
'अहो, पन्नास माणसे त्या शिडीवर यायला लागली,तर ती पडेल नाही तर काय?'

★★★★
बॉस- का हो तुम्ही ऑफिसमधून घरी लवकर जाता व येतांना उशिरा येता. काय आहे हे?
कर्मचारी- साहेब, मी विचार करतो की, एखाद्या ठिकाणी दोनदा उशीर बरा नव्हे. येताना उशीर ठीक आहे. म्हणून मी ऑफिसला उशिरा आलो तरी घरी लवकर जातो.
◆◆◆◆◆
अमेरिकन, चिनी आणि भारतीय रेल्वेने प्रवास करीत होते. त्या तिघांत पैज लागली की, आपल्याकडील अशी वस्तू गाडीबाहेर फेकायची, की इतर दोघांनाही ती फेकता आली पाहिजे.
प्रथम अमेरिकन माणसाने आपला कोट फेकला. इतर दोघांनीही आपापले कोट बाहेर फेकले.
नंतर चिनी माणसाने आपल्या हातातील घड्याळ
बाहेर फेकले. क्षणाचाही विचार न करता अमेरिकन आणि भारतीयाने आपल्या हातातील घड्याळे बाहेर भिरकावली..
आता भारतीयाची पाळी होती. त्याने आपल्या तोंडात बोटे घालून दातांची कवळी बाहेर काढली आणि बाहेर फेंकली आणि पैज जिंकली.
◆◆◆◆◆
कुटुंबप्रमुख- दूरध्वनीचे बील या महिन्यात जास्त आले आहे. तुम्ही सर्वांनी दूरध्वनी अत्यावश्यक असेल तरच वापरा. मी हा दूरध्वनी वापरत नाही. मी फक्त कार्यालयातील दूरध्वनी वापरतो.
पत्नी- माझ्याही बाबतीत तेच आहे. मी माझ्या
कार्यालयातील दूरध्वनी वापरते.
पुत्र- मी हा दूरध्वनी कधीच वापरत नाही. माझ्या
कार्यालयाचा दूरध्वनी वापरते.
मोलकरीण- इथे कसली अडचण आहे? आम्ही सर्व आपापल्या कामाच्या वेळीच दूरध्वनी वापरतो.
◆◆◆◆◆
चार-पाच व्यापारी मित्र गप्पा मारत एकत्र बसले होते. त्यातला एकजण म्हणाला, 'मी दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे बरोब्बर सांगू शकतो. त्यासाठी दहा रुपयाची पैज!' दुसऱ्याने ते आव्हान स्वीकारले.
त्या माणसाने एकदा व्यापाऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले व त्याला म्हणाला, 'तुझ्या मनात आता असा
विचार चाललाय की, दहा मित्रांकडून प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये उसने घ्यायचे, त्यावर धंदा करायचा आणि नंतर दिवाळं काढायचं.' त्या माणसाने शब्दही न बोलता दहा रुपये त्याला दिले. दहा रु. घेत तो म्हणाला, 'अचूक
ओळखलं की नाही, तुझ्या मनातलं?' व्यापारी
म्हणाला, 'मुळीच नाही, पण कल्पना मला इतकी आवडली की दहा रु. द्यायला हरकत नाही,' असा मी विचार केला.
★★★★★
रम्या एक गोष्ट सांग यार, माझ्याशी जुगार खेळताना तू नेहमी जिंकतोस पण रेसमध्ये नेहमी हरतोस. ही काय भानगड आहे? खूप विचार केला तरी मला हे कोडं काही उलगडलेलं नाही. तूच याचं उत्तर देऊ शकतोस मित्रा..
श्याम्या त्याचं काय आहे, मी घोड्यांना मूर्ख बनवू शकत नाही  ना... माझी खरी अडचण तिथे आहे..
★★★★★
एकदा बंडोपंत आणि गुंडापंत हे दोघे मित्र एका ख्यातनाम चित्रकाराचं चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कलादालनात गेले. तिथे अनेक जण बारकाईने चित्रं निरखत होते. तशीच पोझ घेत चित्र पाहताना..
बंडोपंत (भिंतीवर टांगलेल्या चित्राकडे एकटक बघत) हे चित्र काही उठून दिसत नाही बुवा..
गुंडापंत असं का? मग बसून बघा ना.
★★★★★
एक महिला पतीला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि म्हणाली, 'डॉक्टरसाहेब, आमचे हे रात्री खूप बडबडतात. कृपया काहीतरी औषध द्या.'
डॉक्टरांनी त्या महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि म्हणाले, 'या आजारावर एकच औषध आहे.' रुग्णाची पत्नी 'कोणतं?'
डॉक्टर -'त्यांना दिवसभरात एकदा तरी बोलायची संधी द्या.'
 ★★★★★

No comments:

Post a Comment