Sunday 21 June 2020

हसा आणि हसवा

अंगदुखी

गजू एकदा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला," डॉक्टरसाहेब, सगळं अंग दुखतंय."
मग त्यानं आधी हातावर,मग छातीवर, मग डोक्यावर, मग पोटावर आणि पायावर बोट दाबून दाखवले आणि दरवेळी अंगावर बोट टेकलं की तो म्हणत होता, इथे दुखतंय... सगळं अंग दुखतंय डॉक्टरसाहेब...
डॉक्टरांनी त्याला पेनकिलर दिली आणि घरी पाठवलं.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तीच तक्रार घेऊन आला तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याची नीट तपासणी केली आणि त्याला सांगितलं,
"गजूशेठ, तुमचं अंग दुखत नाही, तुमचं बोट कापलं आहे. त्यावर इलाज केला पाहिजे."
◆◆◆◆◆

Saturday 6 June 2020

दणदणून हसा

पु. ल. प्रमुख पाहुणे होते. मुख्य समारंभानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. एका बाईंनी पु.लं.ना प्रश्न केला, "आपण अजून आत्मचरित्र का लिहिलं नाही?"
पु. ल. म्हणाले, "नाही लिहिलं!"
बाई म्हणाल्या, "तुम्ही ते लवकरात लवकर लिहावं
अशी आमची इच्छा आहे."
पु. ल.नी त्या बाईकडे डोळे मोठे करून पाहिलं अन्
म्हटलं, "म्हणजे माझं आता काही खरं नाही असंच ना?"
सारं थिएटर हास्यकल्लोळात बुडून गेलं.

Friday 5 June 2020

मनसोक्त हसा

मनोहररावांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राजाभाऊ नव्यानेच राहायला आले होते. मनोहरराव सामायिक भिंतीवर ठोकाठोकी करत होते. काही वेळाने राजाभाऊ त्यांच्याकडे आले. त्यांना पाहताच मनोहरराव दिलगिरीच्या स्वरात म्हणाले, "आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल. त्याचं काय आहे की एक पेंटिंग लावण्यासाठी मी खिळा ठोकत होतो.'
"ठीक आहे, तुमचं काम चालू द्या. मला फक्त ऐवढं विचारायचं होतं, की खिळ्याच्या दुसऱ्या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली तर तुमची काही हरकत नाही ना!" राजाभाऊंनी विचारले.

खळखळून हसा

एक गवंडी जखम झाली म्हणून डॉक्टरकडे गेला. तेथील कंपाऊंडरने सहज विचारले, 'अहो, इतकी मोठी जखम कशी झाली?'
गवंडी म्हणाला, 'मी तिसऱ्या मजल्यावर शिडी लावून भिंत सारवासारव करीत होतो. समोर आत पाहिले तर एक सुंदर तरुणी आंघोळ करीत होती. अचानक शिडी पडली आणि मला जखम झाली.' तो रसिक कंपाऊंडर मनातल्या मनात मांडे खात म्हणाला, 'अरेरे! त्याच वेळी शिडीला पडायचे होते काय?' तो गवंडी म्हणाला,
'अहो, पन्नास माणसे त्या शिडीवर यायला लागली,तर ती पडेल नाही तर काय?'