Wednesday 13 May 2020

विनोद! विनोद !! आणि फक्त विनोद !!!

रमाबाईना सिगारेट/बिडी ओढणाऱ्यांचा फार राग येत असे. एके दिवशी त्या बसच्या रांगेत उभ्या असताना शेजारचा माणूस सिगारेट पीत बसची वाट पाहत उभा होता. त्याच्याकडे पाहून रमाबाईंची  तळपायाची आग मस्तकात गेली. त्या अनोळखी माणसाला म्हणाल्या, "सारख्या दिवसभर सिगारेटी ओढल्याने तुमचं आयुष्य कमी होतं याची तुम्हाला
कल्पना आहे का?" तो सिगारेट पिणारा माणस म्हणाला, "मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून सिगारेट ओढतोय. आज माझे वय ८० आहे. काही झाले का मला?"
त्या ठसक्यात म्हणाल्या "पण तुम्ही रोज रोज अशी सिगारेट ओढत नसतात तर  आतापर्यंत तुम्ही नव्वद वर्षांचे झाला असता याचा विचार केलाय का?" रमाबाई

%%%%%%%%%%%%%
इन्स्टंट ड्रेसिंग
सैन्यातला माणूस आपल्या डॉक्टर मित्राला सांगत होता, 'एकदा माझा मित्र प्रात्यक्षिक करत असताना पाय घसरुन पडला अन् त्याचा पाय मोडला. मी लगेच तो बांधला अन् ड्रेसिंग केलं. तीन दिवसात तो पूर्वीप्रमाणं चालू लागला'
'अगदी अशक्य ! काय सांगतोस ?'
'अरे हो, तो लाकडी पाय होता हे सांगायला विसरलोच.'
%%%%%%%%%%%%
प्राणप्रिय बायको
राम्या बायकोला माझी अजिबात कदर नाही.
शाम्या मी ही तक्रार करुच शकत नाही. माझी बायको खूप काळजी घेते माझी.
राम्या ते कसं बुवा?
श्याम्या भांडी घासण्यासाठी उन्हाळ्यात गार तर थंडीत गरम पाणी देते, कुंचा हातात आणून देते. मी कपडे धुतल्यावर ती वाळत घालते. यापेक्षा काय हवे?
%%%%%%%%%%%
"जन्मोजन्मी हाच पती मिळू दे" अशी प्रार्थना बायका का करतात?
- म्हणजे या जन्मी नवऱ्याला वळण लावायला घेतलेले कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून.
"अहो ऐकलंत का? तुम्ही धुणीभांडी करून ठेवा, स्वयंपाक करा तोपर्यंत मी वटपूजा करून येते."
%%%%%%%%%%%
वृक्षप्रेमी रघुकाकांनी महाडजवळच्या खेड्यात एक  बाग विकत घेतली. तब्बल सात लाख रुपये झाडांच्या  बागेसाठी मोजले. त्यांचे मित्र म्हणाले, "किंमत थोडी  जास्त वाटते.'' रघुकाका सांगू लागले, "बागेतलं एक झाड तर अडीचशे वर्षांचं जुनं आहे. त्याला दरवर्षी  आंबे येतात. हा चमत्कार आहे'. मित्रांनी पैज लावली.
एवढं प्राचीन झाड  फळ धरत असेल, आमचा विश्वास नाही.  शेवटी रघुकाकांनी कृषिविद्यापीठातील एक प्राध्यापक व वृक्षतज्ज्ञ डॉ. बोकीलना बोलावलं. त्यांनी झाडाची  पाहणी करून निष्कर्ष लिहून दिला, "हे झाड सुमारे  दोनशे बहात्तर वर्षांचं असावं'.
रघुकाकांनी डॉक्टर बोकीलना, विचारलं 'हा  नेमका आकडा तुम्ही कसा काय सांगू शकता?"
"त्यात काय विशेष. आम्ही ते झाड बुंध्याशी  कापलं. आडवं टाकलं. त्याच्या मोठ्या खोडावरची वर्तुळाकार कडी मोजली. जेवढी त्यावर कडी तेवढ्या वर्षांचं ते झाड असतं.' आमचा अभ्यास पूर्ण झाला..
%%%%%%%%%%%
एका पोलीस निरीक्षकावर पूर्व सूचना न देता बेछूट गोळीबार करून काही लोकांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल खटला चालू होता.
सरकारी वकील - जमावावर गोळीबार  करण्याआधी हवेत आकाशाकडे गोळीबार करावयाचा  असतो, हे तुम्हास माहीत आहे काय?
पोलीस निरीक्षक - होय साहेब.
स. व. - होय साहेब? तरीही तुम्ही जमावावर गोळीबार करण्याचा हुकूम दिला?'
पो. नि. - काय करू साहेब? त्याच वेळी  आकाशात आमच्या डोक्यावर सरकारी हेलिकॉप्टर जमावावर उडत होते व त्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री असल्याची माहिती वायरलेसवर मिळाली होती.
%%%%%%%%%%%%%
एका मोटारचालकाला पोलीस अधिकारी- "तुझे लायसेन्स (परवानापत्र) दाखव."
"मी घरी विसरलो."
"तुमची ओळख पटविण्याचा पुरावा दाखवा."
त्याने आरसा काढला. 'हे माझे चित्र आहे,' आरशात पाहा.
"मला पाहू दे" असे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडचा
आरसा घेऊन पाहिला.
पोलीस अधिकारी- "तुम्ही पोलीस अधिकारी आहात हे मला माहीत असते तर मी तुम्हाला अडविले नसते".
%%%%%%%%%%%%
एक माणूस नोकरीकरिता शेठकडे गेला. शेठने विचारले.
"याअगोदर तू कामाला कोठे होतास? तेथील त्यांच्या समाधानाचे
सर्टिफिकेट दाखव." त्या माणसाने सर्टिफिकेट दाखवले. ज्यावर
लिहिले होते. 'या माणसाने माझ्याकडे एक महिना काम केले. नंतर
त्याला काढावे लागले. आता मी समाधानी आहे."
%%%%%%%%%%%%%

No comments:

Post a Comment