Friday 24 April 2020

पोटभर हसा

वडील:पिंटू, आज तू परीक्षेला का नाही गेलास?
पिंटू: बाबा, आजचा पेपर फार कठीण आहे.
वडील: अरे, पेपर न लिहिताच तुला कसं कळलं की पेपर कठीण आहे?
पिंटू: अहो बाबा, आजचा पेपर कलाच फुटला.

म्हैस
पांडूची बायको काळी असते. एकदा पांडू तिला हिरवी साडी आणून देतो. मैना ती साडी नेसते आणि विचारते," कशी दिसते मी?"
पांडू म्हणतो," हिरव्या शेतातल्या काळ्या म्हशीसारखी!"

मोजे
बंटीने एका पायात पिवळा आणि एका पायात निळा मोजा घातलेला असतो. ते पाहून
शिक्षक:अरे! अशी विचित्र मोज्यांची जोडी कशी  काय घातली आहेस तू?
बंटी: विचित्र नाही! माझ्याकडे अशीच अजून एक जोडी आहे.

वाघीण
शिक्षक: संजू, वाघाला न घाबरणाऱ्या प्राण्याचे नाव सांग बरं.
संजू: वाघीण

बी साईड
दोन वेडे झाडावर बसून गाणे म्हणत असतात. एक वेडा अचानक उलटा होऊन गाणे म्हणायला लागतो.
दुसरा वेडा: अरे, तू अचानक उलटा का झालास?
पहिला वेडा: अरे, कारण माझी 'ए' साईड संपून 'बी' साईड सुरू झालीय.

मासे
मासे विकणारा: मावशी, मासे शिजवण्याआधी पाण्यातून छान धुवून घ्या!
मावशी: कशाला? मासे तर पाण्यातूनच पकडलेले असतात की!

तोंडाला नळ
सोनू: आई, लवकर भजी दे! माझ्या तोंडाला पाणी सुटलंय...
पिंकू: दादा, तुझ्या तोंडाला नळ बसवलाय का?

औषध
एक अतिजाड माणूस (डॉक्टरला): डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी काही औषध सांगा.
डॉक्टर: तुम्ही किती आहार घेता, ते सांगा.
पेशंट: सात वाट्या भाजी, ताटभर भात आणि सात पोळ्या.
डॉक्टर: तुम्ही उद्यापासून चार वाट्या भाजी, अर्धे ताट भात आणि चार पोळ्या इतकाच आहार घ्यायचा.
पेशंट: डॉक्टर, पण हे औषध जेवणाआधी घायचे का जेवणानंतर?

पाणी
मैनाबाई (दुधवाल्याला): काय हो, आजकाल दुधाचे भाव इतके का वाढलेत?
दूधवाला: काय करणार बाई? हल्ली पाणी महाग झालंय...

No comments:

Post a Comment