Sunday 16 April 2023

ऐकल्या विनोदा दंडवत


 19 वा अध्याय

एक उपदेशक आपल्यापुढे जमलेल्या लोकांना म्हणाला," बंधूंनो, आजचा माझा उपदेशाचा विषय आहे, खोटी माणसे!

  'जो माणूस खरं बोलत नाही त्याचा खोटारडेपणा कधी ना कधी उघड होतोच!'

 'तर सांगा बरं, तुमच्यापैकी कितीजणांनी गीतेचा १९ वा अध्याय वाचला आहे ?'

 जवळजवळ सर्वांनीच हात वर केले. उपदेशक म्हणाले, आपण सर्व अशी माणसे आहात ज्यांना उपदेशाची  नितांत गरंज आहे, कारण गीतेत १९ वा अध्यायच नाही.'

®®®®®®®®®®©©©©

एका गोष्टीवर कोणी  विश्वास ठेवेल का?

रवीला नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये उशीर झाला होता. बॉसने दारातच गाठलं. “काय ? आज पण उशीर ? आज काय थाप मारणार आहेस नवी ? का उशीर झाला?" 

 “थाप नाही साहेब, मी आज एकदम खरं खरं सांगेन.” रवी म्हणाला, “आज मी खरं तर वेळेच्या आधीच पाच मिनिटं तयार झालो होतो आणि मी निघणार, एवढ्यात अचानक माझी बायको म्हणाली, “जरा पाच मिनिटं थांबता का, मला शॉपिंगला जायचंय तेव्हा मी आता तयार होते आणि तुमच्याबरोबरच निघते.” माझी बायको पाच मिनिटांत तयार झाली. मग आम्ही दोघं स्कुटरवरून निघालो. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक आला. तो ट्रक आमच्यावर आदळणार इतक्यात आकाशातून एक देवदूत आला आणि त्याने आमच्यासकट स्कूटर उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली. मग मी ३०० च्या वेगाने स्कूटर चालवत होतो, पण अचानक ट्रॅफिक-जाम झाला.  मग मी देवाचा धावा केला. तो काय! प्रत्यक्ष देवाने आकाशातून येऊन  मला आपल्या ऑफिसच्या गच्चीवर आणून ठेवले आणि मी तिथूनच येतो आहे! त्यात थोडा उशीर झाला एवढंच”  हे ऐकून बॉस मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, “अरे, इतकी सगळी सुसंगत गोष्ट तयार केलीस, पण एका गोष्टीवर कोणी  विश्वास ठेवेल असं वाटतंय तुला ? अरे, कुठली तरी बाई पाच मिनिटांत बाहेर जायला तयार होऊन येईल का?” 

No comments:

Post a Comment