Monday 19 November 2018

संशोधन


एका संशोधक मित्राला मी फोन करून विचारलं, ’काय रे, सध्या काय चाललंय?’ त्याने उत्तर दिलं, ’तणावपूर्ण स्थितीत चिनी माती, काच, ॅल्युमिनियम, पोलादाच्या वस्तूंवर पाणी, आम्लारी आणि उष्णता यांच्यावरील परिणाम उत्कृष्ट कसे होतील याविषयी निरीक्षण, कृती आणि अवलोकन करतोय.’ हे संशोधन मी अगदी सामान्य वातावरणात घरगुती साधनं वापरुन करत असल्याचंही त्यानं सांगितलं. मी भारावून प्रयोग पाहायला त्याच्या घरी गेलो, तर वहिनी कमेरवर हात ठेवून उभ्या होत्या. आणि हा पठ्ठ्या भांडी घासून गरम पाण्याने विसळत होता.
 *****
 आज-काल पहिलीची पोरं केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं व्हायचा नाही!
 *****
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागून चालत असतात. याचाच अर्थ असा की लोक सुखात पुढे-पुढे नाचत असतात आणि दु:खात मागून चालत असतात. लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोक आपल्या पुढे असले काय किंवा मागे असले काय, आपलं जीवन आपण आपल्या हिंमतीवर व निश्चयानेच जगायचं असतं.
 *****
 कंठ दिला कोकिळेला; पण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला; पण इच्छा काढून घेतली. दिला संतोष संतांना; पण संसार काढून घेतला. हे मानवा... कधी करू नको अहंकार स्वत:वर तुझ्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
 *****
 मास्तर : जर 25 रुपयाला पाव भाजी मिळते तर 100 रुपयाला काय मिळेल?
संतोष : फुल भाजी
 *****
 मास्तर : भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणतात?
 संतोष : हिंदुस्तान लिव्हर
*****
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात.... आणि भारतीय नवरे? त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. ते बिचारे मुकाट्याने!

No comments:

Post a Comment