Sunday, 17 May 2020

हसण्यासाठी जन्म आपुला- मजेदार विनोद

शामराव आपल्या बायकोबरोबर हॉटेलमधून
बाहेर पडत असताना त्याच वेळी त्या हॉटेलमध्ये
शिरणाऱ्या एका मॉडर्न तरुणीने त्यांना हाय-हॅलो
केलं. आणि ती आत शिरली. घरी आल्यावर
बायकोने शामरावांची हजेरी घेतली. "कोण होती ती बया हाय-हॅलो म्हणणारी?"
" हे बघ उगाच माझं डोकं खाऊ नकोस. आधीच मी रस्त्याने येतांना बेजार झालोय की, उद्या
जर तिने मला तुझ्याबद्दल विचारले तर मी तिला काय उत्तर देऊ? " शामराव चिडून बायकोला म्हणाले!!
&&&&&&&&&
केशवराव उठले. दात-ब्रश करताना त्यांनी बेसिनवरच्या आरशात पाहिले आणि तडक डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले.
"बसा. काय प्रॉब्लेम आहे?" डॉक्टरांनी विचारले.
"डॉक्टर माझा एक डोळा दुसऱ्यापेक्षा निराळा दिसतोय.''
स्वतःच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून डॉक्टरांनी विचारले,
"कुठला डोळा कोणत्यापेक्षा निराळा दिसतोय, सांगू शकाल का? मला तर काहीच दिसत नाही."
"कसे दिसणार? चष्मा काढलाय ना तुम्ही डोळ्यांवरचा."
&&&&&&&
दररोज उशिरा रात्री घरी येणारा एक दारुडा मेनडोअर जोरजोराने ठोठावू लागला. गाऊन घातलेल्या एका बाईने दार उघडले.
"माफ करा मॅडम! ही एक इमर्जन्सी आहे. तुम्ही सांगू शकाल रघुनाथ जोशी कुठे राहतात?"
"तुम्ही स्वतःच रघुनाथ जोशी आहात."
"ओ. के.ऽ ओ. के. पण हे काही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. ते कुठे राहतात, हे सांगा." मला घरी जायचे आहे.
&&&&&&&
बापू व चंदू हे दोघे जिगरी दोस्त क्रिकेटवेडे होते. वयपरत्वे बापू कालवश झाला. पुढे एकदा चंदूला बापूच्या आवाजासारख्या आवाजाचा भास झाला. त्याने विचारले,
'बाप्या अरे तू बोलतोस, होय?'
बापू : हो मीच आहे रे.
चंदू : अरे मला एक सांग, स्वर्गात क्रिकेट आहे?
बापू : अरे हो आहे ना. पण तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. उद्याच्या 'ट्वेन्टी-ट्वेन्टी'मध्ये तू ओपनिंग बोलर आहेस.
&&&&&&&
वन वे रोडवर एकजण दारू पिऊन स्कूटरने उलट दिशेने जात होता. ट्रॅफिक हवालदाराने त्याला थांबवले व विचारले.
'कुठे जात आहेस?'
दारूड्या म्हणाला, 'मला माहीत नाही. पण बहुदा मी खूप लेट झालो असेन. कारण मी सोडून बाकीचे सर्वजण घरी जात आहेत.'
&&&&&&
एकाने आपल्या मित्राला विचारले, 'काय रे मित्रा? तुझे बंधू जे विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते ते सध्या काय करतात? 'काहीच नाही.' मित्राने सांगितले. 'कारण ते निवडून आले आहेत.'
&&&&&&&
मुशर्रफ यांच्या राजवटीला सर्व जनता कमालीची कंटाळली होती. एक दिवस मुशर्रफ इस्लामाबादमध्ये आपल्या गाडीतून
चालले असताना त्यांना पासपोर्ट कार्यालयापुढे बरीच मोठी गर्दी दिसली. म्हणून त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला या गर्दीबाबत चौकशी करण्यास सांगितले. ड्रायव्हरने जाऊन गर्दीची चौकशी केल्यावर असे समजले की, मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीला सर्वजणच कंटाळले असल्यामुळे लोक पाकिस्तान सोडून परदेशी जात आहेत.
&&&&&&&
अनुभव
सासुरवाडीच्या आपल्या पहिल्या मुक्कामात तुलनेनं कमी शिकलेल्या सासरेबुवांना जावईबापूंनी संभाषणात ओढलं, “मामा, त्याचं काय आहे, काही प्रश्नांना उत्तर नसतं. उदाहरणार्थ, परमेश्वरानं प्रथम कोंबडी निर्माण केली की अंडं, हे कोण सांगू शकेल?"
सासरेबुवा निर्विकारपणे म्हणाले, “मी सांगतो. प्रथम कोंबडीच निर्माण केली असणार. परमेश्वराला ते जमलं; पण परमेश्वराला अंडं घालणं कसं जमणार? परमेश्वराला तो अनुभव नाही. परमेश्वराचा मत्स्यावतार
आहे, कूर्मावतार आहे, वराहावतार आहे; पण कुक्कुटावतार नाही.''
&&&&&&&
म्हणणं मांडू द्या.
स्टेनो-टायपिस्ट चंदानं आपल्या स्थानाचा दुरुपयोग केला होता. भगवंतरावांनी विश्वासानं सहया केलेलं चेकबुक चंदाला दिलं होतं.
नखरेल, नटवी चंदा चैनीला सोकावली होती. तिनं पैसे काढले होते. लबाडी उघडकीला आली होती. भगवंतराव पोलीस ठाण्यावर वर्दी देणार होते; पण चंदानं विनंती केली, "प्लिज, मालक, वर्दी देण्यापूर्वी ऑफिसातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे मला माझी बाजू मांडू द्या."
आता अधिकारी  तरी वेगळं काय सांगणार? तरी पण भगवंतांनी चार अधिकाऱ्यांना बोलावलं. चंदानं बाजू मांडली.
"आता सगळं तुमच्या हाती आहे. मला तुरुंगात पाठवणं किंवा जुहूच्या, चित्तरंजन रोडवरच्या, इंद्रपुरी सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरच्या चोवीस नंबरच्या फ्लॅटमध्ये मला ठेवणं, हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा फोन नंबर आहे xxxxxxxx आणि एक सांगायचं राहिलं. मला तुरुंगात पाठवलंत, तर माझ्या ब्लॉकची
वाताहत होईल. ब्लॉकची काळजी कोण घेणार? ब्लॉकमध्ये मी एकटीच राहते."
चारही अधिकाऱ्यांनी चंदाला तुरुंगात पाठवू नये, असा निर्णय दिला.
&&&&&&&

No comments:

Post a Comment