*तरुणांना खरं तर एकनिष्ठ राहायचं असतं, परंतु त्यांना ते शक्य होत नाही. आणि वयस्करांना खरं तर एकनिष्ठ राहण्यात स्वारस्य नसतं, परंतु राहावं लागतं!-ऑस्कर वाइल्ड
*पाण्यामध्ये एक वेळ हायड्रोजन किंवा ऑक्सिजन नसेल तर माझी काही हरकत नाही.परंतु ज्यात अल्कोहोल नाही, असे पाणी मला निषिद्ध आहे.- बेन बर्गर
*इस्पितळातील बेड म्हणजे एकाच जागी पार्क केलेली टॅक्सी असते...मीटर भराभरा वाढत जाणारी!
*मित्र कितीही जवळचा असला तरी तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्यानं आहार नियंत्रण करावं, अशी अपेक्षा करणं ठीक नाही.
*धोकादायक शस्त्रे मूर्खांच्या हाती पडू देऊ नयेत या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे.आणि त्याची सुरुवात पेनापासूनच केली पाहिजे.-फ्रॅक लॉइड राइट
*आपल्या घरात जे आहे ते पुरेसे नाही, हे बायकांच्या मनावर ठरवणे, हे जाहिरातदारांचे मुख्य उद्दिष्ट असते.-बी.एल. पकेट
*मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जी नाटक पाहायला जाते आणि प्रेक्षकांकडे तोंड करून बसते!-मर्व्ह स्टॉकवूड
*इंटरव्ह्यूला जाताना फार तयारी करण्यात काही अर्थ नसतो. कारण इंटरव्ह्यू घेणारा नेहमीच जास्त तयारीत असतो.
*जगातला बुद्धीचा साठा तेवढाच राहतो, लोकसंख्या मात्र वाढत जाते.-आर्थर क्लार्क
*एखाद्या परग्रहावर प्रगत मानव असेल, असं मला वाटत नाही. माणूस इथून-तिथून सारखाच!- बॉब मॉंकहाऊस
*आपण एकूणच खूप प्रगती केली आहे. तुम्ही फोन करून बघा,पोलिसांपेक्षाही आपल्या घरी पिझ्झा लवकर पोचतो!-जेफ मार्डर
*माझे मन कुणाही विषयी पूर्वग्रहदूषित नाही. मी सगळ्यांचाच दोष करतो.- डब्ल्यू.सी.फिल्डस
* जे पुरुष कान टोचून घेतात, ते विवाहासाठी अधिक योग्य असतात. त्यांना दुःख म्हणजे काय याचा अनुभव आलेला असतो.
*आरोग्यविषयक पुस्तके वाचताना सावध असले पाहिजे.त्यातील मुद्रणाच्या एखाद्या चुकीमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.- मार्क ट्वेन
*नशिबावर विश्वास ठेवायलाच हवा. अन्यथा आपल्या नावडत्या व्यक्तीचं यश आपण कशाच्या नावावर खपवणार?
*आपल्या कर्तृत्वानं अमर होण्याची कल्पना मला फार पटत नाही. न मरता अमर होण्यातच खरी गंमत आहे.-वुडी अलेन
*माणसं एकमेकांच्या प्रेमात 'पडतात',त्यासाठी गुरुत्वाकर्षण ला जबाबदार धरले जाऊ नये.-अल्बर्ट आइन्स्टाइन
*कुठलीही स्त्री स्वतःचे अचूक वय सांगू शकणार नाही.अहो,त्यासाठी केवढी आकडेमोड करावी लागते.-ऑस्कर वाइल्ड
*मनुष्याच्या आयुष्यात दोन प्रकारच्या शोकांतिका असू शकतात. एक त्याला जे हवे ते प्राप्त न होणे आणि दुसरी त्याला जे हवे ते प्राप्त होणे!- ऑस्कर वाइल्ड
*आत्मचरित्र म्हणजे आपले आयुष्य कसे असायला हवे होते, याबाबतचा कल्पनाविलास!-हर्बर्ट सॅम्युअल
*सकाळी फिरायला जाण्यात एक महत्त्वाचा धोका असतो. अशा फिरायला जाण्याचा काही उपयोग नाही हे आपल्या लक्षात येतं तोवर आपण खूप दूर चालत आलेलो असतो.-फ्रॅकलिन जॉन्स
*पृथ्वीबाहेर कुठेतरी उत्क्रांत, बुद्धिमान सजीवांची वस्ती नक्कीच आहे. ह्याचा ठळक पुरावा म्हणजे त्यांच्यापैकी कुणीही आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत नाहीत.- बिल वॅटरसन
*लोक तुमच्याविषयी बोलतात यापेक्षा वाईट गोष्ट एकच असू शकते, लोक तुमच्याविषयी काहीच बोलत नाहीत!-ऑस्कर वाइल्ड
* मी खूप प्रयत्न केले,पण यश मिळाले नाही. त्यावरून मी एकच धडा शिकलो-प्रयत्नच करू नयेत.-होमर सिम्प्सन
* आडाखे बांधणे हे महा कठीण, विशेषतः भविष्याविषयी!- निल्स बोअर
*मरावे परि कीर्तीरुपी उरावे, असे म्हणतात, पण सगळ्यांनीच आपल्या मुलीचे नाव कीर्ती ठेवावे, असा आग्रह धरणे योग्य आहे का?
*'कसं काय?' असं विचारल्यावर,'झकास' असं उत्तर देणारी माणसं जेवढी वाढतील, तेवढी समाजाची प्रकृती ढासळत जाईल.
*तुमचं वय जसं जसं वाढतं, तशा तीन गोष्टी होत असतात-एक म्हणजे तुमची स्मरणशक्ती कमी होते आणि दुसरं... आता ते मला आठवत नाही.- सर नॉर्मन विसडम
*जो लेखक मूर्खांसाठी लिहितो,त्याला नेहमीच चांगल्या प्रतिसादाची खात्री असते.-आर्थर शॉपनहर
No comments:
Post a Comment