२ . झोपलो तर - . . . सर्व बेडशीट खराब केली . तुम्हाला झोपण्याचीही शिस्त नाही .
३ . काही खायला मागितले तर - . . . आताच तर दिले होते ना ? काम नाही धाम . . . इतक्यात भूक लागली ?
४ . घरी काम करणान्या कामवाल्याबाईला आवाज दिला तर - . . . काय हवंय आता ? मला सांगा की . . मी आहे ना जिवंत . . !
५. टिव्ही लावला तर - . . . मला जरा पडूया हो . . . सारखं आपलं रांधा वाढा - उष्टी काढा . . . जीव दमून गेलाय माझा .
६ . बेडवरून जरा उठलो तर . . . आता कुठे चाललात उठून ?
७ . अंथरूणातून नाही उठलो तर . . . सकाळपासून बेडवर लोळताय . . . कंटाळा कसा येत नाही , कुगास ठाऊक ?
८ . चहा मागितला तर - . . . किती चहा प्यायचा हो ? त्याला काही लिमीट आहे की नाही ? ऑफिस नाहीये हे सतत चहा ढोसायला . . . माझं काम वाढवताय फुकट . . .
२ . बाटलीकडे नुसतं पाहिलं तर - . . . नाही हां . . . उगाच ज्यास्त शहाणे बनू नका .
१० . घरातून बाहेर नुसतं पाहिलं तर - . . . काय पहाताय ? कोणी नाहीये बाहेर . . . निवांत झोपून
११ . थोडा झोपून राहिलो तर - . . . उठा
आता . . . घरी रहायचं म्हणजे लोळत पडायचं नाहीये . . . मला
चादर नीट करायचीय बेडवरची . . .
१२ . मुलांना काही बोललो तर - . . . . तुम्हाला काय त्रास होतोय
मुलांचा ?
१३ . नाही बोललो तर - . . . काय उपयोग तुमचा घरी राहून ? तुम्ही
काहीही बोलू नका मुलांना . . . . डोक्यावर बसवून ठेवलंय नुसतं !
१४ . जरा शेजारी मित्राकडे जातो , बोललो तर . . . वेडे झालात काय ? तोंडाला फडकं बांधून कसल्या डोंबलाच्या गप्पा मारणार ? बसा गुप चूप घरात . . .
१५ . कोणाला घरी बोलावलं तर - . . खबरदार हा कोणाला बोलावलंत तर . . . . कोणी माझ्या घरी आलं नाही पाहिजे . . . मोदींनी काय सांगितलंय , विसरलात का ?
१६ . संपूर्ण दिवस मोबाईलवर घालवला तर - . . . आता ठेवा
की तो फोन . . . सारखं आपलं टुकटुक . . . टुकटुक . . . आम्हाला मान वर करायला फुरसत नाही आणि ह्यांना बरं मोबाईलवर चॅटिंग सुचतं ? ऑफिसमध्ये पण दिवसभर हेच करता की काय , देव जाणे . माझं वैताग आलाय राव . . . वाचवा रे कुणीतरी . . . ऑफिस उघडा राव एकदाचं . . . जीव गुदमरलायं नुसता .
**********
दिवा म्हणे वातीला ! सांग मानव जातीला ! ! सुखासोबत दुखातही रहा ! एक दुसऱ्याच्या साथीला ! !
No comments:
Post a Comment