Sunday, 19 April 2020

व्हॉट्स अॅपवरून माणसाचा स्वभाव

व्हॉट्स अॅपवरून माणसाचा स्वभाव
* ज्याचा डीपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो .
वारंवार डीपी बदलणारे चिडचिड्या स्वभावाचे असतात .
* छोटे व आयते स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात .
 * नेहमी स्टेटस बदलणारे आपले वर्चस्व दाखवतात .
* पुन्हापुन्हा पोस्ट टाकणारे दिलदार मनाचे असतात .
* कधीच कुणाला लाईक न  करणारे समाधानी असतात .
* इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात .
* * फोटो दिसताच ओपन  करणारे अधीर स्वभावाचे असतात.

* मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे शांत व संयमी असतात .
* कामापुरते व्हॉट्स अॅप चालू ठेवणारे जीवनात  यशस्वी होतात . . .
 * *******
बायको : अहो , मी काय काय सांभाळू ? मुलं सांमाळू , का तुम्हाला सांभाळू , का तुमच्या आई , वडिलांना सांभाळू , का घर सांभाळू ?
नवरा : ( आरामात ) तू फक्त स्वतःची जीभ सांभाळ !
******
' मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते ' कारण . . . न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते . . . विश्वास ठेवा . . . . आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो , तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं .
* * * * *
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते . म्हणून अपेक्षा जरूर बाळगा ; पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या . . . . !
* * * * *
पिंट्या:  बाबा , शिक्षकांनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय .
 बाबा : अरे पण कशी नेणार ? शाळेत जाईपर्यंत ती विरघळून जाईल . तुझे शिक्षक आपल्या घराजवळच राहतात ; मी नेऊन देईन . सकाळी टीचरच्या घरी
बाबा : नमस्कार शिक्षक . ही घ्या तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणली .
 शिक्षक : कुल्फी ? ती कशाबद्दल ?
बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा पिंट्याने निरोप दिला मला ; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून . . . . .
 शिक्षक : तुमचा पिंट्या लहान आहे हे मलाही माहीत आहे . पण , तो अजून बोबडं बोलतो हेही तुम्हाला माहीत हवं ; मी कुल्फी नाही . ' स्कूल फी आणायला
सांगितली त्याला !

No comments:

Post a Comment