दोन पावलं
पोलीस (चोरास):खबरदार, एक पाऊल पुढे टाकलास तरी जेलमध्ये टाकेन.
चोर:ठीक आहे! मग मी दोन पावले पुढे टाकतो.
वजन
डॉक्टर:भीमाबाई, एक महिना घोड्यावरून रपेट केलीत.मग वजन कमी झालं का?
भीमाबाई:हो, फक्त माझ्या ऐवजी घोड्याचं कमी झालं.
फक्त आतलं
दुकानदार: तुम्ही सामोसा फक्त आतूनच का खाल्लात, साहेब? बाहेरचं आवरण तसेच आहे.
राजू काका: कारण डॉक्टरांनी मला बाहेरचं खाऊ नको, म्हणून सांगितलंय.
भलंमोठ्ठं अंडं
आई: बंडू, अंडं कोण कोण देतं सांग पाहू!
बंडू: कोंबडी, कोकिळा आणि शिक्षक!
आई: मूर्खां! शिक्षक कधी अंडं देतात का?
बंडू: हे बघ, माझ्या प्रगतीपुस्तकात त्यांनी किती मोठ्ठं अंडं दिलंय.
फ्लॉवर
बंटी: आजी, मला फ्लॉवर दे!
आजी: कच्च्या फ्लॉवर कशासाठी हवाय?
बंटी: अगं, देवाला वाहायचंय!
No comments:
Post a Comment