Tuesday, 12 May 2020

हसा!हसा!! फक्त हसा !!!

नवीन तरुण कर्मचाऱ्याला वरिष्ठ समजावून  सांगत होते. 'त्याला येथे काम करायचे असेल तर  त्याने दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत.' 'कोणत्या साहेब?' कर्मचाऱ्याने विचारले.
 'तू ऑफिसमध्ये येताना बाहेरील पायपुसण्यावर पाय साफ करून  आलास का?' 'होय साहेब', तो तरुण म्हणाला. 'तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी  सत्य बोलावे अशी अपेक्षा आहे; याचे कारण बाहेर पायपुसणे ठेवलेलेच नाही.'
©©©©©©©©©
एका विक्रेत्याने एका गृहिणीच्या घरात सतरंजीवर केरकचरा पिशवीतून आणून टाकला. 'बाईसाहेब. हे यंत्र  वापरून मी हे सर्व लगेच स्वच्छ करीन, तसे झाले नाही तर मी हे सर्व खाऊन दाखवीन'.
गृहिणी- 'त्यासाठी तुम्हाला चटणी हवी की केचअप? कारण आमच्या घरात वीज नाही'.
©©©©©©©©©
टॅक्सीतून प्रवास करीत असताना प्रवाशाने सहज ड्रायव्हरच्या पाठीवर थाप मारली, त्याबरोबर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि टॅक्सी अस्ताव्यस्त धावू लागली, कसोशीने ड्रायव्हरने त्यावर
ताबा मिळविला. प्रवाशाकडे वळून तो म्हणाला,"कृपाकरून पुन्हा असे करू नका."
 प्रवाशाने ड्रायव्हरची माफी मागितली आणि चकित होऊन विचारले, 'अरे एका हलक्याशा थापेने तू एवढा घाबरशील याची मला कल्पना नव्हती.'
ओशाळून ड्रायव्हर उत्तरला, 'साहेब,  त्यात तुमची काही चूक नाही. कारण टॅक्सी चालविण्याचा हा माझा पहिलाच दिवस आहे, गेली  २५ वर्षे मी शववाहिनी चालवीत होतो.'
©©©©©©©©©©
एका कर्मचाऱ्याने आपल्या साहेबांच्या घरी फोन  केला. साहेबांच्या पत्नीने तो घेतला. साहेबांबद्दल  चौकशी केल्यावर साहेबांची पत्नी म्हणाली, 'मला  फार वाईट वाटते की तुझे साहेब गेल्या आठवड्यात
निधन पावले.' दुसऱ्या दिवशी त्या कर्मचाऱ्याने पुन्हा फोन केला. त्यावेळी साहेबांची पत्नी म्हणाली, 'कालच तुला मी सांगितले की, तुझे साहेब गेल्या आठवड्यात निधन पावले.' तिसऱ्या दिवशी पुन्हा
एकदा त्या कर्मचाऱ्याने साहेबाच्या घरी फोन केला,  त्या वेळी चिडून साहेबाची पत्नी त्या कर्मचाऱ्याला  म्हणाली, 'तुला किती वेळा सांगू की, तुझे साहेब गेल्या  आठवड्यात मृत्यू पावले.' त्यावर हसून तो कर्मचारी
म्हणाला हे वाक्य ऐकून मला फार आनंद होतो म्हणून  मी वारंवार फोन करतो.
©©©©©©©©©
 रामरावांनी वाचले की  पुरुष १५ हजार शब्द रोज वापरतो, पण स्त्री ३० हजार शब्द वापरते. त्याने पत्नीला हे सांगितले. ती म्हणाली, कारण आम्ही काय बोलतो ते नेहमी आम्हाला पुनःपुन्हा तुम्हाला सांगावे
लागते.
रामराव- काय?
©©©©©©©©©©
श्यामराव पहिलवान मंबईत आले व  लोकल, बसमधून गर्दीतून भटकले. रात्री ते मित्राला  म्हणाले, "लोक उगाच घाबरवतात. मी सबंध दिवस  खिशांत पैसे ठेवून फिरलो पण माझे पाकीट कोणी
मारले नाही.."
जवळच उभा असलेला पाकीटमार  म्हणाला, "साहेब, खऱ्या नोटा आम्ही मारतो, तुमच्याकडच्या नोटा खोट्या आहेत". श्यामराव आ
वासून पाहू लागले.
©©©©©©©©©

No comments:

Post a Comment