"मी फर्निचर विकतो'' बाबुराव म्हणाले.
'वा! कुठे आहे तुझं शोरूम?" मित्राने विचारले.
'नाही. दुकान वगैरे नाही, घरचेच विकतो.'
बाबुराव शांतपणे म्हणाले.
******************
टेलिफोन कंपनीच्या कर्मचाऱ्याने खणलेल्या एका रस्त्यात चितोपंत पडले. गुडघ्याला मार लागला म्हणून ताबडतोब सार्वजनिक
टेलिफोनवर जाऊन त्यांनी तक्रार केली. "हॅलो, माझी तक्रार नोंदवून घ्या."
"तुमचा आधी फोन नंबर सांगा."
"माझ्याकडे फोन नाही. मी पब्लिक फोनवरून बोलतोय."
"तुमच्याकडे फोन नाही, म्हणजे आमच्याकडे तुमची तक्रार चालणार नाही."
"अहो पण, तुमच्या कर्मचाऱ्याने खणलेल्या खड्यात पडलो मी. माझा पाय दुखावला आहे, तुम्हाला नुकसानभरपाई द्यावीच लागेल."
"मुळीच देता येणार नाही."
"का?"
"तुमच्याकडे फोन नाही म्हणून तुमचा आमचा संबंधच येत नाही. उलट तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुमच्यावर आम्ही चॅप्टर केस
करू तुमचे नाव आणि पत्ता द्या."
चिंतोपंतांनी फोन बंद केला.
************
एक प्रवासी मोटारीमधून चालला होता. त्याचा रस्ता चुकला. त्याने आपली मोटर एका माणसजवळ थांबवली व विचारले,'हा रस्ता पुण्याला जातो का?' ज्याला विचारले तो साधा सुधा खेड्त माणूस होता. त्याने उत्तर दिले, 'मला माहीत नाही साहेब. प्रवाशाने परत
विचारले, सोलापूरला जाणारा रस्ता सांगू शकील का? परत तेच उत्तर मिळाले, 'मला माहीत नाहीं साहेब!'
प्रवासी जरा चिडून म्हणाला,'हा रस्ता माहीत नाही, तो रस्ता माहीत नाही. मग तुला नक्की काय माहीत आहे ते तरी सांग.'
खेडुताने सरळ उत्तर दिले,' मी रस्ता चुकले नाही एकढे मात्र मला नक्की माहीत आहे.'
*********
रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात प्रवेश करून व वरच्या अधिकाऱ्याला सलाम ठोकून एक हवालदार म्हणाला, "साहेब या दहा माणसांना
पकडून आणलय."
इन्स्पेक्टर- अरे वा! कमाल केलीस! पण त्यांचे अपराध काय आहेत?
हवालदार-या बाजूला जे पाच जण उभे आहेत, ते दिव्याशिवाय सायकली घेऊन चालले होते."
इन्स्पेक्टर-छान केलंस पकडलंस ते! बरं या बाजूला पाच जणांना उभं केलं आहेस, त्यांनी कोणते गुन्हे केले आहेत?
हवालदार- ते सायकलीशिवाय नुसतेच दिवे हातात घेऊन रस्त्याने चालले होते.
***********
लंडनमध्ये एका चोराने लहानशी वस्तू चोरली आणि तो सायकलीवरून पसार होऊ लागला. पोलीस सायकलीवरून त्याच्या मागे लागला. नो
एन्ट्री फलक असलेल्या रस्त्यात चोर घुसला, पण पोलीस मात्र तेथेच थांबला आणि चोर पळून गेला. वरिष्ठांनी त्याबद्दल जाब विचारला.
तेव्हा पोलीस म्हणाला, "चोराने वाहतुकीचे नियम मोडले, पण मी ते मोडू शकत नव्हतो. कारण मी सरकारी नोकर आहे. आपण आपला
कायदा पाळलाच पाहिजे, असा सरकारच हुकूम आहे.
*************
Very nice jokes
ReplyDelete