Sunday, 22 March 2020

प्रामाणिक तस्कर

एकदा मुल्ला नसरुद्दीन राज्याच्या सीमेबाहेर जात असताना सीमेवरच्या पहारेकर्‍याने त्याला अडवले. कोण आहेस तू? त्याने दरडावत विचारले.
एक प्रामाणिक तस्कर, साहेब मुल्ला नसरुद्दीन म्हणाला.
प्रामाणिक तस्कर! पहारेकरी हसला व म्हणाला, मग सांग बरं, तू कशाची तस्करी करत आहेस? मुल्लाने त्यावर काही उत्तर दिले नाही. पहारेकर्‍याने मग मुल्लाची व त्याच्या गाढवावरच्या गवताच्या ओझ्याची झडती घेण्यास सुरुवात केली. जर तुझ्याजवळ काही तस्करीचे सामान मिळाले तर तुला मी कठोर दंड करीन. पहारेकरी झडती घेत म्हणाला.

हसू नका बरं

एक मुलगी डॉक्टरकडे गेली होती.
डॉक्टर- सांग, काय होतंय तुला?
मुलगी - कालपासून पोटात खूप दुखतंय.
डॉक्टर - काय खाल्लं होतंस काल?
मुलगी - चीज पिज्झा, एक चिकन बर्गर, ड्राय मन्चुरिअन आणि मग फालुदा विथ आईस्क्रिम
डॉक्टर - हा दवाखाना आहे, फेसबुक नाही. खरं काय ते सांग.
मुलगी - सॉरी, परवाचा शिळा फोडणीचा भात

Sunday, 26 January 2020

हसा किंवा संघर्ष करा फ

गुरुजी : एक बाई एका तासांत ५0 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.

Saturday, 2 November 2019

झकपक झम्पू!

झम्पू : अग, काल न तू स्वप्नात आली होतीस.
मुलगी : व्वा! काय होत स्वप्न?
झम्पू : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांबप्रवासाला निघालो आहोत..
मुलगी : पुढे?
झम्पू : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो !
मुलगी : बापरे मग काय होत?
झम्पू : त्या अपघातात आपण दोघेच वाचतो आणि तू उठून काही तरी शोधत असतेस.
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
झम्पू : नाही ग. तू बस कंडक्टरला शोधत असतेस.. तिकिटाचे उरलेले पैसे घेण्यासाठी!
**************************************

Wednesday, 27 February 2019

vinod

नाश्टा
मंगल: काय गं, तू काहीही न खाता जिवंत राहू शकतेस का?
सुमन:नाही बाई! खाल्ल्याशिवाय मी कशी जिवंत राहू गं?
मंगल:पण मी राहू शकते,बाई!
सुमन:ते कसं?
मंगल:नाश्टा करून!

चप्पल
समोरून एक माणूस लंगडत येताना पाहून दोन डॉक्टरांमध्ये जुंपली. 
पहिला डॉक्टर म्हणाला,"मला वाटतं,त्याच्या पायाचे हाड मोडले असणार. म्हणूनच तो लंगडत येतोय."
दुसरा म्हणाला,"नाही.मला वाटतं त्याचा अंगठा तुटला असणार."
 यावरून दोघांमध्ये वाद होत राहिला.कुणीच माघारी घेईना. शेवटी तिसरा डॉक्टर त्यांच्यामधे पडला. तो म्हणाला,"तुम्ही असे भांडत बसू नका. त्यापेक्षा आपण त्यालाच विचारू ,त्याला काय झालेय ते!"
तो माणूस त्या डॉक्टरांजवळ आला. तिसरा डॉक्टर म्हणाला, "ओ महाशय, तुम्ही लंगडत का चालला आहात? तुमच्या पायाचे हाडवगैरे तुटलेय का?"
तो माणूस म्हणाला," नाही हो, माझी चप्पल तुटली आहे."

लाईट
सोन्या: अरेरे, लाईट गेली!
मोना:लाईट गेली तर गेली. जरा पंखा तरी लाव.
सोन्या:मूर्खच आहेस. पंखा लावला तर मेणबत्ती विझणार नाही का ?

शेपूट 
शिक्षक : हत्तीची ओळख सांग.
नीलम :दोन शेपट्या.एक मागे एक पुढे 

होमवर्क 
विशाल: गुरुजी, काल मी जे काम केले नाही,त्यावरून मला शिक्षा करणार का?
गुरुजी:नाही,अजिबात नाहीस.
विशाल: ठीक आहे सर! काल मी होमवर्क केला नाही.

कुत्रा 
रोहित:काय रे,तुला कुत्र्याची भीती वाटते का?
सलील:नाही रे! मी त्याला उशीरपासून एस्क्यूज म्हणतोय,पण तो जागचा हलेचना.
रोहित:अरे,कुत्र्याला कोणी एस्क्यूज मी म्हणतं का ? त्याला तर कुत्र्या हाड म्हणायचं.
सलील: अरे ते ठीक आहे रे,पण आजच मॅडम म्हणाल्या की,आपल्या बोलण्याची भाषा सुधारा.जीवनात थोडे  प्रोफेशनल बना.

Friday, 15 February 2019

joke


पिंकी- आई, तू इस्त्री का करतेस?
आई: बाळा, इस्त्री केल्याने सुरकुत्या नाहीशा होतात.
पिंकी: दे इकडं इस्त्री, लवकर दे माझ्याकडे!
आई: का गं?
पिंकी: आजीच्या गालावरच्या सुरकुत्या मिटवून येते.
*****
बाई पिंटूला फार वैतागल्या होत्या.
बाई: पिंट्या, तुझ्या दप्तरातली सगळी पुस्तकं बाहेर काढ!
पिंटू: बाई,काढली.
बाई:ही पुस्तकं कशाची आहेत?
पिंटू: कागदाची!
बाई:ते मलाही माहित आहे,कागदाची आहेत,पण...
पिंटू: तर मग मला का विचारता?

Friday, 23 November 2018

आमच्या लग्नात रुसलेले


नवरदेव : महाराज, वधूला डाव्या बाजूला बसवू की उजव्या बाजूला?
महाराज: कुठेही बसवा. नंतर ती तुमच्या डोक्यावरच बसणार आहे.
*****
आज-काल पहिलीची पोरं केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं होणार नाही!
----------------
 बायको : अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!
-----------------
 दीपिका अन रणवीरचं लग्न अवघ्या 30 लोकांच्या उपस्थित झाले. तेवढे तर आमच्या लग्नात रुसलेले असतात.