पिंकी- आई, तू इस्त्री का करतेस?
आई: बाळा, इस्त्री केल्याने सुरकुत्या नाहीशा होतात.
पिंकी: दे इकडं इस्त्री, लवकर दे माझ्याकडे!
आई: का गं?
पिंकी: आजीच्या गालावरच्या सुरकुत्या मिटवून येते.
*****
बाई पिंटूला
फार वैतागल्या होत्या.
बाई: पिंट्या, तुझ्या दप्तरातली सगळी
पुस्तकं बाहेर काढ!
पिंटू: बाई,काढली.
बाई:ही पुस्तकं कशाची आहेत?
पिंटू: कागदाची!
बाई:ते मलाही माहित आहे,कागदाची आहेत,पण...
पिंटू: तर मग मला का विचारता?
*****
आजी आपल्या
नातवासोबत आपल्या लग्नाचा व्हिडिओ पाहात होत्या.
नातू: आजी, हा माणूस कोण आहे?
आजी: अरे,हेच तर तुझे आजोबा आहेत.
नातू: आजोबा तर इतके स्मार्ट दिसतात, मग तू या (घरातल्या) म्हातार्यासोबत का राहतेस?
*****
बाई हातात छडी
घेऊन वर्गात शिरल्या.
बाई: पिंकी,तू शाळेला का आली नव्हतीस?
पिंकी: बाई, मी स्वप्नात जपानला गेले होते.
बाई: बंड्या, तू कुठे होतास काल?
बंड्या: बाई, मी पिंकीला सोडायला एअरपोर्टवर
गेलो होतो.
*****
पूर्वी मुलं
आजीच्या घरी जन्माला यायचे, त्यामुळे नेहमी आजीकडे
जायचे,
आता मुलं दवाखान्यात
जन्माला येतात,त्यामुळे सारखे सारखे दवाखान्यात
जातात.
*****
एकदा बंड्या
फिरत फिरत जंगलात पोहचला. एका झाडावर त्याने साप
लटकलेला पाहिला. थांबून बंड्या म्हणाला, अरे गाढवा, नुसता लटकून काही होणार नाही. आईला सांग कॉम्लान प्यायला दे.
*****
एक वेडा आरशात
स्वत:ला पाहून विचार करू लागला- अरे,याला कुठं तर पाहिलंय.
खूप वेळ टेन्शनमध्ये. विचार करतच म्हणाला, हेतच्या मारी,
हा तर तोच आहे, त्यादिवशी माझ्यासमोर बसून केस
कापून घेत होता.
*****
देवाकडून पप्पूने
तीन वरदान मागितले-
एक- नोकरी, दुसरी- मोठी गाडी आणि तिसरी-खूप सार्या
मुली
भगवान-तथास्तू
आज पप्पू मुलींच्या
कॉलेजमध्ये बस ड्रायव्हर आहे.
*****
एक ठार बहिरा
माणूस चिखलात पडला.
दुसरा पुढे
झाला आणि म्हणाला-चिखलात पडलास का?
पहिला- अरे नाही रे बाबा, चिखलात पडलोय.
दुसरा- असं होय, मला वाटलं,चिखलात पडलायंस.
*****
No comments:
Post a Comment