गुरुजी : एक बाई एका तासांत ५0 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.
*****
गुरुजी : पराकोटीच्या विरोधाभासासाचे उदाहरण सांगा बघू.
बंड्या: सर,पाकिस्तानच्या नेत्याचे नाव शरीफ आहे.
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात,
भारतीय.. मुकाट्याने.
*****
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले.'व्हाय आर यू लेट?'
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, 'सर रस्त्यावर
चिख्खल झाला होता आणि तिथे
उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.'
सर पुन्हा ओरडले, 'टॉक इन इंग्लिश!'..
हजरजबाबी मन्याने म्हटले,'सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!'
*****
नवर्याला श्री का म्हणतात ?
कारण नवरा नारळासारखा बाहेरुन कडक, तर आतुन पाण्यासारखा गोड असतो.
बायकोला सौ का म्हणतात ?
कारण ती एकटीच शंभराच्या बरोबरीची असते
No comments:
Post a Comment