Sunday, 22 March 2020

हसू नका बरं

एक मुलगी डॉक्टरकडे गेली होती.
डॉक्टर- सांग, काय होतंय तुला?
मुलगी - कालपासून पोटात खूप दुखतंय.
डॉक्टर - काय खाल्लं होतंस काल?
मुलगी - चीज पिज्झा, एक चिकन बर्गर, ड्राय मन्चुरिअन आणि मग फालुदा विथ आईस्क्रिम
डॉक्टर - हा दवाखाना आहे, फेसबुक नाही. खरं काय ते सांग.
मुलगी - सॉरी, परवाचा शिळा फोडणीचा भात

*******************
बंड्याला झोप येत नव्हती.
रात्री २ वाजता त्यानं डॉक्टरांना फोन केला.
बंड्या - डॉक्टर, खूप दिवस झाले, मला रात्री झोप येत नाहीय.
डॉक्टर - (चिडून) अरे, मग हा आजार पसरवतोयस कशाला? निदान मला तरी झोपू दे. उद्या क्लिनिकवर ये, तेव्हा बघू.
*******************
बंड्याचा फोन वाजला समोरुन एक महिला बोलत होती.
महिला- हॅलो, मी आरती बोलते.
बंड्या- बोला, बोला, मी टाळ्या वाजवतो !
********************
तो- अगं ऐकलंस का? सुधा मूर्तींनी एकवीस वर्षांत एकही नवीन साडी घेतलेली नाही !
ती- बरं मग ?
तो- (खवचटपणे) काही नाही, सहजच वाचलं ते तुला ऐकवलं !
ती- हो का ? मी पण यापुढे एकही साडी घेणार नाही फक्त तुम्ही नारायण मूर्ती होऊन दाखवा !
आवाज बंद !

No comments:

Post a Comment