Friday, 23 November 2018

आमच्या लग्नात रुसलेले


नवरदेव : महाराज, वधूला डाव्या बाजूला बसवू की उजव्या बाजूला?
महाराज: कुठेही बसवा. नंतर ती तुमच्या डोक्यावरच बसणार आहे.
*****
आज-काल पहिलीची पोरं केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं होणार नाही!
----------------
 बायको : अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!
-----------------
 दीपिका अन रणवीरचं लग्न अवघ्या 30 लोकांच्या उपस्थित झाले. तेवढे तर आमच्या लग्नात रुसलेले असतात.

Monday, 19 November 2018

पुरणपोळी


 गुरुजी : बंड्या, आज डब्याला काय आणलं आहेस.
बंड्या : गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी : मला देशील का तुझा डबा. मी आज डबा आणला नाही.
बंड्या : हो देईन.
 गुरुजी : पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील?
 बंड्या : सांगीन, कुत्र्याने खाल्लं म्हणून.
*****
एक जण एका वृद्धाला विचारतो- 70 व्या वर्षी पण तुम्ही पत्नीला डार्लिंग, स्वीटी, हनी, लव्ह कसं काय बोलता? तुमच्या दोघांच्या प्रेमाचं गुपित काय? वृद्ध व्यक्ती म्हणाली, कसलं प्रेम, अन् कसलं गुपित? अहो, 10 वर्षे झाली, तिचं नावच विसरलोय! तिला नाव विचारायचं धाडसंच होत नाही

संशोधन


एका संशोधक मित्राला मी फोन करून विचारलं, ’काय रे, सध्या काय चाललंय?’ त्याने उत्तर दिलं, ’तणावपूर्ण स्थितीत चिनी माती, काच, ॅल्युमिनियम, पोलादाच्या वस्तूंवर पाणी, आम्लारी आणि उष्णता यांच्यावरील परिणाम उत्कृष्ट कसे होतील याविषयी निरीक्षण, कृती आणि अवलोकन करतोय.’ हे संशोधन मी अगदी सामान्य वातावरणात घरगुती साधनं वापरुन करत असल्याचंही त्यानं सांगितलं. मी भारावून प्रयोग पाहायला त्याच्या घरी गेलो, तर वहिनी कमेरवर हात ठेवून उभ्या होत्या. आणि हा पठ्ठ्या भांडी घासून गरम पाण्याने विसळत होता.
 *****
 आज-काल पहिलीची पोरं केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं व्हायचा नाही!
 *****
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागून चालत असतात. याचाच अर्थ असा की लोक सुखात पुढे-पुढे नाचत असतात आणि दु:खात मागून चालत असतात. लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोक आपल्या पुढे असले काय किंवा मागे असले काय, आपलं जीवन आपण आपल्या हिंमतीवर व निश्चयानेच जगायचं असतं.
 *****
 कंठ दिला कोकिळेला; पण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला; पण इच्छा काढून घेतली. दिला संतोष संतांना; पण संसार काढून घेतला. हे मानवा... कधी करू नको अहंकार स्वत:वर तुझ्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.
 *****
 मास्तर : जर 25 रुपयाला पाव भाजी मिळते तर 100 रुपयाला काय मिळेल?
संतोष : फुल भाजी
 *****
 मास्तर : भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणतात?
 संतोष : हिंदुस्तान लिव्हर
*****
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात.... आणि भारतीय नवरे? त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. ते बिचारे मुकाट्याने!

Saturday, 17 November 2018

अहो, तुम्ही कुठे आहात?


अहो, तुम्ही कुठे आहात? आफीसमध्येच आहात ना? घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले
हो... ऑफीसमधेच आहे मी, का, काय झाले?‘ नवर्याने कळवळून विचारले
नाही, काही विशेष झालं नाही.... आपली कामवाली बाई कोणाबरतरी पळून गेली आहे म्हणे.... असं तिचा नवरा रडत सांगत आला आहे... म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढंच...!

****
दोन दोस्त गप्पा मारत असतात...
पिंट्या : मला माझ्या गर्लफ्रेंडला एक सॉलिड गिफ्ट द्यायचं आहे. काय देऊ सांग ना.
बंड्या : असं कर... मस्तपैकी सोन्याची रिंग घे आणि ती दे.
 पिंट्या : छे... छे... हे असलं बारीक काय नको. एकदम मोठं, भक्कम असं काही तरी द्यायचंय.
बंड्या : हो का? मग एक काम कर. ट्रकचा टायरच दे!

Friday, 16 November 2018

काय आला निकाल?


 वडील : बंड्या, नापास झालास तर मला बाबा म्हणू नकोस. निकालादिवशी..
वडील : बंड्या, काय आला निकाल?
बंड्या : नको हो, जाऊ देत. वडील : सांग म्हणतोय ना... बोल पटकन.
बंड्या : गणपत, तुम्हाला बाबा म्हणण्याचा अधिकार मी गमावलाय.
*****
बायको नवर्याला जेवायला वाढते. जेवता-जेवता नवरा अचानक चिडतो.
नवरा : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत तरी तू तांदळातले दोन-चार खडे काढू शकली नाहीस.
 बायको : देवाने तुम्हाला चांगले बत्तीस दात दिले तरी तुम्ही दोन खडे चावू शकला नाहीत. ...
बायको ती बायकोच


Thursday, 15 November 2018

चंद्रावर पहिले पाऊल


अहो, तुम्ही कुठे आहात? आफीसमध्येच आहात ना? घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले.. ‘हो... आफीसमधेच आहे मी..., का, काय झाले?‘ नवर्याने कळवळून विचारले..
 नाही, काही विशेष झाल नाही. आपली कामवाली बाई कोणा सोबततरी पळून गेली आहे म्हणे, असं तिचा नवरा रडत सांगत आला आहे. म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढच...!
********
गुरुजी: चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले?
बंड्या: नील आर्मस्ट्राँग
गुरुजी: बरोबर...आणि दुसरे?
बंड्या: तेनंच टाकलं आसल की... ते काय लंगडं वाटलं व्हय तुम्हाला?

Wednesday, 14 November 2018

बघा शाळा आठवतेय का?


 शिक्षकांचे सगळ्यात भारी दहा संवाद
1.   तुम्हाला शिकायची इच्छा नसेल तर बाहेर जा. 2. अरे, तुमच्या वर्गापेक्षा बाजार परवडला! 3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया घालवायला येता का शाळेत? 4. तुमच बड़बडून झाल का सांगा. 5. का हसतोयस तू? इकडे ये आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू. 6. तुम्हाला काय वाटलं आम्ही शिक्षक मूर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो? 7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायची गरज नाहिये. 8. जर अभ्यासच नसेल करायचा तर शाळेत कशाला येता? 9. तुमच्यापेक्षा आधीची बॅच परवडली. आणि सगळ्यात भारी 10) हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच बोलतोय. पाठीमागे नको बघू.
 *****
2.   ड जीवनसत्व मिळते आनंदी कॅल्शियमने मनाला मजबूती मिळते इवल्याश्या गोड बोलण्याने अ जीवनसत्व मिळते आयुष्य सुंदर बघण्याने डोळ्यांना नजर मिळते नेहमीच्या हास्य विनोदाने क जीवनसत्व मिळते हसरे मुख अन तेजस्वी त्वचा तरतरी अंगी वाढते.
 *****
3.   भारतात आज पण वाहनांचे अॅव्हरेज किलोमीटरवर नाही तर दिवसावर ठरवतात... आयला परवाच भरलं होतं, दोन दिवसात कसं संपलं..?
*****
4.   कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा कढीपत्त्यासारखा असतो भाजी बनवताना सगळ्यात आधी आत, आणि जेवण करताना सगळ्यात आधी बाहेर...
 *****
भावे आजींना एक फेक कॉल आला. तुमचे पॅन डिटेल्स पटकन सांगा. भावे आजी : निर्लेपचा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे! पण आता ते नाहीत. कॉल करणारा चक्कर येऊन पडला

Wednesday, 10 October 2018

हास्यकट्टा1



शिक्षक: (बंड्याला) न्युटनचा तिसरा नियम सांग.
बंड्या:सर, पूर्ण आठवत नाही. फक्त शेवटची ओळ आठवतेय.
शिक्षक: बरं, तेवढं तरी सांग.
बंड्या: ... आणि यालाच न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात.
***
रेशनिंगच्या दुकानासमोर भली मोठी रांग होती. त्या गर्दीतून एकजण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा पुढे जातो. त्याला पुन्हा फेकून देतात. तिसर्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो. व ओरडतो- जा, आज दुकानच उघडत नाही.
***
ती-पुढच्या आठवड्यात महिला मंडळाची मिटिंग आहे. त्यासाठी मला नवीन साडी घ्यायची आहे.
तो- आधीच्या कपाटभर आहेत ना?
ती- त्या सगळ्या मंडळातल्या बायकांना माहित आहेत.
तो- मग त्यापेक्षा सरळ नव्या महिला मंडळात जा ना!
***
एका मध्यरात्री बंड्याचा फोन खणखणला. डोळे चोळतच त्याने फोन उचलला.
हॅलो,हॅलो
-हॅलो, ये नंबर टू नाइन वन वन वन वन है ना? पलिकडून विचारणा झाली.
 -नहीं,ये टू नाइइन इलेव्हन इलेव्हन है। बंड्याने नंबर सांगून फोन ठेवला.
परत दोनदा असंच झाल्यावर बंड्या खवळला.
-आप, बार बार राँग नंबर क्यूं लगाता है?
पलिकडून शांतपणे प्रश्न आला,
-ये घर किसका है? ये बताइए.
-मैं बंड्या बात कर रहा हूं.
- अरे यार, मैं चिंट्या बोल रहा हूं. छहले ये बता की तेरा नंबर कब चेंज हुआ?
त्यावर
-वो तो मालुम नहीं,लेकिन ये एरियाके सभी नंबर चेंज हुए हैं ऐसा लगता है.
असे बंड्याने सांगताच,
अभि बोल यार, कैसा है? इति बंड्या.
मग पुढे बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या.
***
पक्ष्याचा पिंजरा हा शब्द लिहिताना संयोगचिन्ह (Hyphen) आपण का लिहितो? :शिक्षक
विद्यार्थी- पोपटाला पिंजर्यातील आडव्या दांडीवर बसण्यासाठी
***
आकाश- तू मला म्हणाला होतास की, तू सिंहाच्या पिंजर्यात शिरलास आणि तरी तू जिवंत आहेस. मला विश्वास होत नाही.
नीरज- अरे मित्रा! त्या वेळी तो सिंह त्या पिंजर्यात नव्हता.
***
शिक्षक- तुझ्या वडिलांचं नाव काय?
संजय- . श्रीमती राम
शिक्षक- मूर्खा, तुला माहित नाही पुरुषांच्या नावापुढे श्रीमती लावत नाहीत.
संजय-पण,माझ्या वडिलांचे नाव मतिराम आहे.
***
न्यायाधीश-तू रमेशच्या खिशात हात का घातलास?
चोर- अं,मला थंडी वाजत होती.
***
मतदार-(उमेदवारास) साहेब, मी हे करीन, ते करीन अशी भली मोठी यादीच आपण सादर केली;पण एक मुद्दा राहिला.
उमेदवार- कोणता?
मतदार-पक्षांतर

Tuesday, 9 October 2018

काय करणार?


काय करणार?
शिक्षिका : मुलांनो, मला सांगा, कोणी तुमच्या स्कूल बसमध्ये बाँब ठेवून गेल्याचं समजलं तर काय कराल?
विद्यार्थी : काही नाही बाई, एक-दोन तास कोणी बाँब न्यायला येतंय का, याची वाट पाहू. त्यानंतरही कोणी आलं नाही तर बाँब स्टाफ रुममध्ये आणून ठेवू.

***
व्हिटॅमिन्स नाही
मीना : काय हो सरिता वहिनी, दोन दिवसांपासून तुमची रिना शांत दिसतीये. तिच्या चेहर्‍यावरचं तेज हरपलं आहे.. काय होतंय तिला?
सरिता : काही नाही हो, दुरुस्तीसाठी तिचा मोबाईल दुकानात दलाय. पण व्हॉट्स अँप नसल्यामुळे तिला सगळ्याच व्हिटॅमिन्सचा तुटवडा जाणवतोय.. त्यामुळे खंगलीये बिचारी!!!
***
सत्य
जगात तीन प्रकारचे लोक असतात. 
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या जीवावर जीवनात आश्‍चर्यकारक गोष्टी घडवून आणतात. 
काहीजण गर्लफ्रेंड बनवतात आणि जीवनात आश्‍चर्यकारक गोष्टी घडताना पाहतात. 
बाकीचे लग्न करतात आणि जीवनात जे घडतं त्यावर आश्‍चर्य व्यक्त करत राहतात!

***
पूर्वी आणि आता
राम्या : पूर्वीच्या आणि आजच्या तरुणाईमध्ये काय फरक आहे?
श्याम्या : यार, आपल्यावेळी सारखीच तंगी असायची. आपणही पाप्याचे पितर होतो. चांगलं दिसण्यासाठी दहा-दहा वेळा गालावरून वस्तरा फिरवायचो. पण आताच्या मुलांकडे चहा पिण्यासाठी पैसे नसले तरी जयपूरचे राजा असल्यासारखी दाढी ठेवतात.


Wednesday, 3 October 2018

अशक्तपणा

विनोद

अशक्तपणा..
मुलगा (मुलीकडे पाहून)
चलते चलते यूंही रुक जाता हूं मैं..
बैठे बैठे यूंही खो जाता हूं मैं..
क्या यही प्यार हैं?
मुलगी वेड्या, अशक्तपणा आलाय तुला त्या थेरपीमुळे.. आधी डाएटची सगळी थेरं बंद कर..

विनोद

संख्या वाढली
माणूस हा गुणदोषांनी युक्त प्राणी आहे. प्रत्येकात गुण कमी आणि दोष अधिक असतात. आधी प्रकर्षाने नोंद घ्यावी असे पाच अवगुण होते ज्यांच्यापासून सुटका करून घेणं अवघड होतं. आता त्यांची संख्या सात झाली आहे.
काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, फेसबुक आणि व्हॉट्सअँप..

विनोद

जबरदस्तीने..
ना मुलगा सांभाळणार
ना मुलगी सांभाळणार
बायकोला चांगला जीव लावा
म्हातारपणी तीच सांभाळणार..
'माझी बायको माझा अभिमान'
लेखकाची तळटीप : वरील विचार माझे नाहीत. बायकोनेच जबरदस्तीने लिहून घेतले आहे.

विनोद

घरबसल्या फायदा...
दु:खात सुख कसं ते बघा..
काही महिन्यांपूवी ६0 ने पेट्रोल होतं.. पण मी घेत नव्हतो.
आता ९0 रुपये इतकी किंमत आहे तरी घेत नाही. झाला की नाही ३0 रुपयांचा फायदा!

विनोद

फरक..
राम्या : परदेशी नवरे आणि भारतीय नवरे यांच्यामधील फरक काय ते सांग पाहू.
श्याम्या : थांब विचार करू दे ..
(थोड्या वेळाने) परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक 'काट्याने' खातात.. तर भारतीय नवरे.. 'मु काट्याने'

Monday, 24 September 2018

फ्लाइट मोड


ताकीद
पिंकी: आई, मला इंग्रजीच्या बाईंनी सुवाच्च अक्षरं काढण्याबाबत मला अगदी शेवटची ताकीद दिली आहे.
आई: मग,काढ ना सुवाच्च अक्षर. काय अडचण आहे?
पिंकी: अडचण काही नाही, सुवाच्च अक्षर काढल्यावर बाई स्पेलिंगच्या चुका काढतात.
.............................................................................................................
शिट्टी
बंड्या: आई,मला शिट्टी घेऊन दे ना.
आई: नको, सारखी वाजवत बसशील आणि उगाच डोक्याला ता!
बंड्या: सारखी नाही वाजवणार. हवं तर तू झोपल्यावर वाजवतो.
.............................................................................................................
20 मार्कं कमी
राजू: पिंटू, आजच्या चाचणीमध्ये तुला किती मार्क मिळाले?
पिंटू:बंटीपेक्षा 20 मार्कं कमी.
राजू: असं का? मग बंटीला किती मिळाले?
पिंटू: 20 मार्कं
..............................................................................................................
चंद्र
गोट्या: अरे गण्या, एका माणसाला चंद्रावर पाठवण्याचा निर्णय झाला,पण तो अर्ध्या वाटेतूनच परत आला. असं का?
गण्या: माहीत नाही गड्या?
गोट्या: अरे, त्याला पाठवला अमावस्येच्या दिवशी, मग त्याला चंद्र दिसणार कसा?
....................................................................................................
फ्लाइट मोड
लाल्या: भोल्या, अरे काल तर विचित्रच घडलं.
भोला: काय रे काय झालं?
लाल्या: अरे, काल मी दिवसभर पप्पांचा मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवला,पण तरीही उडालाच नाही रे!
भोला: अरे मग ही मोठी कमालच झाली म्हणायची!
..........................................................................................................
माझ्या घरात रहा
बंड्या: नूतन,तू राहतेस कुठे?
नूतन: एमजी रोडवर.
बंड्या: अरेरे! रोडवर कशाला राहतेस, चल माझ्या घरी राहा.