अहो, तुम्ही कुठे आहात? आफीसमध्येच आहात ना? घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले.
‘हो... ऑफीसमधेच आहे मी, का, काय झाले?‘ नवर्याने कळवळून विचारले.
‘नाही, काही
विशेष झालं नाही.... आपली कामवाली बाई कोणाबरतरी पळून गेली आहे
म्हणे.... असं तिचा नवरा रडत सांगत आला आहे... म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढंच...!
****
दोन दोस्त गप्पा मारत असतात...
पिंट्या : मला माझ्या गर्लफ्रेंडला
एक सॉलिड गिफ्ट द्यायचं आहे. काय देऊ सांग ना.
बंड्या : असं कर...
मस्तपैकी सोन्याची रिंग घे आणि ती दे.
पिंट्या
: छे... छे... हे असलं बारीक
काय नको. एकदम मोठं, भक्कम असं काही तरी
द्यायचंय.
बंड्या : हो का?
मग एक काम कर. ट्रकचा टायरच दे!
No comments:
Post a Comment