ताकीद
पिंकी: आई, मला इंग्रजीच्या बाईंनी सुवाच्च
अक्षरं काढण्याबाबत मला अगदी शेवटची ताकीद दिली आहे.
आई: मग,काढ ना सुवाच्च अक्षर. काय अडचण
आहे?
पिंकी: अडचण काही नाही, सुवाच्च अक्षर
काढल्यावर बाई स्पेलिंगच्या चुका काढतात.
.............................................................................................................
शिट्टी
बंड्या: आई,मला शिट्टी घेऊन दे ना.
आई: नको, सारखी वाजवत बसशील आणि उगाच डोक्याला ता!
बंड्या: सारखी नाही वाजवणार. हवं तर तू
झोपल्यावर वाजवतो.
.............................................................................................................
20 मार्कं कमी
राजू: पिंटू, आजच्या चाचणीमध्ये तुला किती मार्क मिळाले?
पिंटू:बंटीपेक्षा 20 मार्कं कमी.
राजू: असं का? मग बंटीला किती मिळाले?
पिंटू: 20 मार्कं
..............................................................................................................
चंद्र
गोट्या: अरे गण्या, एका माणसाला चंद्रावर
पाठवण्याचा निर्णय झाला,पण तो अर्ध्या वाटेतूनच परत आला.
असं का?
गण्या: माहीत नाही गड्या?
गोट्या: अरे, त्याला पाठवला अमावस्येच्या
दिवशी, मग त्याला चंद्र दिसणार कसा?
....................................................................................................
फ्लाइट मोड
लाल्या: भोल्या, अरे काल तर विचित्रच घडलं.
भोला: काय रे काय झालं?
लाल्या: अरे, काल मी दिवसभर पप्पांचा मोबाईल
फ्लाइट मोडवर ठेवला,पण तरीही उडालाच नाही रे!
भोला: अरे मग ही मोठी कमालच झाली म्हणायची!
..........................................................................................................
माझ्या घरात रहा
बंड्या: नूतन,तू राहतेस कुठे?
नूतन: एमजी रोडवर.
बंड्या: अरेरे! रोडवर कशाला राहतेस,
चल माझ्या घरी राहा.
No comments:
Post a Comment