काय करणार?
शिक्षिका : मुलांनो, मला सांगा, कोणी तुमच्या स्कूल बसमध्ये बाँब ठेवून गेल्याचं समजलं तर काय कराल?
विद्यार्थी : काही नाही बाई, एक-दोन
तास कोणी बाँब न्यायला येतंय का, याची वाट पाहू. त्यानंतरही
कोणी आलं नाही तर बाँब स्टाफ रुममध्ये आणून ठेवू.
***
व्हिटॅमिन्स नाही
मीना : काय हो सरिता वहिनी, दोन
दिवसांपासून तुमची रिना शांत दिसतीये. तिच्या चेहर्यावरचं तेज हरपलं आहे.. काय
होतंय तिला?
सरिता : काही नाही हो, दुरुस्तीसाठी तिचा
मोबाईल दुकानात दलाय. पण व्हॉट्स अँप नसल्यामुळे तिला सगळ्याच व्हिटॅमिन्सचा
तुटवडा जाणवतोय.. त्यामुळे खंगलीये बिचारी!!!
***
सत्य
जगात तीन प्रकारचे लोक असतात.
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या जीवावर जीवनात आश्चर्यकारक
गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ्रेंड बनवतात आणि जीवनात आश्चर्यकारक
गोष्टी घडताना पाहतात.
बाकीचे लग्न करतात आणि जीवनात जे घडतं त्यावर आश्चर्य
व्यक्त करत राहतात!
***
पूर्वी आणि आता
राम्या : पूर्वीच्या आणि आजच्या तरुणाईमध्ये काय फरक
आहे?
श्याम्या : यार, आपल्यावेळी सारखीच
तंगी असायची. आपणही पाप्याचे पितर होतो. चांगलं दिसण्यासाठी दहा-दहा वेळा गालावरून
वस्तरा फिरवायचो. पण आताच्या मुलांकडे चहा पिण्यासाठी पैसे नसले तरी जयपूरचे राजा
असल्यासारखी दाढी ठेवतात.
No comments:
Post a Comment