Thursday, 30 April 2020

हास्य-गुदगुल्या

एका हॉलीवूडच्या प्रसिद्ध नटीचे सतरावे लग्न होते व
त्यांचा समारंभ चर्चमध्ये चालला होता. पादरीसमोर नेहमीप्रमाणे एकनिष्ठतेच्या आणाभाका झाल्यावर चर्चच्या पायऱ्या उतरताना आपल्या नवीन नवऱ्याला समज देण्यासाठी नटीने जरा घुश्श्यात सांगितले, "हे पाहा..." तिला मध्येच थांबवून नवीन नवरा म्हणाला, "प्रिये, आता बोलण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपण
आपला मधुचंद्र ताबडतोब उरकून घेऊया. मीसुद्धा बराच अनुभवी आहे. तुझा सहावा किंवा सातवा नवरा मीच होतो."

Wednesday, 29 April 2020

हास्य जत्रा

दारूचे गोडावून
शहराच्या एका दारूच्या गोडावूनला आग लागली.त्या गोडावूनमध्ये रॅम,व्हिस्की,बिअर, ब्रॅंडी वगैरे प्रकारची दारूची खोकी खचाखच भरली होती.
कोणीतरी फायरबिग्रेडला फोन केला.फायर ब्रिगेडचे जवान आले आणि त्यांनी शर्थीचे प्रयन्त करून एका तासात आग काबूत आणली. पण त्यानंतर फायरबिग्रेडच्या जवानांना काबाईत आणण्यास चार तास लागले.
*******

Sunday, 26 April 2020

पोट धरून हसा

औषध
राम: अरे, पूर्वी माझी बायको सारखी चिडचिड करायची.
श्याम: मग तिला कोणी बरे केलं?
राम: डॉक्टरांनी!
श्याम: कोणतं औषध दिलं त्यांनी?
राम:काही नाही, ते फक्त इतकंच म्हणाले, की म्हातारपण जवळ आलं की अशी चिडचिड होतेच.

Friday, 24 April 2020

पोटभर हसा

फटका
बाबा: राजू, आता दंगा केलास तर इतक्या जोरात फटका मारेन, की तू उडून थेट रस्त्यावर जाऊन पडशील.
राजू: थोडं आणखी जोरात मारा, मला पालिकडाच्या दुकानात जायचं आहे.

पोटभर हसा 2

पेपर
आई: सोनू, बाहेर जाऊन शिट्टी वाजव, बाबांना पेपर वाचता येत नाही.
सोनू: आई, मी दहा वर्षांचा असूनही सगळा पेपर वाचू शकतो आणि बाबांना अजून पेपर वाचता येत नाही?

पोटभर हसा

वडील:पिंटू, आज तू परीक्षेला का नाही गेलास?
पिंटू: बाबा, आजचा पेपर फार कठीण आहे.
वडील: अरे, पेपर न लिहिताच तुला कसं कळलं की पेपर कठीण आहे?
पिंटू: अहो बाबा, आजचा पेपर कलाच फुटला.

म्हैस
पांडूची बायको काळी असते. एकदा पांडू तिला हिरवी साडी आणून देतो. मैना ती साडी नेसते आणि विचारते," कशी दिसते मी?"
पांडू म्हणतो," हिरव्या शेतातल्या काळ्या म्हशीसारखी!"

मोजे
बंटीने एका पायात पिवळा आणि एका पायात निळा मोजा घातलेला असतो. ते पाहून
शिक्षक:अरे! अशी विचित्र मोज्यांची जोडी कशी  काय घातली आहेस तू?
बंटी: विचित्र नाही! माझ्याकडे अशीच अजून एक जोडी आहे.

वाघीण
शिक्षक: संजू, वाघाला न घाबरणाऱ्या प्राण्याचे नाव सांग बरं.
संजू: वाघीण

बी साईड
दोन वेडे झाडावर बसून गाणे म्हणत असतात. एक वेडा अचानक उलटा होऊन गाणे म्हणायला लागतो.
दुसरा वेडा: अरे, तू अचानक उलटा का झालास?
पहिला वेडा: अरे, कारण माझी 'ए' साईड संपून 'बी' साईड सुरू झालीय.

मासे
मासे विकणारा: मावशी, मासे शिजवण्याआधी पाण्यातून छान धुवून घ्या!
मावशी: कशाला? मासे तर पाण्यातूनच पकडलेले असतात की!

तोंडाला नळ
सोनू: आई, लवकर भजी दे! माझ्या तोंडाला पाणी सुटलंय...
पिंकू: दादा, तुझ्या तोंडाला नळ बसवलाय का?

औषध
एक अतिजाड माणूस (डॉक्टरला): डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी काही औषध सांगा.
डॉक्टर: तुम्ही किती आहार घेता, ते सांगा.
पेशंट: सात वाट्या भाजी, ताटभर भात आणि सात पोळ्या.
डॉक्टर: तुम्ही उद्यापासून चार वाट्या भाजी, अर्धे ताट भात आणि चार पोळ्या इतकाच आहार घ्यायचा.
पेशंट: डॉक्टर, पण हे औषध जेवणाआधी घायचे का जेवणानंतर?

पाणी
मैनाबाई (दुधवाल्याला): काय हो, आजकाल दुधाचे भाव इतके का वाढलेत?
दूधवाला: काय करणार बाई? हल्ली पाणी महाग झालंय...

हसत जगावे


दोन पावलं
पोलीस (चोरास):खबरदार, एक पाऊल पुढे टाकलास तरी जेलमध्ये टाकेन.
चोर:ठीक आहे! मग मी दोन पावले पुढे टाकतो.

Monday, 20 April 2020

काही आधुनिक म्हणी

काही आधुनिक म्हणी
* आपला तो खोकला , दुसऱ्याचा तो कोरोना
* थांब लक्ष्मी , हात धुवायला सॅनिटायजर देते
* कोरोनाचं पोर , अख्या गावाला घोर गर्वाचे घर लॉकडाउन
*  माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत
* नवरा वैतागला लॉकडाउनने , बायको वैतागली स्वंयपाकाने !
* आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा
* इकडे बायको तिकडे पोलीस

Sunday, 19 April 2020

घरातले टोमणे नकोत . . .

१ . घरात फेरफटका मारला तर - . . . आताच केर काढला होता . फिरताय कशाला ? एका जागी बसा ना . . . माझ्या सर्व मेहनतीवर पाणी .
२ . झोपलो तर - . . . सर्व बेडशीट खराब केली . तुम्हाला झोपण्याचीही शिस्त नाही .
३ . काही खायला मागितले तर - . . . आताच तर दिले होते ना ? काम नाही धाम . . . इतक्यात भूक लागली ?

व्हॉट्स अॅपवरून माणसाचा स्वभाव

व्हॉट्स अॅपवरून माणसाचा स्वभाव
* ज्याचा डीपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो .
वारंवार डीपी बदलणारे चिडचिड्या स्वभावाचे असतात .
* छोटे व आयते स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात .
 * नेहमी स्टेटस बदलणारे आपले वर्चस्व दाखवतात .
* पुन्हापुन्हा पोस्ट टाकणारे दिलदार मनाचे असतात .
* कधीच कुणाला लाईक न  करणारे समाधानी असतात .
* इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात .
* * फोटो दिसताच ओपन  करणारे अधीर स्वभावाचे असतात.