Tuesday, 10 November 2020

विनोद... विनोद

थंडीच्या दिवसांतील योगासन

१. आधी आरामात पलंगावर झोपा.

२. डोक्याच्या खाली उशी घ्या

३. दोन्ही हातांनी चादर डोक्यापयर्ंत ओढून घ्या.

४. डोळे मिटून दीर्घ श्‍वास घेऊन शांतपणे बोला

खड्ड्यात गेलं काम

*****

दारू आणि माशी

बायको : काय हो,काय करताय?

नवरा : माशा मारतोय

बायको : किती मारल्या?

नवरा : पाच. दोन फिमेल आणि तीन मेल

बायको : ते कसं काय?

नवरा : दोन आरशासमोर बसल्या होत्या आणि तीन दारूच्या बाटलीजवळ

*****

कोंबडा ग्राहकाला म्हणाला

तराजूवर बसलेला कोंबडा ग्राहकाकडे वारंवार रोखून बघत होता.

ग्राहक : काय रे कोंबड्या, रोखून काय बघतोस माझ्याकडे

कोंबडा बोलला.

मला तर विकत घेतलेस पण कांदे विकत घेऊन दाखव.

*****

बायकांची प्रार्थना..

हे देवा माझ्या नवर्‍याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे माझ्यासाठी काही नको।

त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते..

Saturday, 7 November 2020

झकपक झम्पू!

झम्पू : अग, काल न तू स्वप्नात आली होतीस.

मुलगी : व्वा! काय होत स्वप्न?

झम्पू : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत..

मुलगी : पुढे?

झम्पू : आणि अचानक आपल्या बसला अपघात होतो !

मुलगी : बापरे मग काय होत?

झम्पू : त्या अपघातात आपण दोघेच वाचतो आणि तू उठून काही तरी शोधत असतेस.

मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?

झम्पू : नाही ग. तू बस कंडक्टरला शोधत असतेस.. तिकिटाचे उरलेले पैसे घेण्यासाठी!

**************************************

झम्पू : बाबा, एक ग्लास पाणी द्या ना?

वडील : स्वत: उठून घे..!

झम्पू : द्या ना बाबा प्लीज

वडील : उठून घेतो का, थोबाडीत देऊ तुझ्या!

झम्पू : ओके, मग थोबाडीत मारायला याल तेव्हा 

येताना पाणी आणा..

***************************************

झम्पू : (मुलीकडे बघत)

चलते चलते यूंही रुक जाता हूं मैं.

बैठे बैठे यूंही खो जाता हूं मैं.

क्या यही प्यार है?

पिंकी : वेड्या ,अशक्तपणा आलाय तुला,हॉस्पिटलमध्ये जा.


Tuesday, 27 October 2020

हसण्यावारी जन्म आपला


असं  म्हणतात  की,  जर्मनीमध्ये  एक ज्यू  ज्योतिषी  फार  प्रसिद्ध  होता. भूत-वर्तमान-भविष्याचे अचूक ज्ञान त्याला   होते.   तो   अनेक   नाझी अधिकार्‍यांना आणि सेनाधिकार्‍यांना भविष्य  सांगायचा,  त्यामुळे  त्याची जर्मनीतून   सुटकाही   होत   नव्हती आणि   तो   ज्यू   असूनही   त्याची कॉन्सन्टरेशन    कॅम्पमध्ये    रवानगी झाली नव्हती. त्याची ख्याती हिटलरपर्यंत पोहोचली आणि त्याला एक दिवस  हिटलरचे  बोलावणे  आले.  एका  सहायकाला  बरोबर  घेऊन  तो

हिटलरकडे  गेला.  हिटलरने  त्याला  एकच  प्रश्‍न  विचारला,  माझा  मृत्यू कधी  होणार?  त्याने  उत्तर  दिले,  माझा  मृत्यू झाल्यानंतर  तीन  दिवसांनी  तुमचा  मृत्यू होणार.  हिटलर  म्हणाला,  आणखी  काही

सांगता    येणार    नाही    का    माझ्या मृत्यूदिनाबद्दल.    ज्योतिषी    म्हणाला, तुमचा मृत्यू ज्यूंच्या एका पवित्र दिवशी होईल. परतीच्या वाटेवर सहाय्यकाने विचारले, तुम्ही आज काही वेगळीच उत्तरे  दिलीत.  ती  का?  ज्योतिषी म्हणाला, हिटलरचा मृत्यू माझ्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी होणार, असे मी एवढ्यासाठीच सांगितलं की, आता हिटलरचे लोक मी ज्यू असूनहीमाझा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहतील. सहायक म्हणाला, आणि तो ज्यूंचा पवित्र दिवस कोणता? ज्योतिषी म्हणाला, अरे गधड्या, हिटलर कोणत्याही दिवशी मेला, तरी तो ज्यूंसाठी पवित्र दिवसच नसेल का?

●●●●●●●●

राहूल्या : जर  मी  या  नारळाच्या झाडावर चढलो तर       मला इंजिनीयरींग कॉलेजच्या मुली दिसतील का रं?

आज्या : हो ..कि लेका आणि जर हात सुटला    तर    मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.

●●●●●●●●

समुद्राने झर्‍याला हिणवून विचारले,  'झरा बनून किती दिवस राहणार, तुला समुद्र नाही का बनायचं?'

त्यावर झर्‍याने शांततेत उत्तर दिले, 'मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, लहान  राहून  गोड  बनणे  कधीही चांगले.  कारण  तिथे वाघ  पण वाकुन पाणी पितो.'

●●●●●●●●

सहा   मित्रांनी   शरद   पवारसाहेबांना किडनॅप   केलं.   किडनॅपनंतर   त्यांना अर्धा  तासानंतर  कळलं,  आपल्यातले चार  जण  पवार  साहेबांबरोबर  आहेत.

उरलेल्या  दोन  जणांना  कळून  चुकलं आपण किडनॅप झालोय.

Tuesday, 7 July 2020

विनोद वाचा आणि मनसोक्त हसा

बायको :- उठा हो, लवकर आठ वाजत
              आलेत 😏
नवरा :  डोळेच उघडत नाहीत गं आज
           काहीतरी असं सांग ज्याने डोळे
           पटकन उघडतील ...
बायको :- रात्री जिच्याशी उशीरापर्यन्त
           चॅटिंग करीत होतात न तुम्ही
           तो माझाच दुसरा नंबर आहे
*#खाडकन डोळे उघडले #*

Sunday, 21 June 2020

हसा आणि हसवा

अंगदुखी

गजू एकदा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला," डॉक्टरसाहेब, सगळं अंग दुखतंय."
मग त्यानं आधी हातावर,मग छातीवर, मग डोक्यावर, मग पोटावर आणि पायावर बोट दाबून दाखवले आणि दरवेळी अंगावर बोट टेकलं की तो म्हणत होता, इथे दुखतंय... सगळं अंग दुखतंय डॉक्टरसाहेब...
डॉक्टरांनी त्याला पेनकिलर दिली आणि घरी पाठवलं.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तीच तक्रार घेऊन आला तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याची नीट तपासणी केली आणि त्याला सांगितलं,
"गजूशेठ, तुमचं अंग दुखत नाही, तुमचं बोट कापलं आहे. त्यावर इलाज केला पाहिजे."
◆◆◆◆◆

Saturday, 6 June 2020

दणदणून हसा

पु. ल. प्रमुख पाहुणे होते. मुख्य समारंभानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. एका बाईंनी पु.लं.ना प्रश्न केला, "आपण अजून आत्मचरित्र का लिहिलं नाही?"
पु. ल. म्हणाले, "नाही लिहिलं!"
बाई म्हणाल्या, "तुम्ही ते लवकरात लवकर लिहावं
अशी आमची इच्छा आहे."
पु. ल.नी त्या बाईकडे डोळे मोठे करून पाहिलं अन्
म्हटलं, "म्हणजे माझं आता काही खरं नाही असंच ना?"
सारं थिएटर हास्यकल्लोळात बुडून गेलं.

Friday, 5 June 2020

मनसोक्त हसा

मनोहररावांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राजाभाऊ नव्यानेच राहायला आले होते. मनोहरराव सामायिक भिंतीवर ठोकाठोकी करत होते. काही वेळाने राजाभाऊ त्यांच्याकडे आले. त्यांना पाहताच मनोहरराव दिलगिरीच्या स्वरात म्हणाले, "आमच्या ठोकाठोकीने तुम्हाला त्रास झाला असेल. त्याचं काय आहे की एक पेंटिंग लावण्यासाठी मी खिळा ठोकत होतो.'
"ठीक आहे, तुमचं काम चालू द्या. मला फक्त ऐवढं विचारायचं होतं, की खिळ्याच्या दुसऱ्या टोकाला आम्ही फ्रेम लटकवली तर तुमची काही हरकत नाही ना!" राजाभाऊंनी विचारले.