Monday, 15 March 2021

फक्त हसा


दोष कुणाचा?

पत्नी: हे बघा, प्रत्येक वेळी आपल्या  भांडणामध्ये तुम्ही सार माझ्या माहेरच्यांना का आणता? थेट मला का बोलत नाही? सांगा  आता. मला उत्तर हवंय.

पती : अगं, असं त्रागा करू नकोस.  त्याचं काय आहे, आपण टीव्ही  खराब निघाला तर कोणाला दोष  देतो? कंपनीलाच ना? कारण त्यात टीव्हीचा काय दोष? आता समजलं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर?

एका पेट्रोल पंपावर लावलेला सूचना 

सूचनाफलक-

'पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पहावेत. छातीत कळ आल्यास' पंपचालक  जबाबदार राहणार नाही..... कृपया ही सूचना लक्षात घ्यावी.'

स्थळ

गंगूबाई : काय हो, तुमच्या मुलीला स्थळं पाहताय म्हणे? कुठलं एखादं स्थळ सांगून आलं आहे का?

शांताबाई : हो ना. एक स्थळ आलं आहे.

गंगूबाई : मग, काय करतो तो मुलगा?

शांताबाई : तो मुलगा व्हॉट्सअॅप कंपनीत ग्रुप अँडमीन आहे म्हणे. त्याच्या हाताखाली २५६ लोक काम करतात.

एक शंका

राम्या : बायकोशी जास्त वेळ बोलल्यामुळे ताण कमी होतो. हार्टअॅटॅकचा धोका कमी होतो आणि आयुष्य वाढतं असं डॉक्टर सांगतात.

श्याम्या : पण बायको कोणाची?

काय राहणार?

मुलगा : बाबा, तुम्ही दारु पिऊ नका.

वडील : पिऊ दे बाबा, नाहीतरी वर काय घेऊन जायचंय?

मुलगा : अहो, तुम्हाला कळतंय का? तुम्ही असंच दारु पित राहिला तर वर न्यायला राहणार तरी काय आहे?

उपाय

डॉक्टर : ऑपरेशनसाठी तुम्हाला दोन तास बेशुद्ध रहावे लागेल.

रुग्ण : तुम्ही काय करणार?

डॉक्टर : भूल देऊ की होणारे बील दाखवू?


सुखी जीवनाचा मंत्र

रामभाऊ: अहो, रामभाऊ, सुख जीवनाचा मंत्र काय सांगा पाहू

श्यामराव : अहो, सुखी जीवनाचा मंत्र तसा सोपा आहे. तो म्हणजे बायको बोलत असेल तर शांत रहा आणि बायको शांत असेल तर बोलू नका.