थंडीच्या दिवसांतील योगासन
१. आधी आरामात पलंगावर झोपा.
२. डोक्याच्या खाली उशी घ्या
३. दोन्ही हातांनी चादर डोक्यापयर्ंत ओढून घ्या.
४. डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन शांतपणे बोला
खड्ड्यात गेलं काम
*****
दारू आणि माशी
बायको : काय हो,काय करताय?
नवरा : माशा मारतोय
बायको : किती मारल्या?
नवरा : पाच. दोन फिमेल आणि तीन मेल
बायको : ते कसं काय?
नवरा : दोन आरशासमोर बसल्या होत्या आणि तीन दारूच्या बाटलीजवळ
*****
कोंबडा ग्राहकाला म्हणाला
तराजूवर बसलेला कोंबडा ग्राहकाकडे वारंवार रोखून बघत होता.
ग्राहक : काय रे कोंबड्या, रोखून काय बघतोस माझ्याकडे
कोंबडा बोलला.
मला तर विकत घेतलेस पण कांदे विकत घेऊन दाखव.
*****
बायकांची प्रार्थना..
हे देवा माझ्या नवर्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे माझ्यासाठी काही नको।
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते..